Thursday, June 25, 2026
Home Blog Page 11

पालखी मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत शासकीय निवासस्थानावरही कारवाई होणार का? फलटणकरांचे प्रशासनाकडे लक्ष

0
पालखी मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत शासकीय निवासस्थानावरही कारवाई होणार का? फलटणकरांचे प्रशासनाकडे लक्ष


फलटण : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिकेकडून शहरात तसेच पालखी मार्गावर अतिक्रमण हटवण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. पालखी सोहळा सुरळीत आणि वाहतूक कोंडीविरहित पार पडावी, यासाठी रस्त्यालगतची अनधिकृत बांधकामे, शेड, गाळे आणि टपऱ्यांवर बुलडोझर चालवण्यात येत आहे.
मात्र, या मोहिमेदरम्यान आता एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय समोर आला आहे. फलटण येथील ‘अधिकार गृह’ (प्रांत कार्यालय) समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अभियंत्यांच्या शासकीय निवासस्थानाची संरक्षक भिंत अतिक्रमण क्षेत्रात येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. त्यामुळे या शासकीय बांधकामावरही प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नगरपालिकेने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि दुकानदारांच्या अतिक्रमणांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई केली आहे. अनेक ठिकाणी शेड, टपऱ्या आणि बांधकामे हटवण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत, शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचा काही भाग जर रस्त्याच्या हद्दीत येत असेल, तर त्यावरही समान निकषांनुसार कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
“सामान्यांच्या छोट्या व्यवसायांवर तत्काळ कारवाई होते, मग शासकीय इमारतींनाही त्याच नियमांचा लागू व्हायला हवे. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सध्या पालखी मार्गावरील अतिक्रमण हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, अधिकार गृहासमोरील या शासकीय निवासस्थानाबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत याबाबत स्पष्ट निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतीय बौद्ध महासभेचा कार्यभार नूतन कार्यकारिणीकडे सुपूर्द; धम्मप्रसाराचा माजी कार्यकारिणीचा संकल्प कायम

0
भारतीय बौद्ध महासभेचा कार्यभार नूतन कार्यकारिणीकडे सुपूर्द; धम्मप्रसाराचा माजी कार्यकारिणीचा संकल्प कायम

भारतीय बौद्ध महासभेचा कार्यभार नूतन कार्यकारिणीकडे सुपूर्द; धम्मप्रसाराचा माजी कार्यकारिणीचा संकल्प कायम

फलटण, दि. ३ जून २०२६ : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सर्व माजी पदाधिकारी यांनी आज भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आयु. भिमराव लोंढे सर यांच्याकडे संस्थेचा कार्यभार सन्मानपूर्वक सुपूर्द केला.

गेल्या तीन वर्षांमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. यामध्ये वर्षावास प्रवचनमाला, बालसंस्कार शिबिरे, श्रामणेर शिबिरे, महिला उपासिका शिबिरे तसेच प्रत्येक रविवारी “चला बुद्ध विहारी” या संकल्पनेअंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे लहान मुलांवर बौद्ध संस्कार घडावेत, त्यांना बुद्धधम्माचे ज्ञान मिळावे तसेच समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत धम्माचे महत्त्व पोहोचावे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले.

याशिवाय समता सैनिक दलाच्या ग्राम शाखांची विविध खेडेगावांमध्ये स्थापना करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाने आचार-विचाराने धम्ममार्गाचा स्वीकार करून पुढील पिढीला आदर्श जीवनमूल्ये मिळावीत, या उद्देशाने विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच समाजातील विविध शासकीय सेवांमध्ये यश संपादन करणारे युवक-युवती यांचा गौरव व सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला.

यावेळी माजी पदाधिकाऱ्यांनी भारतीय बौद्ध महासभेची कागदपत्रे, रजिस्टर, मासिक मिटिंगची वही, बँक पासबुक, चेकबुक तसेच संस्थेचे इतर कार्यालयीन साहित्य विद्यमान अध्यक्ष आयु. भिमराव लोंढे सर यांच्या ताब्यात सुपूर्द केले. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन पुढील काळात संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मात्र, संस्थेचे कार्यालयीन साहित्य व कामकाज सुपूर्द केले असले तरी धम्मकार्याची जबाबदारी संपलेली नाही, अशी भावना सर्व माजी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. संस्थेत पद असो वा नसो, बुद्धधम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहण्याची प्रतिज्ञा सर्व माजी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. पुढील काळातही समाजप्रबोधन, धम्मसंस्कार आणि संघटनात्मक कार्य अविरतपणे सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष यशवंतराव (भैय्यासाहेब) भीमराव आंबेडकर, तृतीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर, विद्यमान कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर, संस्थेचे कायदेशीर सल्लागार तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर आणि संपूर्ण आंबेडकर परिवार यांच्यावरील आपली श्रद्धा व विश्वास कायम असल्याचे माजी कार्यकारिणीने स्पष्ट केले.

“बुद्ध, धम्म आणि संघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आंबेडकरी विचारांच्या अधिष्ठानावर आम्ही समाजजागृती, धम्मप्रसार आणि संघटनबांधणीचे कार्य यापुढेही सुरू ठेवणार आहोत,” असा विश्वास भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या माजी कार्यकारिणीने व्यक्त केला.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव सर , महासचिव आयु. बाबासाहेब जगताप सर , कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे सर , संस्कार सचिव आयु.अमोल भोसले, माजी कार्यालयीन सचिव तथा विद्यमान केंद्रीय शिक्षक आयु. चंद्रकांत मोहिते तसेच इतर माजी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना “जय भीम” म्हणत शुभेच्छा दिल्या आणि स्नेहपूर्ण वातावरणात निरोप घेतला.

केंद्रीय शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांचा पत्रकार बांधवांकडून सत्कार

0
केंद्रीय शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांचा पत्रकार बांधवांकडून सत्कार

केंद्रीय शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांचा पत्रकार बांधवांकडून सत्कार

फलटण (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कार्यालयीन सचिव, बौद्धाचार्य तथा धम्मकार्याशी निष्ठेने जोडलेले आयु. चंद्रकांत मोहिते यांची भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक म्हणून चैत्यभूमी, मुंबई येथे निवड झाल्याबद्दल पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

धम्मप्रसार, समाजप्रबोधन आणि बौद्ध संस्कार जोपासण्यासाठी आयु. मोहिते यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या बौद्ध समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी लोकमतचे तालुका प्रतिनिधी विकास शिंदे, हिंदुराव गायकवाड, अमोल झेंडे, प्रवीण पवार, कार्यकारी संपादक शेखर गायकवाड, युवराज चोपडे, गणेश भोईटे तसेच इतर पत्रकार व समाज बांधवांच्या उपस्थितीत मोहिते यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना आयु. चंद्रकांत मोहिते यांनी व्यक्त केलेल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ही निवड माझा वैयक्तिक सन्मान नसून बुद्ध, धम्म आणि संघाच्या कार्यासाठी झटणाऱ्या सर्व धम्मबंधू-भगिनींचा सन्मान आहे. भविष्यातही धम्मप्रसार आणि समाजप्रबोधनाचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार आहे.”

उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत, केंद्रीय शिक्षक म्हणून त्यांच्या माध्यमातून बुद्धधम्माचा विचार अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.

ज्येष्ठ पौर्णिमा : बुद्धधम्माच्या इतिहासाला उजाळा देणारा पवित्र दिवस – सोमीनाथ घोरपडे

0
ज्येष्ठ पौर्णिमा : बुद्धधम्माच्या इतिहासाला उजाळा देणारा पवित्र दिवस – सोमीनाथ घोरपडे

ज्येष्ठ पौर्णिमा : बुद्धधम्माच्या इतिहासाला उजाळा देणारा पवित्र दिवस – सोमीनाथ घोरपडे

पवारवाडी (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मौजे पवारवाडी येथे ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त धम्मप्रवचन व विवाह संस्कार दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा, शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयुष्यमान सोमीनाथ घोरपडे यांनी ज्येष्ठ पौर्णिमेचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.

मार्गदर्शन करताना घोरपडे म्हणाले की, ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस बौद्ध धम्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानला जातो. याच दिवशी तथागत गौतम बुद्धांनी कपिलवस्तू येथे ‘महासमय सुत्त’ या महत्त्वपूर्ण धम्मदेशनेचा उपदेश केला होता. तसेच सम्यक संबोधी प्राप्तीनंतर ब्रह्मदेशातील व्यापारी तपस्सू आणि भल्लिक यांनी तथागतांना अन्नदान करून धम्माची दीक्षा स्वीकारली होती. याच दिवशी सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा आणि पुत्र महेंद्र यांनी बोधिवृक्षाची पवित्र फांदी श्रीलंकेत नेऊन बुद्ध धम्माच्या जागतिक प्रसाराला नवी दिशा दिली. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमेला बौद्ध इतिहासात विशेष स्थान प्राप्त झाले आहे.

यावेळी त्यांनी सर्व बौद्ध बांधवांनी ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त जवळच्या बौद्ध विहारात जाऊन बुद्धवंदना, त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून धम्माचे आचरण करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी संस्कार सचिव आयु. अमोल भोसले व त्यांच्या सहचारिणी आयुनि उमिता भोसले यांच्या विवाह संस्कार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे विधी संचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांनी केले.

कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर यांनी माता रमाई यांच्यावरील ‘कुंकू लाविलं रमानं’ हे भावगीत सादर करून भोसले दाम्पत्याला विवाह संस्कार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील माता रमाई यांच्या त्याग, समर्पण आणि संघर्षमय योगदानाचा उल्लेख करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

बौद्धाचार्य महावीर भालेराव म्हणाले की, “पती-पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाके आहेत. परस्पर आदर, विश्वास आणि समन्वय यांच्या आधारावर बौद्ध धम्माच्या तत्त्वांनुसार जीवन जगल्यास कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. संघर्षातूनच यशाचा मार्ग निर्माण होत असतो. त्यामुळे बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना वंदन करून जीवन मंगलमय करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा.”

या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, धम्म उपासक विजय निकाळजे यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेत आढावा बैठक संपन्न

0
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेत आढावा बैठक संपन्न

फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या दालनात आयोजित बैठकीत पालखी मार्गावरील सुरू असलेल्या कामांचा तसेच वारकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून जबाबदारीने काम करावे, असे निर्देश नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, सोहळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे यांनी पालखी शहरात दाखल होण्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी व दिंडी प्रमुखांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे निर्देश प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांनी दिले.

बैठकीस तहसीलदार अभिजीत जाधव, मुख्याधिकारी निखिल जाधव, उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे उपस्थित होते. तसेच नगरसेवक संदीप चोरमले, किरण राऊत, सिद्धाली शहा, मीना काकडे, रोहित नागटिळे, राहुल निंबाळकर, सचिन अहिवळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित

ज्येष्ठ पौर्णिमा बौद्ध धम्मात असाधारण महत्त्वाची; प्रत्येकाने विहारात जाऊन वंदना करावी – सोमीनाथ घोरपडे

0
ज्येष्ठ पौर्णिमा बौद्ध धम्मात असाधारण महत्त्वाची; प्रत्येकाने विहारात जाऊन वंदना करावी – सोमीनाथ घोरपडे

ज्येष्ठ पौर्णिमा बौद्ध धम्मात असाधारण महत्त्वाची; प्रत्येकाने विहारात जाऊन वंदना करावी – सोमीनाथ घोरपडे

ज्येष्ठ पौर्णिमा बौद्ध धम्मात असाधारण महत्त्वाची; प्रत्येकाने विहारात जाऊन वंदना करावी – सोमीनाथ घोरपडे
पवारवाडी (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मौजे पवारवाडी येथे ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त धम्मप्रवचन व विवाह संस्कार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयुष्यमान सोमीनाथ घोरपडे यांनी ज्येष्ठ पौर्णिमेचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व विषद केले.

मार्गदर्शन करताना घोरपडे म्हणाले की, ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस बौद्ध धम्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी तथागत गौतम बुद्धांनी कपिलवस्तू येथे ‘महासमय सुत्त’चे ऐतिहासिक प्रवचन दिले होते. तसेच सम्यक संबोधी प्राप्तीनंतर ब्रह्मदेशातील व्यापारी तपस्सू आणि भल्लिक यांनी तथागतांना अन्नदान करून धम्मोपदेश स्वीकारला होता. याच दिवशी सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा आणि पुत्र महेंद्र यांनी बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेत नेऊन बुद्ध धम्माच्या प्रसाराचे कार्य केले. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमेला बौद्ध इतिहासात विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
यावेळी त्यांनी सर्व बौद्ध बांधवांनी ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त जवळच्या बौद्ध विहारात जाऊन बुद्धवंदना, त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून धम्माचे आचरण करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी संस्कार सचिव आयु. अमोल भोसले व त्यांच्या सहचारिणी आयुनि उमिता अमोल भोसले यांच्या विवाह संस्कार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे विधी संचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांनी केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर यांनी माता रमाई यांच्यावरील “कुंकू लाविलं रमानं” हे गीत सादर करून भोसले दाम्पत्याला विवाह संस्कार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील रमाई यांच्या त्याग, समर्पण आणि संघर्षपूर्ण योगदानाचा उल्लेख करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

बौद्धाचार्य महावीर भालेराव म्हणाले की, पती-पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाके आहेत. परस्पर आदर, सन्मान आणि समन्वय यांच्या आधारावर बौद्ध धम्माच्या तत्त्वांनुसार वैवाहिक जीवन जगल्यास कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. प्रत्येक संघर्षातूनच यशाचा मार्ग निर्माण होत असतो. त्यामुळे बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना वंदन करून जीवन मंगलमय करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा.

या कार्यक्रमास माजी कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष रामचंद्र मोरे सर, धम्म उपासक विजय निकाळजे तसेच बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कालकथित आनंदा गायकवाड यांचा २१ वा स्मृतिदिन श्रद्धापूर्वक संपन्न

0
कालकथित आनंदा गायकवाड यांचा २१ वा स्मृतिदिन श्रद्धापूर्वक संपन्न

कालकथित आनंदा गायकवाड यांचा २१ वा स्मृतिदिन श्रद्धापूर्वक संपन्न

कालकथित आनंदा गायकवाड यांचा २१ वा स्मृतिदिन श्रद्धापूर्वक संपन्न
फलटण (प्रतिनिधी) : मौजे ढवळ, ता. फलटण येथील कालकथित आनंदा गायकवाड यांचा २१ वा स्मृतिदिन भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार विधीनुसार श्रद्धापूर्वक संपन्न झाला.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांनी महासभेच्या स्मृतिदिन विधी पद्धतीनुसार स्मृतिदिन संस्कार विधी पार पाडला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस, बौद्धाचार्य तथा श्रामणेर आयु. बाबासाहेब जगताप सर म्हणाले, “तथागत भगवान गौतम बुद्धांनी मानवजातीला चार आर्यसत्यांचा मार्ग दिला. त्यातील पहिले आर्यसत्य म्हणजे जगात दुःख आहे, तर त्याचबरोबर दुःख निवारणाचाही मार्ग त्यांनी दाखविला आहे. कालकथित आनंदा गायकवाड आपल्यातून जाऊन २१ वर्षे झाली असली तरी त्यांनी कुटुंबासाठी केलेले त्याग, समर्पण आणि योगदान आजही स्मरणात आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गायकवाड परिवार दरवर्षी स्मृतिदिन साजरा करतो, ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे.”

ते पुढे म्हणाले, “दुःख आहे म्हणून निराश होण्याऐवजी तथागतांनी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून जीवनात सकारात्मकता निर्माण करणे आवश्यक आहे. या पृथ्वीतलावरील प्रत्येक गोष्ट अनित्य आहे. त्यामुळे कालकथित आनंदा गायकवाड यांच्या स्मृती जपत कुटुंबियांनी धम्माच्या शिकवणीनुसार जीवन जगावे आणि दुःखातून मुक्त व्हावे. आजच्या स्मृतिदिन कार्यक्रमातून गायकवाड परिवाराने एकत्रित येऊन समानता, बंधुता आणि एकतेचा संदेश दिला आहे.”

यावेळी बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांनी मार्गदर्शन करताना तथागत बुद्धांच्या धम्मातील वैज्ञानिक, तर्कसंगत व मानवतावादी विचारांचा स्वीकार करून धम्ममय जीवन जगण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास गायकवाड परिवारातील सर्व नातेवाईक, कुटुंबिय, बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भारतीय बौद्ध महासभा परिवारातील भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष महावीर भालेराव, सरचिटणीस बौद्धाचार्य बाबासाहेब जगताप, फलटण तालुक्याचे माजी संघटक आनंद जगताप, आयुनि पारिजातका बाबासाहेब जगताप यांच्यासह अनेक धम्मबंधू-भगिनी उपस्थित होत्या.
कालकथित आनंदा गायकवाड यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

अकलूजमध्ये FDAची धडक कारवाई; प्रतिबंधित मावा व्यवसायाचा पर्दाफाश१.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन दुकानगाळे सील; दोघांना अटक

0
अकलूजमध्ये FDAची धडक कारवाई; प्रतिबंधित मावा व्यवसायाचा पर्दाफाश१.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन दुकानगाळे सील; दोघांना अटक

अकलूज प्रतिनिधी : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) च्या पथकाने अकलूज येथे पहाटे धडक कारवाई करत प्रतिबंधित मावा निर्मिती व विक्री करणारा अड्डाच उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल १ लाख ९१ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी दोन इलेक्ट्रिक मशीनही प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. संबंधित दोन दुकानगाळे सील करण्यात आले असून याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन, सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी मंगळवारी (दि. २ जून २०२६) सकाळी साडेसातच्या सुमारास अकलूज येथील गांधी चौकातील जुन्या पोलीस स्टेशनसमोरील मे. बाबा पान शॉप येथे छापा टाकला. तपासणीदरम्यान दोन गाळ्यांमध्ये प्रतिबंधित मावा तयार करून त्याची विक्री सुरू असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच मावा निर्मितीसाठी वापरण्यात येणारी दोन इलेक्ट्रिक यंत्रेही प्रशासनाने ताब्यात घेतली. यानंतर संबंधित दोन्ही दुकानगाळे तात्काळ सील करण्यात आले.
या प्रकरणी दुकान मालक हर्षद शिवाजी होनप (वय ३३, रा. अकलूज) आणि सोनू उर्फ तानाजी शिवाजी भोसले (वय ३०, रा. अकलूज, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात भेसळ, गुटखा, मावा आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातील कारवायांना वेग आल्याचे दिसून येत आहे. अकलूजमधील ही धडक कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग मानली जात असून या कारवाईमुळे प्रतिबंधित पदार्थांच्या व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अकलूजसह संपूर्ण माळशिरस तालुक्यात गल्लोगल्ली मावा, पानमसाला आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांची विक्री सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये नेहमीच होत असते. काही ठिकाणी अशा पदार्थांची विक्री उघडपणे होत असल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत. त्यामुळे कारवाई केवळ निवडक ठिकाणांपुरती मर्यादित न राहता तालुक्यातील सर्वच पानटपऱ्या व संबंधित दुकानांची व्यापक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अकलूज, नातेपुते, वेळापूर, माळशिरस आणि परिसरातील प्रमुख गावांमध्ये प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांची माहिती सर्वसामान्य नागरिकांनाही असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने सातत्यपूर्ण मोहीम राबवून अशा व्यवसायांवर कायमस्वरूपी आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यवसायिकांना परवाना घेऊनच व्यवसाय करण्याचे आवाहन केले आहे. तसेच गुटखा, मावा, पानमसाला, सुगंधित तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त सुनिल जिंतूरकर आणि अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी सांगितले.
सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थांच्या पुरवठ्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांना यासंदर्भात तक्रारी असल्यास त्यांनी fdasolapur@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा यथोचित गौरव; विठ्ठल निकाळजे सर सेवानिवृत्त

0
प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा यथोचित गौरव; विठ्ठल निकाळजे सर सेवानिवृत्त

प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा यथोचित गौरव; विठ्ठल निकाळजे सर सेवानिवृत्त

फलटण :चव्हाणवाडी (प्रतिनिधी): शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कार्यतत्परतेने सेवा बजावणारे श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल चव्हाणवाडी चे मुख्याध्यापक आयु. विठ्ठल बाबुराव निकाळजे यांनी आपल्या सेवेला साश्रूनयनांनी विराम देत सेवानिवृत्त झाले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेला त्यांचा सत्कार सोहळा अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विठ्ठल निकाळजे सर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता, नेतृत्वगुण, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ आणि शाळाविकासासाठी केलेल्या योगदानाबद्दल भावना व्यक्त केल्या. अनेकांनी निकाळजे सर हे केवळ शिक्षक नसून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व असल्याचे नमूद केले. त्यांनी मुख्याध्यापक म्हणून ही उत्कृष्ट पद्धतीने शाळेचे व्यवस्थापन सांभाळले.

सेवानिवृत्तीप्रसंगी बोलताना विठ्ठल निकाळजे सर म्हणाले, “मी एका सामान्य कुटुंबात जन्माला आलो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष होता, पण जिद्द कधी हरली नाही. मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करायचे आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवायचा, हा विचार मनात ठेवून मी सदैव कार्यरत राहिलो. ज्या-ज्या शाळांमध्ये काम केले, त्या प्रत्येक ठिकाणी रयत सेवक म्हणून प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावली. आज अनेक विद्यार्थी विविध चांगल्या पदांवर कार्यरत आहेत, याचा मला अभिमान वाटतो.”

ते पुढे म्हणाले, “सर्वप्रथम मी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा व या कामांमध्ये ज्यांनी आपलं आयुष्य इथल्या गोरगरिबाच्या, बहुजन समाजाच्या, मुलांच्यासाठी खर्ची घातलं त्या रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या विचार व कार्याला वंदन करतो.

श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी येथे मला खऱ्या अर्थाने चांगले काम उभे करता आले. यासाठी माझ्या शिक्षक सहकाऱ्यांचे, ग्रामस्थांचे, स्कूल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे आणि पालकांचे अमूल्य सहकार्य लाभले. कमिन्स इंडिया कंपनीच्या माध्यमातून शाळेचे वॉल कंपाऊंड, संगणक कक्ष, रंगरंगोटी, माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने बोरवेल, प्रशस्त सुलभ शौचालय युनिट, इंटरऍक्टिव्ह डिस्प्ले बोर्ड यांसारखी अनेक विकासकामे करता आली. या सर्व कार्यात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आदरणीय दत्तात्रय (तात्या) चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.”

शेवटी त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत, “सेवानिवृत्तीनंतरही जिथे माझी गरज भासेल, तिथे मदतीसाठी मी सदैव उपलब्ध असेन. माझे सहकारी शिक्षक, ग्रामस्थ, स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले त्या सर्वांचा मी मनःपूर्वक ऋणी आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.

यावेळी शिक्षक सहकाऱ्यांच्या वतीने विठ्ठल निकाळजे सरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या बीबीएम फॅमिली अर्थात भारतीय बौद्ध महासभा परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही निकाळजे सर यांना पुष्पगुच्छ अर्पण करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

भावनिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनावर कायमस्वरूपी छाप पाडली. सेवानिवृत्ती हा सेवाकाळाचा शेवट नसून समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप सर्व उपस्थितांचे आभार मानून करण्यात आला.

कार्यक्रमास श्री दत्तात्रेय (तात्या) बाबुराव चव्हाण (जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा), श्री प्रशांत शिंदे (उपसरपंच, ग्रामपंचायत चव्हाणवाडी), श्री गोरख शिंदे (ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते), सौ. सुप्रियाताई अहिरेकर (स्कूल कमिटी सदस्य, श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल), श्री चंद्रकांत भोईटे (उपशिक्षक, आदर्श विद्यालय शिरवळ), सौ. लता भोईटे (ग्रंथपाल, आदर्श विद्यालय शिरवळ), श्री ज्ञानेश्वर वाघ (उपशिक्षक, बिजवडी हायस्कूल), मुख्याध्यापक श्री विठ्ठल निकाळजे सर, नूतन प्रभारी मुख्याध्यापक श्री.राजेंद्र राजपुरे, श्री जितेंद्र चव्हाण (फौजी), श्री सचिन अहिरेकर (उद्योजक), श्री किशोर शिंदे, श्री सोमीनाथ घोरपडे (जन संपर्क अधिकारी व समन्वयक,प्रगत शिक्षण संस्था, फलटण), श्री बाबासाहेब जगताप (उपशिक्षक, बिजवडी हायस्कूल), श्री.रामचंद्र मोरे (सुहाना मसाला डिस्ट्रीब्युटर, सातारा जिल्हा), श्री आनंद जगताप (उद्योजक, फलटण), श्री विजय निकाळजे, श्री अजय निकाळजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रयत सेवकाच्या प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासाचा गौरव; विठ्ठल निकाळजे सर सेवानिवृत्त

0
रयत सेवकाच्या प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासाचा गौरव; विठ्ठल निकाळजे सर सेवानिवृत्त

रयत सेवकाच्या प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासाचा गौरव; विठ्ठल निकाळजे सर सेवानिवृत्त

फलटण :चव्हाणवाडी (प्रतिनिधी):
शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कार्यतत्परतेने सेवा बजावणारे आयुष्यमान विठ्ठल बाबुराव निकाळजे यांनी आपल्या सेवेला साश्रूनयनांनी विराम देत सेवानिवृत्ती स्वीकारली. यानिमित्त आयोजित करण्यात आलेला त्यांचा सत्कार सोहळा अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विठ्ठल निकाळजे सर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता, नेतृत्वगुण, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ आणि शाळाविकासासाठी केलेल्या योगदानाबद्दल भावना व्यक्त केल्या. अनेकांनी निकाळजे सर हे केवळ शिक्षक नसून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व असल्याचे नमूद केले.

सेवानिवृत्तीप्रसंगी बोलताना विठ्ठल निकाळजे सर म्हणाले, “मी एका सामान्य कुटुंबात जन्माला आलो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष होता, पण जिद्द कधी हरली नाही. मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करायचे आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवायचा, हा विचार मनात ठेवून मी सदैव कार्यरत राहिलो. ज्या-ज्या शाळांमध्ये काम केले, त्या प्रत्येक ठिकाणी रयत सेवक म्हणून प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावली. आज अनेक विद्यार्थी विविध चांगल्या पदांवर कार्यरत आहेत, याचा मला अभिमान वाटतो.”

ते पुढे म्हणाले, “सर्वप्रथम मी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा व या कामांमध्ये ज्यांनी आपलं आयुष्य इथल्या गोरगरिबाच्या, बहुजन समाजाच्या, मुलांच्यासाठी खर्ची घातलं त्या रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या विचार व कार्याला वंदन करतो.

श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी येथे मला खऱ्या अर्थाने चांगले काम उभे करता आले. यासाठी माझ्या शिक्षक सहकाऱ्यांचे, ग्रामस्थांचे, स्कूल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे आणि पालकांचे अमूल्य सहकार्य लाभले. कमिन्स इंडिया कंपनीच्या माध्यमातून शाळेचे वॉल कंपाऊंड, संगणक कक्ष, रंगरंगोटी, माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने बोरवेल, प्रशस्त सुलभ शौचालय युनिट, इंटरऍक्टिव्ह डिस्प्ले बोर्ड यांसारखी अनेक विकासकामे करता आली. या सर्व कार्यात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आदरणीय दत्तात्रय (तात्या) चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.”

शेवटी त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत, “सेवानिवृत्तीनंतरही जिथे माझी गरज भासेल, तिथे मदतीसाठी मी सदैव उपलब्ध असेन. माझे सहकारी शिक्षक, ग्रामस्थ, स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले त्या सर्वांचा मी मनःपूर्वक ऋणी आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.

यावेळी शिक्षक सहकाऱ्यांच्या वतीने विठ्ठल निकाळजे सरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या बीबीएम फॅमिली अर्थात भारतीय बौद्ध महासभा परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही निकाळजे सर यांना पुष्पगुच्छ अर्पण करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

भावनिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनावर कायमस्वरूपी छाप पाडली. सेवानिवृत्ती हा सेवाकाळाचा शेवट नसून समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप सर्व उपस्थितांचे आभार मानून करण्यात आला.

कार्यक्रमास श्री दत्तात्रेय (तात्या) बाबुराव चव्हाण (जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा), श्री प्रशांत शिंदे (उपसरपंच, ग्रामपंचायत चव्हाणवाडी), श्री गोरख शिंदे (ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते), सौ. सुप्रियाताई अहिरेकर (स्कूल कमिटी सदस्य, श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल), श्री चंद्रकांत भोईटे (उपशिक्षक, आदर्श विद्यालय शिरवळ), सौ. लता भोईटे (ग्रंथपाल, आदर्श विद्यालय शिरवळ), श्री ज्ञानेश्वर वाघ (उपशिक्षक, बिजवडी हायस्कूल), श्री राजेंद्र राजपुरे (प्रभारी मुख्याध्यापक, श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल), श्री जितेंद्र चव्हाण (फौजी), श्री सचिन अहिरेकर (उद्योजक), श्री किशोर शिंदे, श्री सोमीनाथ घोरपडे (प्रकल्पाधिकारी व समन्वयक, कमला निमकर हायस्कूल, फलटण), श्री बाबासाहेब जगताप (उपशिक्षक, बिजवडी हायस्कूल), श्री रामचंद्र मोरे (सुहाना मसाला डिस्ट्रीब्युटर, सातारा जिल्हा), श्री आनंद जगताप (उद्योजक, फलटण), श्री विजय निकाळजे, श्री अजय निकाळजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.