
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
फलटण प्रतिनिधी : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात आज मोठ्या उत्साहात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे जाऊन अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. उपस्थित मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि आदर्श प्रशासनाच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
या कार्यक्रमास फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, नगरसेवक संदीप चोरमले, अशोकराव जाधव, सुदाम मांढरे, रोहित नागटिळे, सचिन अहिवळे, सौ. सुपर्णा अहिवळे, सौ. मीना काकडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव पोकळे, ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले, पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे तसेच युवा नेते तुकाराम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच फलटण शहरातील नागरिक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकहितवादी कार्याला अभिवादन करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.








