समतानगर बुद्ध विहारात पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांची प्रभावी धम्मदेशना

0
5

समतानगर : समतानगर येथील बुद्ध विहारामध्ये द ग्रेट हॅपिनेस चैनलचे संचालक पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांच्या सदिच्छा भेटीने अत्यंत मंगलमय वातावरण निर्माण झाले. कालकथित सुमन सचिन मोहिते यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पूज्य भंते यांनी “अनित्य, अनात्म आणि दुःख” या गहन विषयावर अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक आणि सुश्राव्य धम्मदेशना देत उपस्थितांना धम्ममय अनुभूती दिली.
पूज्य भंते यांच्या शांत, मधुर आणि प्रभावी वाणीने उपस्थित संपूर्ण जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. जीवनाचे वास्तव, मानवी दुःखाची कारणमीमांसा आणि तथागत भगवान बुद्धांनी दाखविलेला मुक्तीचा मार्ग त्यांनी अत्यंत साध्या, सुबोध आणि हृदयस्पर्शी शब्दांत उलगडून सांगितला. त्यांच्या धम्मदेशनातून आत्मचिंतन, प्रज्ञा आणि करुणेचा अनमोल संदेश उपस्थितांना लाभला.
धम्म, विनय आणि करुणेची अद्वितीय उंची लाभलेले पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांचे विचार व कार्य समाजाला नवी दिशा देणारे असून त्यांच्या प्रेरणादायी धम्मसेवेला उपस्थितांनी मानवंदना अर्पण केली. कार्यक्रमात अनेक धम्मप्रेमी, उपासक-उपासिका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.