
सौंदर्याने आता जर या प्रकरणाची सखोल चौकशी केली तर, कार्तिक आणि श्वेताचं बिंग फुटणार आहे. दीपाला त्रास देण्यासाठी कार्तिकनेच हा डाव रचल्याच समोर आल्यानंतर आता सौंदर्या नक्की काय करणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.

सौंदर्याने आता जर या प्रकरणाची सखोल चौकशी केली तर, कार्तिक आणि श्वेताचं बिंग फुटणार आहे. दीपाला त्रास देण्यासाठी कार्तिकनेच हा डाव रचल्याच समोर आल्यानंतर आता सौंदर्या नक्की काय करणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.

मात्र, ‘झेवियर अंकल’चा हा रिव्ह्यू सलमान खानच्या चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही. काही चाहते या ट्वीटवर कमेंट करत आपली नाराजी व्यक्त करत आहेत. तर, काही नेटकरी मात्र या ट्वीटला पाठिंबा देत आहेत. मात्र, झेवियर अंकलच्या या ट्वीटमुळे सलमानच्या चित्रपटाचा प्रेक्षक आता दोन भागांमध्ये विभागला गेला आहे हे नक्की. झेवियर अंकलचा हा ‘किसी का भाई किसी की जान’चा रिव्हू वाचून काहींना हसू देखील आलं आहे. तर, काही लोक या ट्वीटचे आणि रिव्ह्यूचे समर्थन देखील करत आहेत.

भारतीय कुस्तीपटू पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे नाव ‘खाशाबा’ असे असणार आहे. मात्र, या चित्रपटात खाशाबा जाधव यांची भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘खाशाबा’ चित्रपटाचं टीझर पोस्टर रिलीज करण्यात आलं असलं, तरी यात मुख्य अभिनेता कोण असणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये देखील सुवर्ण पदकामागे अभिनेत्याचा चेहरा लपवण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘खाशाबा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः नागराज मंजुळे करणार आहेत. तर, ज्योती देशपांडे या चित्रपटाच्या निर्मितीत सहाय्य करणार आहेत.

बी आर चोप्रा यांच्या या चित्रपटाचे नाव होते ‘तलाक, तलाक तलाक’. १९८२मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट तिहेरी तलाक आणि हलाला यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य करणारा होता. आमिर खानचा ‘पीके’, आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटालाही प्रदर्शित होण्याआधीच खूप विरोध झाला. अभिनेत्री सलमा आगा आणि अभिनेता राज बब्बर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री असल्याने या चित्रपटाविरोधात केवळ निषेधच नाही, तर विविध एफआयआरही दाखल करण्यात आले होते. बी आर चोप्रा यांना हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.

‘Sacnilk’च्या आकडेवारीनुसार, ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास १२ कोटींची कमाई केली आहे. मात्र, ही आकडेवारी अद्याप अंदाजे मानली जात आहे. ही आकडेवारी संध्याकाळपर्यंतची असून, रात्रीच्या शोनंतर चित्रपटाचे कलेक्शन वाढलेले असू शकते. मात्र, पहिल्या दिवशी या चित्रपटाने तब्बल १८ ते २० कोटींची कमाई केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘ट्विटर भाऊ! तुम्ही ऐकत आहात का? आता आम्ही पैसेही भरले आहेत…म्हणजे जे निळे कमळ आहे, ते आता आमच्या नावापुढे लावा भाऊ.. म्हणजे लोकांना कळेल की, आम्हीच आहोत – अमिताभ बच्चन..’ त्यांचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आले होते. अमिताभ बच्चन यांच्यासह शाहरुख खान, सलमान खान, आलिया भट्ट, प्रकाश राज यांसारख्या अनेक स्टार्सच्या अकाऊंटवरून ब्लू टिक्स काढण्यात आल्या होत्या. मात्र, आता बिग बींच्या अकाऊंटला पुन्हा ब्लू टिक लागली आहे.

केवळ नाटक, चित्रपट आणि मालिकाच नाही, तर सुमीत राघवन डबिंग क्षेत्रातही कार्यरत आहे. त्याने अनेक हॉलिवूड चित्रपटातील पात्रांना आपला आवाज दिला आहे. ‘ब्ल्यू स्ट्रीक’, ‘शांघाई नून’, ‘रश हवर’, ‘हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स’, ‘शांघाई नाईट्स’ अशा काही चित्रपटांमध्ये त्याचा दमदार आवाजही ऐकायला मिळतो. सुमीत राघवन याने साकारलेली ‘महाभारता’तील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘महाभारता’त सुमीतने कृष्णाचा सखा ‘सुदामा’ साकारला होता.

मितालीच्या बाबतीत जे खर आहे ते भुवनेश्वरीला कळणार आहे. अधिपतीचा हा पराक्रम ऐकून भुवनेश्वरीला राग अनावर होणार आहे. आता भुवनेश्वरी अधिपतीला शिक्षा करणार का? अधिपती आणि अक्षरा यांचे नाते कसे खुलत जाणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना मिळणार आहेत.

‘इंडियन मॅचमेकिंग 3’ ही टेलिव्हीजन सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज प्रदर्शित झाली आहे. ‘गोस्टेड’ ही अॅक्शन कॉमेडी सीरिज अॅप्पल टीव्हीवर १८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाली आहे.

ब्लू टिक हटवलेल्या अकाऊंटच्या यादीमध्ये क्रिकेटपटू विराट कोहली, क्रिकेटर रोहित शर्मा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महेंद्रसिंग धोनी, विजय, रजनीकांत यांचा समावेश आहे. आता हे सर्वजण ब्लू टिकसाठी पैसे भरणार का तसच ठेवणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.