
Man Dhaga Dhaga Jodte Nava: ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोत मालिकेची नवी जोडी पाहायला मिळाली आहे.

Man Dhaga Dhaga Jodte Nava: ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोत मालिकेची नवी जोडी पाहायला मिळाली आहे.

सातारा : मीना शिंदे : जुन्या पिढीतील नातेसंबंध व आपुलकीची नाळ कायम राखण्यावर कुटुंबातील ज्येष्ठांची मदार राहत आहे. त्यासाठी नवीन पिढीतील मुला-मुलींचे नात्यातच विवाह जुळवले जात आहेत. मात्र, या नात्यातील विवाहामुळे रक्ताचा तुटवडा जाणवणार्या थॅलेसेमिया या आजाराला निमंत्रण मिळत असल्याचे दाहक वास्तव वैज्ञानिक संशोधनामुळे समोर येऊ लागले आहे. तसेच गतिमंद, मतिमंदतेचा धोका वाढत आहे. व्यंग व विविध आनुवंशिक आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
थॅलेसेमिया हा हिमोग्लोबिनची कमतरता, आनुवंशिकता व रक्तात आढळणारे दोष यामुळे होतो. एकाच नात्यातील किंवा एकाच कुळातील व्यक्तीचे लग्न झाल्यास त्यांची नाडी एक आल्याने अशा आई-वडिलांच्या पोटी जन्मणार्या बाळांमध्ये जन्मावेळी किंवा नंतर काही गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. बाळ जन्मल्यानंतर सहा ते आठ महिन्यांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात. थॅलेसेमिया बाधित असणार्या मुलाच्या शरीरामध्ये लाल रक्त पेशी वेगाने कमी होत जातात आणि नवीन पेशींची निर्मितीदेखील होत नाही. या मुलांच्या शरीरात नेहमी रक्ताची कमतरता निर्माण होत असते. सर्वसामान्य शरीरामध्ये 125 दिवसापर्यंत आरबीसी (रक्तातील लाल पेशी) जिवंत राहतात. मात्र, थॅलेसेमिया या आजारपणात आरबीसी फक्त 10 ते 25 दिवसांपर्यंत शरीरामध्ये टिकत असल्याने अशा रुग्णांना 20 ते 25 दिवसांनंतर रक्त चढवावे लागते.
सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे 475 थॅलेसेमियाचे रुग्ण उपचार घेत असून त्यामध्ये जिल्ह्यातील 150 रुग्णांचा समावेश आहे. थॅलेसेमिया वाहक रुग्णांना विशेष लक्षणे जाणवत नसल्याने ही आकडेवारी वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. सिकल पेशी रक्तक्षय हा एक आनुवंशिकतेने होणारा आजार आहे. एखाद्या व्यक्तीला सिकल पेशी रक्तक्षय होण्यासाठी उत्परिवर्तीत जनुकांच्या दोन प्रती आवश्यक असतात. ज्या व्यक्तीना आनुवांशिकतेने दोन्ही पालकांकडून उत्परिवर्तीत हिमोग्लोबिन प्रथिने जनुक मिळते. त्यांना सिकल पेशी रक्तक्षय होतो आणि ज्यांना आनुवांशिकतेने एकाच पालकाकडून जनुक मिळते, त्यांना सिकल पेशी ट्रायट असतो. या रुग्णांना आयुष्यभर ब्लड ट्रांसफ्यूजन आणि आयरन चिलेशनची आवश्यकता लागते. या दोन्ही रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे एकमेव पर्याय आहे. परंतु फक्त 20 ते 25 टक्के रुग्णांना त्यांच्या परिवाराकडून एचएलए आयडेंटिकल डोनर सहज उपलब्ध होतात. त्यामुळे सुमारे 70 टक्के रुग्णांना रक्त चढवणे हा एकमेव पर्याय उपलब्ध होतो. नात्यातील लग्नामुळे जन्मलेल्या अपत्यामध्ये गतिमंद व मतिमंदतेसह शारीरिक व्यंग निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नात्यात लग्न टाळण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
थॅलेसेमिया आजाराची लक्षणे अगदी सामान्य आहेत. सतत अशक्तपणा जाणवणे, थकल्यासारखे वाटणे, ओटीपोटात सूज येणे, गडद लघवीला होणे, त्वचेवर पिवळसर रंग येणे, त्याचबरोबर नखे, डोळे आणि जीभ फिकट होणे, मुलांची वाढ मंदावणे ही या आजाराशी संबंधित काही लक्षणे आहेत. थॅलेसेमियावर बोन मॅरो ट्रान्स्प्लांट हा एकमेव उपचार आहे. परंतु, हे दुर्दैव आहे की, केवळ 20 ते 30 टक्के रुग्णांना त्यांच्या कुटुंबाकडून एचएलए आयडेंटिकल डोनर मिळू शकतो. 70 टक्के रुग्णांमध्ये रक्तगटाच्या अभावी उपचार होऊ शकत नाही. अशावेळी त्यांना वेळोवेळी रक्त द्यावे लागते.

सलमान खानसोबत पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, भाग्यश्री, रामचरण असे अनेक कलाकार या चित्रपटात झळकले आहेत. तर, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचीही छोटीशी भूमिका या चित्रपटात आहे.

प्रत्येक मोठ्या सणाला आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शाहरुख देखील मन्नतच्या बाहेर येतो. ईदच्या निमित्ताने देखील सकाळपासूनच ‘मन्नत’च्या बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. चाहत्यांना त्याला एकदा बघायचे होते. तर, शाहरुखनेही आपल्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. यावेळी शाहरुख कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याने पांढऱ्या टी-शर्टसोबत काळ्या रंगाची डेनिम परिधान केली होती. शाहरुख खानसोबत अबरामही बाल्कनीत आला होता. अबरामने ईदला पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. ‘मन्नत’च्या बाहेर एवढी गर्दी जमली होती की, पोलीसही घटनास्थळी हजर होते.

प्रमुख कलाकार: सलमान खान, पूजा हेगडे, व्यंकटेश, जगपती बाबू, भाग्यश्री, भूमिका चावला, राघव जुयाल, शहनाज गिल, तेज सप्रू, आसिफ शेख आणि सतीश कौशिक

‘सिंघम अगेन’ हा ‘सिंघम’ मालिकेतील तिसरा आणि रोहित शेट्टी कॉप युनिव्हर्समधील पाचवा चित्रपट आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा शेवटचा रिलीज २०२०चा ब्लॉकबस्टर ‘सूर्यवंशी’ होता. या कॉप फ्रँचायझीची सुरुवात २०११मध्ये प्रदर्शित झालेली ‘सिंघम’पासून झाली होती. त्यानंतर ‘सिंघम रिटर्न्स’, ‘सिम्बा’, आणि ‘सूर्यवंशी’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. रोहित लवकरच ओटीटी वर एक अॅक्शन सीरिज देखील सुरू करणार आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

ईदच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय पलक तिवारी, शहनाज गिल, राघव जुयाल, भूमिका चावला आणि पूजा हेगडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला समीक्षकांनीही संमिश्र प्रतिसाद दिला आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ५७००हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. सलमानच्या या चित्रपटासाठी ईद हा सण मोठा फॅक्टर मानला जात आहे.

Happy Birthday Manoj Bajpayee: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी त्याचा ५४वा वाढदिवस साजरा करत आहे.
कण्हेर : पुढारी वृत्तसेवा : रायगाव ( ता. जावली ) येथील छाबडा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा कण्हेर धरणात पोहताना बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १च्या सुमारास घडली असून या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. स्वराज संभाजीराव माने-देशमुख (वय-२३, रा. अकलूज (सध्या रा. सातारा येथील मंगळवार पेठे) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
अक्षय तृतीया व रमजान ईदनिमित्त सर्व कॉलेज व शाळांना सुट्टी असल्याने छाबडा कॉलेजचे सुमारे १० विद्यार्थी मिळून शनिवारी (दि.२२) रोजी धरणावर पोहण्यास गेले होते. दरम्यान स्वराज हा लांबवर धरणातील पाण्यात पोहत गेला असता त्याला दम लागून तो पाण्यात बुडाला. स्वराज बुडाल्याचे समजल्यावर त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. परंतु, धरणात लांब पाण्यामध्ये स्वराज बुडाल्याने वाचवता आले नाही.
स्वराज हा छाबडा येथील कॉलेजमध्ये बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षांमध्ये शिकत असून तो सातारा येथे राहत होता. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ आहे. या घटनेची माहिती मिळताच धरण परिसरातील नागरिकांनी धरणावर गर्दी केली आहे.
याबाबतची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. खोल पाण्यामध्ये बुडालेल्या स्वराजला पाण्याबाहेर काढण्यासाठी छ. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे.
हेही वाचा :

अश्विनीने कधीच आपल्या पुढे जाऊ नये, असे शिल्पीला वाटते. त्यामुळे ती शक्य ते सगळे प्रयत्न करून अश्विनीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. तिने या कटात पती विद्युतचा मित्र विक्रम याची मदत घेतली होती. यासाठी शिल्पीने आपल्या पतीची साथ सोडून विक्रमसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान तिने विद्युतचं घर सोडताना सोबत स्वतःच्या मुलाला अर्थात संजूला देखील सोबत विक्रमकडे नेलं. आता मात्र, विद्युतने शिल्पीसोबतच नातं तोडण्याचा निर्णय घेतला असून, त्याने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. मात्र, घटस्फोटानंतर आपल्या मुलाची म्हणजेच संजूची कस्टडी आपल्याला मिळावी यासाठी तो प्रयत्न करत आहे.