Sunday, August 30, 2026
Homeफलटणसोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटणच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य...

सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटणच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटणच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

                                                                    फलटण : सामाजिक बांधिलकी जपत गेल्या तब्बल २० ते २२ वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण यांच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. नगरसेवक सनी सं. अहिवळे तसेच ट्रस्टच्या अध्यक्षा व नगरसेविका सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, समाजातील गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे कार्य सातत्याने करण्यात येत आहे.
बुद्ध निवास येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्या समजून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याचे काम ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधार मिळावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यापूर्वीही ट्रस्टच्या माध्यमातून आदर्श महिलांचा सन्मान, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना बॅग, पुस्तके, वह्या, पेन वाटप, वृक्षारोपण, स्वच्छता अभियानांतर्गत डस्टबिन वाटप, पूरग्रस्तांना मदत तसेच कोरोना काळात अन्नदान असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
दि. ३१ मे २०२६, रोजी सायंकाळी ५.०० वाजता, बुद्ध निवास, फलटण येथे हा कार्यक्रम संपन्न होणार असून विद्यार्थ्यांनी नाव, इयत्ता व मोबाईल क्रमांक पाठवून नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन मा. खा. रणजितसिंह (दादा) नाईक निंबाळकर करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सचिन पाटील साहेब असणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, मा. अभिजीत भैया नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ. सुपर्णा सनी अहिवळे, नगरसेवक श्री. सचिन अहिवळे, नगरसेविका सौ. मीना काकडे तसेच सर्व नगरसेवक व मंगळवार पेठेतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
नोंदणी व संपर्कासाठी : 9960861186
9762419762
9309156688
9021121414
9850032176
9890673473
समस्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments