Friday, September 11, 2026
Homeफलटणपालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेत आढावा बैठक संपन्न

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेत आढावा बैठक संपन्न

फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या दालनात आयोजित बैठकीत पालखी मार्गावरील सुरू असलेल्या कामांचा तसेच वारकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून जबाबदारीने काम करावे, असे निर्देश नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, सोहळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे यांनी पालखी शहरात दाखल होण्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी व दिंडी प्रमुखांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे निर्देश प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांनी दिले.

बैठकीस तहसीलदार अभिजीत जाधव, मुख्याधिकारी निखिल जाधव, उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे उपस्थित होते. तसेच नगरसेवक संदीप चोरमले, किरण राऊत, सिद्धाली शहा, मीना काकडे, रोहित नागटिळे, राहुल निंबाळकर, सचिन अहिवळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments