Wednesday, October 21, 2026
Homeफलटणसातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ९ जागांवर बिनविरोध; उर्वरित १२ जागांसाठी राजकीय रणधुमाळी!

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ९ जागांवर बिनविरोध; उर्वरित १२ जागांसाठी राजकीय रणधुमाळी!

रणजितसिंह नाईक-निंबाळकरांसह नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड; गोरे बंधूंपासून नाईक-निंबाळकरांपर्यंत अनेक लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष

सातारा | प्रतिनिधी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, नऊ जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह विविध मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे. दुसरीकडे, उर्वरित १२ जागांसाठी अनेक दिग्गज उमेदवार आमनेसामने येणार असल्याने निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.

सहकार क्षेत्रातील या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, विविध राजकीय गटांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. विशेषतः गोरे यांच्यातील लढत आणि नाईक-निंबाळकर घराण्यातील दोन नेत्यांमधील सामना चर्चेचा विषय ठरत आहे.

नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड

बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे :

१. सर्जेराव सावंत — सोसायटी, सातारा
२. सत्यजित वीर — वाई सोसायटी
३. नंदकुमार मोरे — खटाव सोसायटी
४. अतुल भोसले — प्रक्रिया उद्योग
५. मकरंद पाटील — खरेदी-विक्री संघ
६. काका धुमाळ — गृह निर्माण दूध संस्था
७. रणजितसिंह नाईक-निंबाळकर — पतसंस्था व पतपेढी
८. ऋतुजा पाटील वाठारकर — राष्ट्रवादी महिला राखीव
९. मंगल पाटील — शिवसेना महिला राखीव

उर्वरित १२ जागांसाठी कोणामध्ये होणार लढत?

निवडणुकीतील प्रमुख लढतींचे चित्र पुढीलप्रमाणे आहे :

१. जावळी : विठ्ठल गोळे विरुद्ध ज्ञानदेव रांजणे
२. महाबळेश्वर : रूपाली राजपुरे विरुद्ध संजय मोरे
३. गोरे गटातील लढत : जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे विरुद्ध मनोज पोळ
४. चुरशीची लढत : चंद्रकांत जाधव विरुद्ध सुनील वाघ
५. राजकीय सामना : शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर
६. सहकार क्षेत्रातील लढत : उदयसिंह उंडाळकर विरुद्ध धनाजी पाटील
७. सुनील माने विरुद्ध सुनील खत्री
८. योगेश फडतरे विरुद्ध संदीप पाचंगणे
९. अनिरुद्ध गाडवे विरुद्ध अजय भोसले
१०. नाईक-निंबाळकर यांच्यात सामना : संजीवराजे नाईक-निंबाळकर विरुद्ध समशेरसिंह नाईक-निंबाळकर
११. भटके-विमुक्त प्रवर्ग : अर्जुन काळे विरुद्ध सुनील वाघ
१२. अनुसूचित जाती प्रवर्ग : दीपक चव्हाण विरुद्ध रवींद्र बडेकर विरुद्ध सुरेश गायकवाड विरुद्ध सत्यवान कांबळे

दिग्गजांच्या लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही जागांवर बिनविरोध निवड झाल्याने संबंधित उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, उर्वरित जागांवरील बहुरंगी आणि थेट लढतींमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.

विशेषतः जयकुमार गोरे, शेखर गोरे आणि मनोज पोळ यांच्यातील लढत तसेच संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातील सामना लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि सहकार क्षेत्रातील सत्तासमीकरणे कोणाच्या बाजूने झुकणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments