Sunday, November 22, 2026
Home Blog Page 10

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! दोन लाखांची सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा; दोघांना अटक

0
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! दोन लाखांची सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा; दोघांना अटक

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! दोन लाखांची सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा; दोघांना अटक

पालखी महामार्गावरील पायलट ढाब्यासमोर झाला होता जीवघेणा हल्ला; पिस्तूल जाम झाल्याने गोळीबाराचा प्रयत्न फसला, हल्ल्यामागील कारणाचा तपास सुरू

बारामती | प्रतिनिधी : पालखी महामार्गावरील पायलट ढाब्यासमोर उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या हल्ल्यासाठी दोन लाख रुपये दिल्याची माहिती तपासादरम्यान समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी पार्थ वासुदेव अवथळे (वय १९) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०, रा. भिगवण, ता. इंदापूर) या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पायलट ढाब्यासमोर राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून १९ ऑक्टोबर रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फोटो काढण्याचा बहाणा; थेट पिस्तूल रोखले

राणा सूर्यवंशी हे राणा शिपिंग कंपनीचे मालक असून त्यांच्या कंपनीची महाराष्ट्रासह गोव्यातही कार्यालये आहेत. शेतजमीन पाहण्यासाठी ते बारामती परिसरात आले होते. त्यांच्या आगमनाची माहिती मिळाल्यानंतर लक्ष्मीकांत सूर्यवंशी आणि त्यांच्या मित्रांनी स्वागताची तयारी केली होती.

दरम्यान, राणा सूर्यवंशी आपल्या ताफ्यासह जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याशी संपर्क साधला. आपण त्यांचे चाहते असल्याचे सांगून त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी एका तरुणाने अचानक पिस्तूल काढून राणा सूर्यवंशी यांच्यावर रोखल्याचे समोर आले आहे.

पिस्तूल जाम झाल्यामुळे गोळी झाडता आली नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राणा सूर्यवंशी यांनी हल्लेखोराच्या हातावर प्रहार केला. त्यामुळे पिस्तूल खाली पडले. त्यानंतर हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत राणा सूर्यवंशी जखमी झाले.

अंगरक्षकाने पकडले; हाताला चावा घेऊन आरोपी फरार

हल्ल्याच्या वेळी राणा सूर्यवंशी यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल अंगरक्षक म्हणून उपस्थित होता. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अंगरक्षकाने एका आरोपीला पकडण्यात यश मिळवले; मात्र त्याने अंगरक्षकाच्या हाताला चावा घेतला आणि तेथून पळ काढला. अंधाराचा फायदा घेत तो शेताच्या दिशेने पसार झाला, तर दुसरा आरोपी दुचाकीवरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. विविध तपास पथकांच्या माध्यमातून संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. पुढील तपासादरम्यान पुणे शहर पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह पार्थ अवथळे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दोन लाख रुपये दिल्याची माहिती तपासात उघड

पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान ज्ञानदेव शिंदे याने हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पार्थ अवथळे आणि ज्ञानदेव शिंदे यांना २० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या कथित आर्थिक व्यवहारामागे नेमके कोणते कारण होते, हल्ल्याचे नियोजन कसे करण्यात आले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

हल्ल्यामागील सूत्रधार कोण? तपासाकडे लक्ष

उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यामागील नेमके कारण काय, दोन लाख रुपये देण्यामागे कोणाचा उद्देश होता आणि या घटनेमागे आणखी कोणी सूत्रधार आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत.

बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. अटकेतील आरोपींच्या चौकशीतून हल्ल्यामागील कारणे आणि संभाव्य सहभागींविषयी आणखी माहिती समोर येते का, याकडे लक्ष लागले आहे.

#राणासूर्यवंशी #बारामती #बारामतीतालुकापोलीस #पालखीमहामार्ग #हल्लाप्रकरण #दोनलाखांचीसुपारी #पुणेग्रामीणपोलीस #गुन्हेगारी #पोलीसतपास #सातारा #पुणे #SahasTimes #साहसTimes

माण तालुक्यात खळबळ! पवारवाडीत दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर

0
माण तालुक्यात खळबळ! पवारवाडीत दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर

मार्डी परिसरात भीतीचे वातावरण; अज्ञात हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपासचक्रे गतिमान

मार्डी | प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असलेल्या मार्डी येथील पवारवाडीमध्ये एका दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात साळुबाई मारुती पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, त्यांचे पती मारुती शंकर पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मारुती शंकर पवार आणि त्यांच्या पत्नी साळुबाई पवार हे पवारवाडी येथे असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, साळुबाई पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर मारुती पवार गंभीर जखमी झाले. घटनेनंतर जखमी मारुती पवार यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्यासह सहाय्यक उपपोलीस  निरीक्षक मोहन हांगे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेची माहिती घेत तपासाला सुरुवात केली आहे. हल्ल्याचे नेमके स्वरूप, घटनाक्रम आणि त्यामागील संभाव्य कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट

या दाम्पत्यावर हल्ला कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. वैयक्तिक वादासह अन्य संभाव्य कारणांच्या अनुषंगाने तपासाची दिशा निश्चित केली जात असल्याचे प्राथमिक माहितीतून समजते; मात्र हल्ल्यामागील कारणाबाबत अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.

अज्ञात हल्लेखोराची ओळख पटविणे, घटनेशी संबंधित पुरावे गोळा करणे आणि हल्ल्याचा उलगडा करणे, ही पोलिसांसमोरील प्रमुख आव्हाने आहेत. या घटनेमुळे मार्डी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, साळुबाई पवार यांच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून, गंभीर जखमी मारुती पवार यांच्या प्रकृतीबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस तपासातून या घटनेचे नेमके कारण आणि हल्लेखोराबाबत अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आनंद घराघरांतून आणि मनामनांतून फुलवा” : बाबासाहेब जगताप

0
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आनंद घराघरांतून आणि मनामनांतून फुलवा” : बाबासाहेब जगताप

समता नगर (विडणी) येथे बुद्धवंदना, धम्मविचार आणि आतिषबाजीने मंगल दिनाचा उत्साहपूर्ण जागर

फलटण (विडणी) : धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोका विजयादशमी हा केवळ उत्सवाचा दिवस नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि आत्मसन्मानाच्या विचारांचे स्मरण करून ते आपल्या आचरणात आणण्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस तथा बौद्धाचार्य आयु. बाबासाहेब जगताप यांनी केले.
समता नगर (विडणी) येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन भारतीय सामाजिक इतिहासात नवा अध्याय निर्माण केला, याचे महत्त्व विशद केले.
“आज आपण ज्या सन्मानाने आणि अभिमानाने समाजामध्ये वावरतो, विविध क्षेत्रांत पदांवर जातो, शिक्षण घेतो आणि आपले हक्क व अधिकार बजावतो, त्यामागे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान योगदान आहे. त्यांनी आपल्याला केवळ धम्माची ओळख दिली नाही, तर माणूस म्हणून जगण्याचा आत्मसन्मान दिला,” असे आयु. जगताप यांनी सांगितले.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध समाजासाठी अत्यंत मंगल आणि ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगत त्यांनी हा दिवस घराघरांतून साजरा करण्याचे आवाहन केले. या निमित्ताने सकाळपासून विविध घरांमध्ये बुद्धवंदना, बुद्धपूजा आणि महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. विहारांमध्येही धम्मविधी व बुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे समता नगर परिसरात सकाळपासूनच मंगलमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा, शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन उपासक-उपासिकांनी आपल्या घरी आणि कुटुंबामध्ये कशा पद्धतीने साजरा करावा, याबाबत मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, हा दिवस केवळ औपचारिक कार्यक्रम म्हणून न साजरा करता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मविचारांचे स्मरण, आत्मपरीक्षण आणि आचरणाचा दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन बुद्धवंदना करावी, त्रिशरण-पंचशीलाचे पठण करावे, तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करावे. तसेच धम्मग्रंथांचे वाचन करून मुलांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची आणि महामानवांच्या विचारांची ओळख करून द्यावी.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा खरा आनंद धम्माचे आचरण करण्यामध्ये आहे. त्यामुळे या दिवशी मैत्री, करुणा, समता, प्रज्ञा आणि बंधुभाव वाढविण्याचा संकल्प करावा. आपल्या घरातील आनंद नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांसोबत वाटावा. घरामध्ये गोड पदार्थ तयार करून परस्परांना द्यावेत, गरजू व्यक्तींना मदत करावी आणि धम्मविचारांचा प्रसार करावा. “धम्मवंदना आपल्या दैनंदिन आचरणात उतरली आणि घरातील उत्सव समाजातील मैत्रीत रूपांतरित झाला, तरच या मंगल दिवसाचे खरे सार्थक होईल,” असे आयु. घोरपडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी दोन्हीही मोरे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मंगल दिनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी करून उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपासिका अश्विनी मोरे व आयु. बाबासाहेब जगताप यांनी भीमगीत गायले आणि वातावरण निर्मिती केली. बुद्धवंदना, धम्मविचार, परस्परांना शुभेच्छा आणि आनंदाची देवाणघेवाण यामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुक्याचे प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे, न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, बौद्ध उपासक-उपासिका तसेच बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

औंध ग्रामशाखेचा फलक अनावरण व कार्यकारिणी पत्रक वितरण उत्साहात

0
औंध ग्रामशाखेचा फलक अनावरण व कार्यकारिणी पत्रक वितरण उत्साहात

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभेच्या संघटनात्मक कार्याला बळ

खटाव : धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा, खटाव तालुका शाखेच्या अंतर्गत औंध ग्रामशाखेचा फलक अनावरण तसेच ग्रामशाखा कार्यकारिणी पत्रक वितरण समारंभ आज, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. खटाव तालुका शाखेचे अध्यक्ष आयु. अरुण रणदिवे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

औंध ग्रामशाखेच्या फलकाचे अनावरण करून ग्रामशाखेच्या संघटनात्मक कार्याला औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामशाखेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकारिणीची अधिकृत पत्रके वितरित करण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ग्रामस्तरावर संघटन मजबूत करण्याचा आणि तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमास औंध ग्रामशाखेचे सर्व पदाधिकारी तसेच गावातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामशाखेच्या माध्यमातून धम्मकार्य, सामाजिक प्रबोधन, संघटनात्मक उपक्रम आणि समाजहिताचे विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पवित्र पर्वावर औंध येथे ग्रामशाखेचा फलक अनावरण आणि कार्यकारिणी पत्रक वितरण झाल्याने भारतीय बौद्ध महासभेच्या संघटनात्मक वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली असून, ग्रामशाखेच्या पुढील कार्यासाठी उपासक-उपासिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुघी ग्रामशाखेचे उत्साहात उद्घाटन     

0
दुघी ग्रामशाखेचे उत्साहात उद्घाटन     

भारतीय बौद्ध महासभेच्या संघटनात्मक विस्ताराला नवी दिशा; उपासक-उपासिकांचा उत्स्फूर्त सहभाग

कोरेगाव : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत कोरेगाव तालुका ग्राम शाखा दुघी या शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस आयु. सुनील कदम सर आणि कोरेगाव तालुका अध्यक्ष आयु. राजाराम कांबळे सर यांच्या हस्ते ग्रामशाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला.

या कार्यक्रमास तालुका कोषाध्यक्ष निलेश सपकाळ, माजी तालुकाध्यक्ष मिलिंद माने सर, संस्कार सचिव संजय भोसले, संस्कार सचिव दगडू मोरे, समता सैनिक दलाचे अमोल गायकवाड, निलेश मोरे, संदेश कांबळे, रमेश भोसले यांच्यासह दुघी गावातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन ग्रामशाखेच्या माध्यमातून गावातील बौद्ध समाजाला संघटित करून तथागत भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, धम्माचे आचरण, सामाजिक प्रबोधन तसेच समाजातील युवक, महिला आणि नागरिकांना संघटनेच्या विविध उपक्रमांशी जोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

यावेळी दुघी ग्रामशाखेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. ग्रामशाखेच्या अध्यक्षपदी जयसिंग जगताप, तर सचिवपदी दिलखुश जगताप यांची जबाबदारी सोपविण्यात आली. याशिवाय संजय जगताप, मनीषा जगताप, कांता ताई जगताप तसेच माजी सरपंच आणि गावातील मान्यवर उपासक-उपासिका उपस्थित होते.

ग्रामशाखेच्या उद्घाटनामुळे दुघी गावात भारतीय बौद्ध महासभेच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळाले असून, धम्मविचार आणि सामाजिक समतेचा संदेश गावागावांत पोहोचविण्यासाठी ही शाखा प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात उपस्थित उपासक-उपासिकांनी ग्रामशाखेच्या माध्यमातून धम्मकार्य, सामाजिक प्रबोधन आणि संघटन मजबूत करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

बुद्धविहार हे सामाजिक परिवर्तनाचे केंद्र बनावे : भंते विनयपाल महास्थवीर

0
बुद्धविहार हे सामाजिक परिवर्तनाचे केंद्र बनावे : भंते विनयपाल महास्थवीर

बुद्धमूर्तीच्या प्रतिष्ठापनेबरोबरच बुद्धविचारांचे आचरण आणि बाबासाहेबांचे संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन

फलटण : बुद्धविहार हे केवळ बुद्धमूर्ती असलेले धार्मिक स्थळ न राहता सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक परिवर्तनाचे केंद्र बनले पाहिजे. बुद्धमूर्तीसमोर नतमस्तक होण्याबरोबरच तथागत बुद्धांचे विचार आचरणात आणणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वंदनीय भंते विनयपाल महास्थवीर यांनी केले.

भीमस्मृती भूमी, शेरी, मंगळवार पेठ, फलटण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2025 च्या वतीने आयोजित बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या कार्यक्रमात ते धम्मदेसना देत होते. धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमीच्या निमित्ताने बुद्धविचारांचा जागर करताना त्यांनी बुद्धविहाराची सामाजिक जबाबदारी आणि धम्माचरणाचे महत्त्व विशद केले.
बुद्धविहारात तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणे हा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजाच्या प्रबोधनाची जबाबदारी स्वीकारण्याचा प्रसंग आहे, असे सांगून महास्थवीर म्हणाले की, बुद्धमूर्तीसमोर फुले वाहणे, अगरबत्ती लावणे आणि वंदन करणे एवढ्यापुरता बुद्धधम्म मर्यादित नाही. बुद्धांच्या शिकवणीचा अभ्यास करणे, धम्माचे आचरण करणे, समाजातील अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आणि सामाजिक विषमतेविरुद्ध जनजागृती करणे हे बुद्धविहाराचे प्रमुख कार्य असले पाहिजे.

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भाकरी आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. बुद्धविहारातून वाचनालय, अभ्यासिका, धम्मवर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे उपक्रम राबवले पाहिजेत. तरुणांना योग्य दिशा मिळावी, महिलांना स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाची प्रेरणा मिळावी, यासाठी बुद्धविहारांनी पुढाकार घ्यावा. ज्या ठिकाणी ज्ञानाची देवाणघेवाण होते आणि समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात, तेव्हाच त्या बुद्धविहाराचे खरे महत्त्व अधोरेखित होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

धम्माचे महत्त्व सांगताना त्यांनी औषधाचे उदाहरण दिले. डॉक्टरांनी औषध दिले, परंतु त्याचे सेवन केले नाही, तर आजार बरा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे बुद्धधम्माचा स्वीकार करून त्यातील तत्त्वे आचरणात आणली नाहीत, तर अपेक्षित सामाजिक परिवर्तन घडणार नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रज्ञा, करुणा आणि मैत्री ही मूल्ये केवळ भाषणात न राहता दैनंदिन जीवनाचा भाग झाली पाहिजेत. धम्म स्वीकारणे ही सुरुवात आहे, तर धम्मानुसार जगणे हे खरे परिवर्तन आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा संदर्भ देताना त्यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणातून विवेक विकसित करणे, समान ध्येयासाठी संघटित होणे आणि अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने संघर्ष करणे ही समाजाच्या प्रगतीची दिशा आहे. बाबासाहेबांचे पुतळे उभारणे, स्मारके निर्माण करणे आणि जयंती साजरी करणे यांना महत्त्व आहेच; मात्र त्यांच्या विचारांचा प्रसार करून त्यांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

समाजातील ‘मी’ आणि ‘माझे’ या भावनेतून निर्माण होणारा अहंकार आणि स्वार्थ सामूहिक प्रगतीत अडथळे निर्माण करतात. वैयक्तिक प्रतिष्ठा, पद आणि गट यांना समाजहितापेक्षा अधिक महत्त्व दिल्याने परस्परांमध्ये मतभेद आणि दुरावा निर्माण होतो. मतभेद असणे स्वाभाविक असले, तरी त्यांचे रूपांतर मनभेदांत होऊ नये. परस्परांचा आदर राखून समाजाच्या व्यापक हितासाठी एकत्र काम केले पाहिजे. गट-तट बाजूला ठेवून सामाजिक एकजूट निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.

बुद्धांच्या शिकवणीतील प्रज्ञा, शील आणि समाधी यांचे महत्त्व विशद करताना महास्थवीर यांनी मनाचा संयम, विवेकपूर्ण विचार आणि नैतिक आचरण यांवर भर दिला. बुद्धांचे स्मरण केवळ शब्दांपुरते मर्यादित न राहता ते आपल्या वर्तनातून व्यक्त झाले पाहिजे. परस्परांविषयी करुणा बाळगणे, दुसऱ्याच्या मताचा आदर करणे, स्वतःच्या चुका स्वीकारणे आणि गरजू व्यक्तीला मदत करणे, हे धम्माचरणाचे महत्त्वाचे पैलू आहेत, असे त्यांनी सांगितले.

बुद्धविहारातून नियमित धम्मवर्ग, वाचनालय, अभ्यासिका, युवकांसाठी मार्गदर्शन, महिलांच्या स्वावलंबनासाठी उपक्रम आणि सामाजिक प्रश्नांवरील जनजागृती राबवावी. समाजातील कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, यासाठी बुद्धविहारांनी प्रबोधनाची केंद्रे म्हणून कार्य करावे, असे आवाहन वंदनीय विनयपाल महास्थवीर यांनी केले.

धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमी हे केवळ उत्सवाचे दिवस नसून आत्मपरीक्षण करून सामाजिक परिवर्तनाचा संकल्प करण्याचे दिवस आहेत. बुद्धांच्या विचारांचा स्वीकार, बाबासाहेबांच्या संकल्पांच्या दिशेने वाटचाल आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रयत्न हाच या दिवसांचा खरा संदेश असल्याचे त्यांनी आपल्या धम्मदेसनेतून स्पष्ट केले.

भंते विनयपाल महास्थवीर यांनी आगमनानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प माला अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर संपूर्ण मंगळवार पेठेमध्ये चंक्रमण केले. धम्म उपासक आयुष्यमान बी टी जगताप यांच्या घरी भंतेजींना भोजनदान देण्यात आले.

,कार्यक्रमासाठी सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2025 चे पदाधिकारी गणेश भीमराव अहिवळे, अजय कांतीलाल काकडे, गोविंद प्रकाश काकडे, सुरज विजय काकडे, चंद्रकांत महेंद्र मोहिते, कपिल नंदकुमार काकडे, सिद्धार्थ रमेश अहिवळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी सह बौध्द उपासक – उपासिका, बालक – बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुद्धविहार हे सामाजिक परिवर्तनाचे केंद्र बनावे : भंते विनयपाल महास्थवीर

0
बुद्धविहार हे सामाजिक परिवर्तनाचे केंद्र बनावे : भंते विनयपाल महास्थवीर

बुद्धमूर्तीच्या प्रतिष्ठापनेबरोबरच बुद्धविचारांचे आचरण आणि बाबासाहेबांचे संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन

फलटण : बुद्धविहार हे केवळ बुद्धमूर्ती असलेले धार्मिक स्थळ न राहता सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक परिवर्तनाचे केंद्र बनले पाहिजे. बुद्धमूर्तीसमोर नतमस्तक होण्याबरोबरच तथागत बुद्धांचे विचार आचरणात आणणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वंदनीय भंते विनयपाल महास्थवीर यांनी केले.

भीमस्मृती भूमी, शेरी, मंगळवार पेठ, फलटण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2025 च्या वतीने आयोजित बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या कार्यक्रमात ते धम्मदेसना देत होते. धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमीच्या निमित्ताने बुद्धविचारांचा जागर करताना त्यांनी बुद्धविहाराची सामाजिक जबाबदारी आणि धम्माचरणाचे महत्त्व विशद केले.
बुद्धविहारात तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणे हा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजाच्या प्रबोधनाची जबाबदारी स्वीकारण्याचा प्रसंग आहे, असे सांगून महास्थवीर म्हणाले की, बुद्धमूर्तीसमोर फुले वाहणे, अगरबत्ती लावणे आणि वंदन करणे एवढ्यापुरता बुद्धधम्म मर्यादित नाही. बुद्धांच्या शिकवणीचा अभ्यास करणे, धम्माचे आचरण करणे, समाजातील अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आणि सामाजिक विषमतेविरुद्ध जनजागृती करणे हे बुद्धविहाराचे प्रमुख कार्य असले पाहिजे.

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भाकरी आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. बुद्धविहारातून वाचनालय, अभ्यासिका, धम्मवर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे उपक्रम राबवले पाहिजेत. तरुणांना योग्य दिशा मिळावी, महिलांना स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाची प्रेरणा मिळावी, यासाठी बुद्धविहारांनी पुढाकार घ्यावा. ज्या ठिकाणी ज्ञानाची देवाणघेवाण होते आणि समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात, तेव्हाच त्या बुद्धविहाराचे खरे महत्त्व अधोरेखित होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

धम्माचे महत्त्व सांगताना त्यांनी औषधाचे उदाहरण दिले. डॉक्टरांनी औषध दिले, परंतु त्याचे सेवन केले नाही, तर आजार बरा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे बुद्धधम्माचा स्वीकार करून त्यातील तत्त्वे आचरणात आणली नाहीत, तर अपेक्षित सामाजिक परिवर्तन घडणार नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रज्ञा, करुणा आणि मैत्री ही मूल्ये केवळ भाषणात न राहता दैनंदिन जीवनाचा भाग झाली पाहिजेत. धम्म स्वीकारणे ही सुरुवात आहे, तर धम्मानुसार जगणे हे खरे परिवर्तन आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा संदर्भ देताना त्यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणातून विवेक विकसित करणे, समान ध्येयासाठी संघटित होणे आणि अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने संघर्ष करणे ही समाजाच्या प्रगतीची दिशा आहे. बाबासाहेबांचे पुतळे उभारणे, स्मारके निर्माण करणे आणि जयंती साजरी करणे यांना महत्त्व आहेच; मात्र त्यांच्या विचारांचा प्रसार करून त्यांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

समाजातील ‘मी’ आणि ‘माझे’ या भावनेतून निर्माण होणारा अहंकार आणि स्वार्थ सामूहिक प्रगतीत अडथळे निर्माण करतात. वैयक्तिक प्रतिष्ठा, पद आणि गट यांना समाजहितापेक्षा अधिक महत्त्व दिल्याने परस्परांमध्ये मतभेद आणि दुरावा निर्माण होतो. मतभेद असणे स्वाभाविक असले, तरी त्यांचे रूपांतर मनभेदांत होऊ नये. परस्परांचा आदर राखून समाजाच्या व्यापक हितासाठी एकत्र काम केले पाहिजे. गट-तट बाजूला ठेवून सामाजिक एकजूट निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.

बुद्धांच्या शिकवणीतील प्रज्ञा, शील आणि समाधी यांचे महत्त्व विशद करताना महास्थवीर यांनी मनाचा संयम, विवेकपूर्ण विचार आणि नैतिक आचरण यांवर भर दिला. बुद्धांचे स्मरण केवळ शब्दांपुरते मर्यादित न राहता ते आपल्या वर्तनातून व्यक्त झाले पाहिजे. परस्परांविषयी करुणा बाळगणे, दुसऱ्याच्या मताचा आदर करणे, स्वतःच्या चुका स्वीकारणे आणि गरजू व्यक्तीला मदत करणे, हे धम्माचरणाचे महत्त्वाचे पैलू आहेत, असे त्यांनी सांगितले.

बुद्धविहारातून नियमित धम्मवर्ग, वाचनालय, अभ्यासिका, युवकांसाठी मार्गदर्शन, महिलांच्या स्वावलंबनासाठी उपक्रम आणि सामाजिक प्रश्नांवरील जनजागृती राबवावी. समाजातील कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, यासाठी बुद्धविहारांनी प्रबोधनाची केंद्रे म्हणून कार्य करावे, असे आवाहन वंदनीय विनयपाल महास्थवीर यांनी केले.

धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमी हे केवळ उत्सवाचे दिवस नसून आत्मपरीक्षण करून सामाजिक परिवर्तनाचा संकल्प करण्याचे दिवस आहेत. बुद्धांच्या विचारांचा स्वीकार, बाबासाहेबांच्या संकल्पांच्या दिशेने वाटचाल आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रयत्न हाच या दिवसांचा खरा संदेश असल्याचे त्यांनी आपल्या धम्मदेसनेतून स्पष्ट केले.

भंते विनयपाल महास्थवीर यांनी आगमनानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प माला अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर संपूर्ण मंगळवार पेठेमध्ये चंक्रमण केले. धम्म उपासक आयुष्यमान बी टी जगताप यांच्या घरी भंतेजींना भोजनदान देण्यात आले.

कार्यक्रमासाठी सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2025 चे पदाधिकारी गणेश भीमराव अहिवळे, अजय कांतीलाल काकडे, गोविंद प्रकाश काकडे, सुरज विजय काकडे, चंद्रकांत महेंद्र मोहिते, कपिल नंदकुमार काकडे, सिद्धार्थ रमेश अहिवळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी सह बौध्द उपासक – उपासिका, बालक – बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटणमध्ये माळजाई देवीच्या साक्षीने विजयादशमी उत्सवाचा पारंपरिक सोहळा; राजघराण्याच्या हस्ते देवीपूजन

0
फलटणमध्ये माळजाई देवीच्या साक्षीने विजयादशमी उत्सवाचा पारंपरिक सोहळा; राजघराण्याच्या हस्ते देवीपूजन

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार पूजन; सायंकाळी ६.३० वाजता सीमोल्लंघनाचा कार्यक्रम

फलटण (प्रतिनिधी) : सत्याचा असत्यावर विजय आणि चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा सणानिमित्त फलटण शहरातील माळजाई मंदिर परिसरात पारंपरिक धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने आयोजित नवरात्र व दसरा महोत्सवांतर्गत मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी विजयादशमी उत्सव भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

फलटण शहराला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. या परंपरेत माळजाई देवीचे स्थान विशेष महत्त्वाचे मानले जाते. नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या विजयादशमीच्या मंगलपर्वावर देवीचे पूजन, सीमोल्लंघन आणि आपट्याच्या पानांचे वाटप अशा पारंपरिक उपक्रमांतून दसरा साजरा केला जातो. यंदाही या परंपरेचे जतन करत उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

राजघराण्याच्या हस्ते माळजाई देवीचे पूजन

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर फलटणच्या राजघराण्याचे अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते माळजाई देवीचे पूजन करण्यात येणार आहे. या पूजनानंतर दसऱ्याच्या परंपरेतील महत्त्वाचा भाग असलेला सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याची परंपरा विजय, धैर्य, सकारात्मकता आणि नव्या संकल्पांचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे या कार्यक्रमाला धार्मिक महत्त्वाबरोबरच सांस्कृतिक परंपरेच्या जतनाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे.

आपट्याच्या पानांतून जपली जाणार स्नेहाची परंपरा

देवीपूजन आणि सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना तसेच फलटणकर नागरिकांना आपट्याची पाने अर्थात प्रतीकात्मक ‘सोन्याची पाने’ वाटप करण्यात येणार आहेत. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा देण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आजही जपली जाते.

या परंपरेतून परस्परांप्रती प्रेम, आदर, आपुलकी आणि समृद्धीची भावना व्यक्त केली जाते. सामाजिक सलोखा वाढविण्यासह जुन्या सांस्कृतिक रूढी नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम अशा उत्सवांमधून होत असते. माळजाई मंदिरातील विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने फलटणमधील नागरिकांना या पारंपरिक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

भाविक आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने या उत्सवासाठी फलटणमधील सर्व महिला भाविक, नागरिक तसेच लायन्स क्लब फलटण परिवारातील सर्व सन्माननीय सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा तपशील :

  • दिनांक : मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६
  • वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
  • स्थळ : माळजाई मंदिर, फलटण
  • कार्यक्रम : माळजाई देवीपूजन, पारंपरिक सीमोल्लंघन आणि आपट्याच्या पानांचे वाटप

फलटणच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा हा विजयादशमी उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

विजयादशमीच्या सर्व फलटणकर नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!

दुष्काळातही श्रद्धा आणि सामाजिक भान! मलठण नवरात्र मंडळाचा पाणी बचतीचा आदर्श निर्णय

0
दुष्काळातही श्रद्धा आणि सामाजिक भान! मलठण नवरात्र मंडळाचा पाणी बचतीचा आदर्श निर्णय

मूर्ती विसर्जनाऐवजी नगरपरिषदेकडे मूर्ती सुपूर्द; ‘श्रद्धा जपूया, पाणीही वाचवूया’चा प्रेरणादायी संदेश

फलटण (प्रतिनिधी) : एकीकडे फलटण तालुक्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना दुसरीकडे पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत धार्मिक परंपरा जपत सामाजिक जबाबदारीचे भान ठेवण्याची गरज अधोरेखित करणारा एक आदर्श निर्णय मलठण नवरात्र उत्सव मंडळाने घेतला आहे. दुर्गामातेच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन न करता, विधिवत पूजा करून मूर्ती फलटण नगरपरिषदेच्या स्वाधीन करण्याचा मंडळाचा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पाणीटंचाईमुळे विसर्जनाचा प्रश्न ऐरणीवर

निरा उजवा कालवा बंद असल्याने तसेच नदीपात्रातही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने यंदा नवरात्रोत्सवानंतर मूर्ती विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सण-उत्सवांच्या काळात धार्मिक विधी पार पाडताना पाण्याचा वापर कसा कमी करता येईल, याबाबत स्थानिक पातळीवर विचार सुरू आहे. दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याने पर्यावरणपूरक आणि पाणी बचतीला प्राधान्य देणारे पर्याय स्वीकारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष प्रियदर्शनी भोसले आणि पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर यांच्या वतीने शहरातील सर्व नवरात्र उत्सव मंडळांना आवाहन करण्यात आले होते. मूर्तींचे विसर्जन करण्याऐवजी त्या नगरपरिषदेच्या स्वाधीन कराव्यात, पाणी उपलब्ध झाल्यानंतर नगरपरिषदेच्या माध्यमातून मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात येईल, अशी भूमिका मांडण्यात आली होती.

धार्मिक भावना जपत पाणी बचतीला प्राधान्य

नगरपरिषदेच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मलठण नवरात्र उत्सव मंडळाने सामाजिक जाणिवेचा परिचय दिला. मंडळाच्या वतीने दुर्गामातेच्या मूर्तीच्या चरणी केवळ जल अर्पण करून विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर मूर्ती फलटण नगरपरिषदेच्या स्वाधीन करण्यात आली.

धार्मिक श्रद्धा आणि परंपरा जपताना बदलत्या परिस्थितीचे भान ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे मंडळाने आपल्या कृतीतून दाखवून दिले. पाण्याची कमतरता असताना केवळ रूढी म्हणून मोठ्या प्रमाणावर पाणी वापरण्याऐवजी उपलब्ध संसाधनांचा जपून वापर करण्याचा निर्णय घेणे, ही काळाची गरज असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.

समाजापुढे ठेवला जबाबदार उत्सवाचा आदर्श

सण-उत्सव हे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणण्याचे आणि चांगले विचार रुजवण्याचे माध्यमही आहेत. त्यामुळे उत्सव साजरा करताना परिसरातील पाणीटंचाई, पर्यावरणाचे संरक्षण आणि नागरिकांच्या गरजा यांचाही विचार होणे आवश्यक आहे. मलठण नवरात्र उत्सव मंडळाने घेतलेला निर्णय याच सामाजिक भानाचे दर्शन घडवतो.

दुष्काळाच्या काळात पाणी बचतीचा संदेश कृतीतून देणारा हा उपक्रम इतर नवरात्र उत्सव मंडळांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो. धार्मिक भावना दुखावू न देता, श्रद्धेला सामाजिक जबाबदारीची जोड देत उत्सव साजरा करता येतो, हे मंडळाने दाखवून दिले आहे.

नगरपरिषदेकडून मंडळाचे आभार

मलठण नवरात्र उत्सव मंडळाने नगरपरिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष प्रियदर्शनी भोसले आणि पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर यांच्या वतीने मंडळाचे आभार मानण्यात आले.

दुष्काळाच्या संकटात प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन पाणी बचतीसाठी पुढाकार घेतल्यास त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मलठण मंडळाच्या या निर्णयातून सामाजिक एकजूट, संवेदनशीलता आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश मिळत आहे.

‘श्रद्धा जपूया, पाणीही वाचवूया!’ हा विचार केवळ घोषवाक्यापुरता मर्यादित न राहता प्रत्येकाच्या कृतीत उतरला, तर दुष्काळाच्या काळात पाणी बचतीसाठी मोठे योगदान देता येईल. मलठण नवरात्र उत्सव मंडळाने घेतलेला हा निर्णय याच सकारात्मक बदलाची सुरुवात ठरण्याची आशा व्यक्त होत आहे.


हॅशटॅग

#फलटण #मलठण #नवरात्रउत्सव #दुर्गामाता #पाणीबचत #दुष्काळ #पाणीटंचाई #सामाजिकबांधिलकी #पर्यावरणपूरकउत्सव #फलटणनगरपरिषद #श्रद्धाजपूयापाणीवाचवूया #आदर्शउपक्रम #साहसTimes

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराची वाटचाल : विचारातून धम्मक्रांतीकडे – सोमीनाथ घोरपडे

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराची वाटचाल : विचारातून धम्मक्रांतीकडे – सोमीनाथ घोरपडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराची वाटचाल : विचारातून धम्मक्रांतीकडे – सोमीनाथ घोरपडे

फलटण :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर ही भारतीय इतिहासातील केवळ एका व्यक्तीने धर्म बदलल्याची घटना नव्हती. ती शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक विषमतेला, जातिव्यवस्थेला आणि जन्माधिष्ठित अन्यायाला दिलेले एक मूलगामी वैचारिक उत्तर होते. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला, तो कोणत्याही भावनिक आवेगातून किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रभावामुळे घेतलेला नव्हता. त्यामागे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा अनुभव, समाजव्यवस्थेचे सूक्ष्म निरीक्षण, धर्मग्रंथांचा चिकित्सक अभ्यास, मानवी स्वातंत्र्याविषयीची भूमिका आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचे स्वप्न होते. म्हणूनच त्यांच्या धर्मांतराचा इतिहास समजून घेताना केवळ १४ ऑक्टोबर १९५६ या दिवसाकडे पाहून चालत नाही. त्या दिवसामागे जवळपास अर्धशतकाची वैचारिक तयारी, सामाजिक संघर्ष आणि धम्माच्या शोधाची प्रदीर्घ वाटचाल होती.
बाबासाहेबांच्या बालपणापासूनच त्यांना जातीय भेदभावाचे चटके सोसावे लागले. माणूस म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीला केवळ जात कोणती आहे यावरून पाणी, शिक्षण, सार्वजनिक सुविधा आणि सामाजिक सन्मान यांपासून दूर ठेवले जाते, हा अनुभव त्यांच्या मनावर खोलवर कोरला गेला. पुढे उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्यानंतर त्यांना आधुनिक लोकशाही, स्वातंत्र्य, समानता आणि मानवी हक्कांच्या विचारांचा परिचय झाला. त्यामुळे भारतीय समाजातील विषमता आणि आधुनिक मानवी मूल्ये यांच्यातील विरोधाभास त्यांच्या लक्षात अधिक तीव्रतेने आला. त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की, ज्या समाजात एका माणसाला दुसऱ्या माणसापेक्षा जन्मतःच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानले जाते, त्या समाजात खरी लोकशाही कशी निर्माण होणार? आणि ज्या धर्माच्या सामाजिक चौकटीत विषमता पवित्र ठरवली जाते, त्या धर्माच्या चौकटीत समतेचा समाज कसा उभा राहणार?
याच प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जीवनात बुद्धांच्या विचारांचा प्रवेश झाला. १९०७ मध्ये बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. जानेवारी १९०८ मध्ये त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या वेळी कृष्णाजी अर्जुन केळूसकर गुरुजींनी त्यांना त्यांनी लिहिलेले ‘बुद्धचरित्र’ हे पुस्तक भेट दिले. एका तरुण विद्यार्थ्याला मिळालेली ही पुस्तकभेट पुढे भारतीय इतिहासाचा प्रवाह बदलणाऱ्या वैचारिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. बुद्धांचे जीवन, त्यांची विचारपद्धती, दुःखाचे विश्लेषण, कारणांचा शोध, नैतिक आचरण आणि विवेकावर दिलेला भर यामुळे बाबासाहेब बुद्धांकडे आकर्षित झाले. पुढे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी या प्रारंभिक परिचयाचे महत्त्व व्यक्त केले आहे. बुद्ध हा त्यांच्यासाठी केवळ पूजनीय महापुरुष नव्हता; बुद्ध म्हणजे प्रश्न विचारण्याची, सत्याचा शोध घेण्याची आणि माणसाच्या दुःखाचे कारण समजून घेऊन त्यातून मुक्तीचा मार्ग शोधण्याची विवेकवादी परंपरा होती.
बाबासाहेबांचे सामाजिक कार्य पुढे वाढत गेले तसे धर्माचा प्रश्नही त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी येत गेला. १० मे १९२४ रोजी बार्शी येथे झालेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत त्यांनी ‘देशांतर, नामांतर की धर्मांतर’ या विषयावर भाषण केले. सामाजिक अपमान सहन करत राहण्यापेक्षा माणसाने आपल्या स्वाभिमानाचा विचार केला पाहिजे, ही भूमिका त्यांच्या या काळातील विचारांत दिसून येते. बाबासाहेबांसाठी स्वाभिमान हा केवळ वैयक्तिक भावना नव्हती. तो माणसाच्या अस्तित्वाचा मूलभूत अधिकार होता. समाजातील एखाद्या समूहाला सतत कनिष्ठ ठरवून त्याचा आत्मसन्मान नष्ट केला जात असेल, तर त्या व्यवस्थेचा मूलभूत पुनर्विचार करणे अपरिहार्य आहे, असे त्यांच्या विचारांचे स्वरूप होते.
१९३३ मध्ये सुभेदार विश्वास गंगाराम यांना लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी आपला कल बौद्ध धर्माकडे असल्याचे नमूद केले होते. या उल्लेखातून त्यांच्या मनात बौद्ध धम्माविषयीची दिशा किती आधीपासून तयार होत होती, हे लक्षात येते. त्याच काळात १९३४ मध्ये दादर, मुंबई येथे त्यांनी बांधलेल्या बंगल्याला ‘राजगृह’ हे नाव दिले. राजगृह ही बुद्धांच्या काळातील महत्त्वाची नगरी. बुद्धांच्या जीवनाशी आणि बौद्ध परंपरेशी संबंधित नाव आपल्या निवासस्थानाला देणे ही त्यांच्या बौद्ध धम्माविषयीच्या आत्मीयतेची एक अर्थपूर्ण खूण होती.
मात्र बाबासाहेबांचा धर्मविषयक विचार इतका साधा नव्हता की एखादा धर्म आवडला म्हणून तो स्वीकारावा. त्यांना आपल्या समाजासाठी असा धर्म हवा होता, जो माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देईल; जो जन्मावर आधारित उच्च-नीचता मानणार नाही; जो बुद्धीला गुलाम बनवणार नाही; जो नैतिकतेला केंद्रस्थानी ठेवेल; जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेला सामाजिक जीवनाची मूल्ये मानेल. म्हणूनच त्यांनी धर्माचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेतला.
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे त्यांनी केलेली घोषणा या वैचारिक प्रवासातील निर्णायक वळण ठरली. “मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,” हे त्यांचे उद्गार केवळ वैयक्तिक निर्णयाची घोषणा नव्हती. ती जातिव्यवस्थेच्या सामाजिक चौकटीविरुद्धची ऐतिहासिक घोषणा होती. आपल्या समाजाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी धर्माच्या चौकटीचाही पुनर्विचार करावा लागेल, अशी त्यांची भूमिका यातून स्पष्ट झाली.
येवला घोषणेनंतर बाबासाहेबांनी कोणताही धर्म तातडीने स्वीकारला नाही. त्यांनी विविध धर्मांचा अभ्यास केला. इस्लाम, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म आणि बौद्ध धम्म यांचा विचार केला. कारण त्यांना स्वतःसाठी नव्हे, तर लाखो वंचित आणि शोषित लोकांच्या भवितव्यासाठी निर्णय घ्यायचा होता. धर्मांतरानंतर त्यांचे लोक कोणत्या प्रकारच्या सामाजिक जीवनात प्रवेश करतील, त्यांची प्रतिष्ठा काय असेल, त्यांच्या सामाजिक संबंधांवर काय परिणाम होईल आणि त्यांना माणूस म्हणून समान स्थान मिळेल का, या सर्व प्रश्नांचा ते विचार करत होते. त्यामुळे त्यांचा धर्मांतराचा निर्णय हा अत्यंत जबाबदारीने आणि दीर्घ चिंतनातून घेतलेला निर्णय होता.
याच काळात त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात बुद्धविचारातील मूल्ये अधिक स्पष्टपणे दिसू लागली. ८ जुलै १९४५ रोजी मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. या संस्थेला ‘प्रज्ञा, शील, करुणा’ हे ब्रीदवाक्य देण्यात आले. ही तीन शब्दांची मांडणी बाबासाहेबांच्या सामाजिक तत्त्वज्ञानाचा गाभा सांगते. केवळ ज्ञान पुरेसे नाही; ज्ञानाला नैतिक आचरणाची जोड असली पाहिजे आणि त्या आचरणात करुणा असली पाहिजे. प्रज्ञेमुळे माणूस विवेकशील होतो, शीलामुळे त्याचे आचरण नैतिक बनते आणि करुणेमुळे त्याचे जीवन इतरांच्या दुःखाशी जोडले जाते. शिक्षणाच्या माध्यमातून अशा माणसांची निर्मिती करणे हे बाबासाहेबांच्या कार्याचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते.
जून १९४६ मध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना झाली. या महाविद्यालयातील सभागृहांना ‘बुद्ध भवन’ आणि ‘आनंद भवन’ अशी नावे देण्यात आली. सिद्धार्थ हे बुद्धांचे पूर्वनाव, तर आनंद हे बुद्धांचे प्रमुख शिष्य आणि सेवक यांचे नाव. अशा प्रकारे शिक्षणसंस्थांच्या नावांमध्येही बौद्ध परंपरेचे संदर्भ त्यांनी जपले. शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि बुद्धविचार यांचा परस्परसंबंध त्यांच्या कार्यातून सतत जाणवत राहतो.
२ मे १९५० रोजी दिल्लीत बाबासाहेबांच्या उपस्थितीत बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. या काळात त्यांनी बुद्ध धम्माचे स्वरूप स्पष्ट करताना त्याला नीतीधर्माचे स्वरूप दिले. त्यांच्या दृष्टीने धर्माचा केंद्रबिंदू देव, आत्मा किंवा कर्मकांड नसून माणसाचे नैतिक जीवन आणि समाजातील परस्पर संबंध होते. माणूस चांगला कसा जगेल, दुसऱ्या माणसाशी समतेने कसा वागेल आणि समाजात दुःख, अन्याय व शोषण कमी करण्यासाठी कोणती नैतिक मूल्ये आवश्यक आहेत, हा धर्माचा केंद्रस्थानी असलेला प्रश्न असला पाहिजे, असे त्यांचे चिंतन होते.
जून १९५० मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे जागतिक प्रतिनिधींसमोर त्यांनी ‘भारतातील बुद्ध धम्माचा उदय आणि ऱ्हास’ या विषयावर भाषण केले. भारतात जन्मलेल्या बुद्ध धम्माच्या इतिहासाचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. बुद्ध धम्म भारतातून जवळजवळ नाहीसा झाला असला तरी त्याच्या मूलभूत तत्त्वांमध्ये आधुनिक समाजाला दिशा देण्याची क्षमता आहे, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे भारतात बुद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करणे हे त्यांच्या व्यापक सामाजिक परिवर्तनाच्या कल्पनेचा एक भाग बनले.
१९ जून १९५० रोजी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आणि परिसराला ‘नागसेन वन’ असे नाव देण्यात आले. ‘मिलिंद’ आणि ‘नागसेन’ ही नावे बौद्ध परंपरेतील ‘मिलिंदपञ्ह’ या प्रसिद्ध संवादाशी संबंधित आहेत. राजा मिलिंद आणि भिक्खू नागसेन यांच्यातील प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विवेक, तर्क आणि चिकित्सक विचारांची परंपरा दिसून येते. बाबासाहेबांच्या विचारपद्धतीशीही हा विवेकवादी संवाद अत्यंत जवळचा होता.
जुलै १९५१ मध्ये भारतीय बौद्ध संघाची स्थापना करून त्यांनी ‘बौद्ध उपासना पाठ’ ही पुस्तिका प्रकाशित केली. बौद्ध धम्माचा विचार केवळ विद्वानांच्या चर्चेपुरता मर्यादित न राहता सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात उतरावा, यासाठी संघटनात्मक आणि साहित्यिक पातळीवर त्यांनी प्रयत्न केले. धम्म हा जगण्याची पद्धत आहे, ही भूमिका त्यांच्या कार्यातून अधिकाधिक स्पष्ट होत गेली.
नोव्हेंबर १९५१ मध्ये ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या लेखनाला सुरुवात झाली. अनेक वर्षांच्या अभ्यास, चिंतन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या चिकित्सेनंतर हा ग्रंथ १९५६ मध्ये पूर्ण झाला. या ग्रंथातून बाबासाहेबांनी बुद्धांच्या जीवनाचा आणि धम्माचा स्वतंत्र अर्थ लावला. बुद्धांच्या शिकवणीला त्यांनी सामाजिक आणि नैतिक संदर्भ दिला. बुद्ध धम्म हा माणसाला प्रश्न विचारण्याची मुभा देणारा, विवेकाला महत्त्व देणारा आणि नैतिक जीवन जगण्यास प्रेरणा देणारा धम्म आहे, ही त्यांची भूमिका या ग्रंथातून प्रकर्षाने समोर येते.
मे १९५४ मध्ये ब्रह्मदेशातील रंगून येथे झालेल्या बुद्ध जयंती कार्यक्रमास बाबासाहेब उपस्थित राहिले. बौद्ध जगताशी त्यांचे संबंध दृढ होत गेले. १९५४ मध्ये त्यांनी ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ची स्थापना केली आणि ४ मे १९५५ रोजी तिचे रजिस्ट्रेशन झाले. भारतातील नवबौद्ध चळवळीला संघटित स्वरूप देण्यासाठी ही पायाभरणी महत्त्वाची होती.
२५ डिसेंबर १९५४ रोजी देहूरोड येथे बाबासाहेबांच्या हस्ते विहारात बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली. बुद्ध धम्माच्या प्रतीकांना आणि उपासना परंपरेला समाजजीवनाशी जोडण्याची प्रक्रिया यामुळे अधिक दृढ झाली. पुढे १९५६ मध्ये ‘जनता’ या वृत्तपत्राचे नामकरण ‘प्रबुद्ध भारत’ असे करण्यात आले. हे नामकरणही त्यांच्या धम्मदृष्टीशी जोडलेले होते. प्रबुद्ध भारत म्हणजे अंधश्रद्धा, अज्ञान, जातिभेद आणि सामाजिक गुलामगिरीपासून मुक्त होऊन विवेक, समता आणि बंधुतेच्या प्रकाशात जगणारा भारत.
आणि अखेर तो ऐतिहासिक दिवस उगवला. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे केलेल्या धर्मांतराच्या घोषणेनंतर बरोबर २१ वर्षांनी, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. हा सोहळा भारतीय इतिहासातील अभूतपूर्व सामाजिक परिवर्तनाचा क्षण ठरला. बाबासाहेबांनी स्वतः धम्मदीक्षा घेतली आणि त्यानंतर आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्या दिवशी केवळ धर्माची ओळख बदलली नाही; तर एका मोठ्या समाजाने आपल्या मानवी प्रतिष्ठेची नवी ओळख स्वीकारली.
नागपूरची धम्मदीक्षा म्हणजे सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा सामूहिक संकल्प होता. जातिव्यवस्थेने माणसाला जन्माच्या चौकटीत बंदिस्त केले होते; बाबासाहेबांनी त्या चौकटीबाहेर पडून माणूस म्हणून जगण्याचा मार्ग दाखवला. म्हणूनच त्यांचे धर्मांतर हे नकाराइतकेच स्वीकाराचेही प्रतीक होते – जातिभेदाचा नकार आणि समतेचा स्वीकार; अंधश्रद्धेचा नकार आणि विवेकाचा स्वीकार; सामाजिक हीनतेचा नकार आणि मानवी प्रतिष्ठेचा स्वीकार; द्वेषाचा नकार आणि करुणेचा स्वीकार.
बाबासाहेबांनी स्वीकारलेला बुद्ध धम्म त्यांच्या दृष्टीने केवळ वैयक्तिक आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग नव्हता. तो सामाजिक जीवनाला नैतिक अधिष्ठान देणारा धम्म होता. माणसामाणसांमध्ये समता निर्माण करणे, प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणे, स्वातंत्र्य आणि बंधुता वाढवणे आणि विवेकशील समाज घडवणे, हा त्यांच्या धम्मदृष्टीचा केंद्रबिंदू होता. म्हणूनच त्यांच्या धम्मक्रांतीचा अर्थ केवळ धर्मांतर करून संपत नाही. धर्मांतरानंतरचे जीवन कसे जगायचे, हा त्याहून महत्त्वाचा प्रश्न आहे.
आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण बाबासाहेबांच्या धर्मांतराचा इतिहास आठवतो. बुद्धमूर्तीसमोर नतमस्तक होतो, बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करतो, बुद्ध वंदना म्हणतो, धम्माचे पठण करतो. या सर्व गोष्टींना अर्थ तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा बुद्धांचा धम्म आपल्या आचरणात उतरतो. प्रज्ञा म्हणजे विवेकपूर्ण विचार, शील म्हणजे जबाबदार आणि नैतिक आचरण, करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाशी एकरूप होण्याची संवेदना- ही मूल्ये आपल्या जीवनाचा भाग झाली पाहिजेत.
धम्म स्वीकारणे म्हणजे केवळ धार्मिक ओळख बदलणे नव्हे. धम्म स्वीकारणे म्हणजे स्वतःला बदलण्याची प्रक्रिया सुरू करणे. आपल्या विचारांमधील अंधश्रद्धा दूर करणे, जातीय श्रेष्ठ-कनिष्ठतेला नकार देणे, स्त्री-पुरुष समानतेचा स्वीकार करणे, श्रमाचा सन्मान करणे, दुसऱ्या माणसाच्या स्वातंत्र्याचा आदर करणे आणि समाजातील दुर्बल घटकांच्या दुःखाकडे करुणेने पाहणे – हीच धम्माची खरी दिशा आहे.
म्हणूनच ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करताना बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या या प्रदीर्घ प्रवासाचे स्मरण करणे आवश्यक आहे. १९०८ मध्ये मिळालेल्या ‘बुद्धचरित्रा’पासून सुरू झालेला हा प्रवास १९२४ च्या स्वाभिमानाच्या विचारातून पुढे गेला; १९३३ मध्ये बौद्ध धम्माकडे असलेला कल स्पष्ट झाला; १९३५ मध्ये धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा झाली; त्यानंतर दोन दशके अभ्यास, चिंतन, शिक्षण, संघटन आणि धम्मप्रसाराचे कार्य झाले आणि अखेरीस १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे या सर्व वैचारिक प्रक्रियेचे धम्मक्रांतीत रूपांतर झाले.
ही धम्मक्रांती एका व्यक्तीची नव्हती; ती माणूसपणाची होती. ती एका समाजापुरती मर्यादित नव्हती; ती समताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या स्वप्नाची होती. तिचा केंद्रबिंदू धर्माचा बाह्य आविष्कार नसून माणसाच्या अंतःकरणातील परिवर्तन होता.
आज या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे – बाबासाहेबांनी ज्या धम्मासाठी आयुष्यभर चिंतन केले, संघर्ष केला आणि अखेरीस स्वतः स्वीकार केला, त्या धम्मातील प्रज्ञा, शील, करुणा, समता आणि बंधुता आपण आपल्या जीवनात किती आणली आहे? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर शोधणे आणि त्यानुसार आपल्या आचरणात बदल घडवणे, हीच बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला खरी आदरांजली ठरेल.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा म्हणून केवळ उत्सवाचा दिवस नाही; तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. बुद्धांच्या धम्माचा अभ्यास करण्याचा, बाबासाहेबांच्या विचारांना समजून घेण्याचा आणि माणसामाणसांत समता, मैत्री, करुणा व बंधुता निर्माण करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. बुद्धांनी दाखवलेला प्रज्ञेचा मार्ग आणि बाबासाहेबांनी दिलेली सामाजिक समतेची दिशा एकत्र घेऊन चालणे हीच आजच्या काळातील खरी धम्मचळवळ ठरू शकते.
धर्मांतराचे सामाजिक परिणाम
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचा सर्वांत मोठा परिणाम भारतीय समाजाच्या मानसिकतेवर झाला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे झालेली धम्मदीक्षा ही केवळ धार्मिक परिवर्तनाची घटना नव्हती, तर सामाजिक आत्मभान जागृत करणारी क्रांतिकारी घटना होती. शतकानुशतके जातिव्यवस्थेच्या उतरंडीमध्ये खालच्या स्तरावर ढकलल्या गेलेल्या समाजाला बाबासाहेबांनी प्रथमच मोठ्या प्रमाणावर एक नवी ओळख, नवा आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची दिशा दिली. ‘आपण कनिष्ठ नाही, आपण माणूस आहोत आणि आपल्यालाही समान प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे,’ ही भावना धम्मदीक्षेनंतर समाजाच्या मनात अधिक दृढ झाली.
धर्मांतरामुळे अस्पृश्यतेच्या मानसिक गुलामगिरीला मोठा धक्का बसला. अस्पृश्यतेची व्यवस्था ही केवळ सामाजिक व्यवहारापुरती मर्यादित नव्हती; तिचा परिणाम माणसाच्या आत्मसन्मानावर आणि आत्मविश्वासावर होत होता. एखाद्या व्यक्तीला जन्मतःच अपवित्र, कनिष्ठ किंवा सेवक मानले गेले की त्याच्या मनातही स्वतःविषयी न्यूनगंड निर्माण होतो. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीने या मानसिकतेला आव्हान दिले. धर्मांतराच्या माध्यमातून लाखो लोकांनी आपल्या पूर्वी लादलेल्या हीन ओळखीचा त्याग करून बौद्ध म्हणून नवी सामाजिक ओळख स्वीकारली. ही ओळख स्वाभिमानाची, समतेची आणि मानवतेची होती.
या परिवर्तनाचा परिणाम पुढील पिढ्यांवरही झाला. पूर्वी शिक्षण, ज्ञान आणि सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवलेल्या समाजात शिक्षण घेण्याची प्रेरणा वाढली. बाबासाहेबांनी शिक्षणाला मुक्तीचे साधन मानले होते. धर्मांतरानंतर बौद्ध समाजामध्ये शिक्षण, वाचन, लेखन, संघटन आणि सामाजिक प्रबोधन यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले. घराघरांत बाबासाहेबांचे साहित्य, बुद्धांचे विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा इतिहास पोहोचू लागला. त्यामुळे धर्मांतराचा परिणाम केवळ धार्मिक जीवनावर न होता सांस्कृतिक आणि बौद्धिक जीवनावरही झाला.
धर्मांतराने स्त्रियांच्या सामाजिक स्थानाविषयीच्या विचारांनाही नवी दिशा मिळाली. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण सामाजिक आणि राजकीय कार्यातून स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला होता. बौद्ध धम्मातील नैतिक समता आणि मानवी प्रतिष्ठेच्या विचारांमुळे स्त्रियांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहण्याची दृष्टी बळकट झाली. शिक्षण, सार्वजनिक जीवन, सामाजिक चळवळ आणि संघटनात्मक कार्यामध्ये महिलांचा सहभाग वाढण्यास या व्यापक परिवर्तनाने पोषक वातावरण निर्माण केले.
धर्मांतराचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे सामूहिक संघटनशक्तीचा विकास. जातिव्यवस्थेमध्ये माणसांची विभागणी असंख्य जात-जमातींमध्ये करण्यात आली होती. या विभागणीमुळे शोषित समाजाची सामूहिक शक्ती कमकुवत होत होती. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माच्या माध्यमातून या विखुरलेल्या समाजाला एका समान नैतिक आणि सामाजिक ओळखीखाली आणण्याचा प्रयत्न केला. ‘बौद्ध’ ही ओळख जातिभेदाच्या असंख्य भिंती ओलांडून समानतेची जाणीव निर्माण करणारी ठरली. त्यामुळे सामूहिक कार्यक्रम, धम्मदीक्षा, बुद्ध वंदना, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मतेची भावना वाढली.
या धर्मांतराचा भारतीय संस्कृतीवरही दूरगामी परिणाम झाला. भारताच्या प्राचीन बौद्ध परंपरेचे नव्याने स्मरण झाले. बुद्ध, धम्म आणि संघ या संकल्पना पुन्हा सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या. भारतीय इतिहासाकडे केवळ एका धार्मिक किंवा जातीय दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी बौद्ध परंपरेचा, तिच्या तर्कनिष्ठ विचारांचा आणि समतावादी सामाजिक दृष्टिकोनाचा अभ्यास करण्याची प्रेरणा निर्माण झाली. दीक्षाभूमी, बुद्ध विहारे, बौद्ध साहित्य आणि धम्मचळवळीशी संबंधित विविध सांस्कृतिक स्थळे पुढे सामाजिक आणि सांस्कृतिक स्मृतीची केंद्रे बनली.
धर्मांतरामुळे साहित्य आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीलाही नवी ऊर्जा मिळाली. बाबासाहेबांचे जीवन, बुद्धांचा धम्म, जातिव्यवस्थेचे अनुभव, सामाजिक संघर्ष आणि नव्या अस्मितेचा शोध या विषयांवर मोठ्या प्रमाणात लेखन झाले. पुढे दलित साहित्याच्या विकासामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचा आणि बौद्ध धम्माच्या प्रभावाचा महत्त्वाचा वाटा राहिला. कविता, कथा, आत्मकथा, चरित्र, वैचारिक लेखन आणि सामाजिक इतिहास या विविध साहित्यप्रकारांमधून शोषित समाजाचे अनुभव आणि स्वाभिमानाची नवी भाषा व्यक्त झाली. ही साहित्यिक चळवळ केवळ दुःख मांडणारी नव्हती; ती अन्यायाला प्रश्न विचारणारी आणि मानवी प्रतिष्ठेची मागणी करणारी होती.
धर्मांतराने धार्मिक आचरणाच्या स्वरूपातही बदल घडवून आणला. कर्मकांड, अंधश्रद्धा आणि जन्माधारित धार्मिक श्रेष्ठत्वाच्या ऐवजी बुद्ध वंदना, त्रिशरण, पंचशील, धम्मवाचन आणि नैतिक आचरण यांना महत्त्व मिळाले. त्यामुळे धर्म हा केवळ विधींचा विषय नसून जीवनपद्धती आणि नैतिक जबाबदारीचा विषय आहे, ही जाणीव वाढली. बाबासाहेबांनी धम्माला सामाजिक जीवनाशी जोडले असल्यामुळे नवबौद्ध समाजामध्ये धर्म आणि सामाजिक परिवर्तन यांचे नाते अधिक दृढ झाले.
या परिवर्तनाचा राजकीय परिणामही महत्त्वाचा होता. बाबासाहेबांचे राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचे राजकारण नव्हते; ते सामाजिक न्याय, प्रतिनिधित्व आणि समान अधिकारांसाठीचे राजकारण होते. धर्मांतरानंतर नवबौद्ध समाजामध्ये आपल्या हक्कांविषयीची जाणीव अधिक तीव्र झाली. शिक्षण, रोजगार, राजकीय प्रतिनिधित्व, सामाजिक सन्मान आणि घटनात्मक अधिकार यांविषयी जागरूकता वाढली. भारतीय राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार आणि सामाजिक न्यायाची मूल्ये समजून घेण्याची प्रेरणा बाबासाहेबांच्या विचारांमुळे व्यापक झाली.
धर्मांतराने ‘अस्मिता’ या संकल्पनेलाही नवे स्वरूप दिले. पूर्वी समाजावर लादली गेलेली ओळख ही अपमानाची आणि कनिष्ठतेची होती. बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर ‘आम्ही कोण आहोत?’ या प्रश्नाचे उत्तर नव्या पद्धतीने दिले गेले. बुद्धांचे अनुयायी आणि बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून स्वतःकडे पाहण्याची दृष्टी निर्माण झाली. या अस्मितेमध्ये स्वाभिमान, शिक्षण, संघर्ष, संघटन आणि सामाजिक न्यायाची आकांक्षा होती. त्यामुळे नवबौद्ध अस्मिता ही केवळ धार्मिक ओळख न राहता सामाजिक परिवर्तनाची ओळख बनली.
मात्र बाबासाहेबांच्या धर्मांतराचा अर्थ इतर धर्मांविषयी द्वेष निर्माण करणे असा नव्हता. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू माणसाची प्रतिष्ठा आणि समता हा होता. त्यांनी धर्माची निवडही सामाजिक नैतिकतेच्या कसोटीवर केली. त्यामुळे त्यांच्या धम्मचळवळीचा मूलभूत संदेश हा कोणाविरुद्ध द्वेष करण्याचा नसून अन्याय, विषमता आणि अमानवीकरणाविरुद्ध उभे राहण्याचा होता. बंधुता आणि करुणा ही बुद्ध धम्माची मूल्ये त्यांनी सामाजिक जीवनाशी जोडली.
धर्मांतरानंतरही सामाजिक विषमता एका दिवसात नाहीशी झाली नाही. जातीय भेदभाव, आर्थिक विषमता, सामाजिक पूर्वग्रह आणि शिक्षणातील असमानता यांसारख्या समस्या भारतीय समाजात पुढेही राहिल्या. त्यामुळे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा अर्थ एका दिवसात समाज पूर्णपणे बदलला, असा घेता येत नाही. उलट, धम्मदीक्षेने समाजपरिवर्तनासाठी एक नवी वैचारिक आणि नैतिक दिशा दिली. त्या दिशेने पुढे जाण्याची जबाबदारी प्रत्येक पिढीवर आहे.
आजच्या काळात या सामाजिक परिणामांकडे पाहताना बाबासाहेबांच्या धर्मांतराचा सर्वांत मोठा संदेश म्हणजे मानवी प्रतिष्ठेचा अधिकार हा होय. कोणताही माणूस जन्मामुळे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. समाजाची खरी प्रगती ही काही मोजक्या लोकांच्या प्रगतीत नसून सर्वांना समान संधी, समान प्रतिष्ठा आणि न्याय मिळण्यात आहे. बुद्धांचा करुणेचा मार्ग आणि बाबासाहेबांचा समतेचा विचार यांची सांगड घातली तरच धम्मक्रांतीचा सामाजिक अर्थ पूर्णत्वाला जाऊ शकतो.
म्हणूनच १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर घडलेली घटना आजही जिवंत आहे. ती इतिहासाच्या पानांमध्ये बंदिस्त झालेली घटना नाही. जेव्हा एखादा माणूस जातीय हीनतेला नकार देतो, शिक्षणाचा मार्ग स्वीकारतो, विवेकाने विचार करतो, अन्यायाविरुद्ध उभा राहतो, दुसऱ्या माणसाशी समतेने वागतो आणि करुणेने समाजाकडे पाहतो, तेव्हा त्या प्रत्येक कृतीमध्ये धम्मक्रांतीचा सामाजिक आशय जिवंत राहतो.
बाबासाहेबांनी दिलेला संदेश म्हणूनच आजही तितकाच महत्त्वाचा आहे. धर्मांतराने लाखो लोकांना नवी ओळख मिळाली; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांना स्वतःकडे माणूस म्हणून पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. त्यांच्या मनातील न्यूनगंडाला आव्हान मिळाले, शिक्षणाची आस निर्माण झाली, संघटित होण्याची प्रेरणा मिळाली आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष करण्याची शक्ती मिळाली. हीच त्या धम्मक्रांतीची खरी सामाजिक फलश्रुती आहे. आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बुद्धमूर्तीसमोर वंदन करताना आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करताना आपण त्यांच्या विचारांचा सामाजिक अर्थही समजून घेतला पाहिजे. बुद्ध वंदना ही केवळ ओठांची प्रार्थना न राहता आचरणातील करुणा बनली पाहिजे. धम्माचे वाचन हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता विवेकपूर्ण विचारात उतरले पाहिजे. बाबासाहेबांना अभिवादन हे केवळ घोषणांमध्ये न राहता शिक्षण, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायासाठीच्या कृतीत दिसले पाहिजे. कारण बाबासाहेबांची धम्मक्रांती आपल्याला एक मूलभूत सत्य सांगते – माणसाला बदलल्याशिवाय समाज बदलत नाही आणि समाज बदलल्याशिवाय खऱ्या अर्थाने मानवमुक्ती होत नाही. म्हणून बुद्धांचा धम्म आणि बाबासाहेबांचा विचार आपल्या वैयक्तिक जीवनात, कुटुंबात आणि सामाजिक व्यवहारात उतरवणे हीच धम्मचक्र प्रवर्तन दिनाची खरी सार्थकता आहे. नमो बुद्धाय! जय भीम! जय संविधान!”

आयु. सोमीनाथ पोपट घोरपडे, संस्कार सचिव
भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व
मो. नं 9284658690