Sunday, August 30, 2026
Homeफलटणफलटणच्या डॉ. प्रसाद जोशी यांना प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’

फलटणच्या डॉ. प्रसाद जोशी यांना प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’

फलटणच्या डॉ. प्रसाद जोशी यांना प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’

फलटणच्या डॉ. प्रसाद जोशी यांना प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’
फलटण : समर्पित, सहानुभूतीपूर्ण आणि आधुनिक ऑर्थोपेडिक सेवेमुळे रुग्णांचा विश्वास संपादन करणारे फलटण येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना प्रतिष्ठित ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त २३ मे २०२६ रोजी पुण्यातील बालेवाडी येथील द ऑर्किड हॉटेलमध्ये आयोजित भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच लोकमत पुण्याचे मुख्य संपादक संजय आवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे फलटणमधून दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या ऑर्थोपेडिक सेवेला राज्यस्तरावर मान्यता मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि. ही संस्था गेल्या १४ वर्षांपासून पर्यावरणीय परिसंस्था व्यवस्थापन क्षेत्रात विविध पथदर्शी उपक्रम राबवत आहे. संस्थेने भारताचे नॉर्वेमध्ये प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कार्य केले असून, संस्थेचे श्री. सागर अहिवळे आणि श्रीमती आरती भोसले अहिवळे यांच्या कार्याचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्रसाद जोशी यांनी ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि., श्री. सागर अहिवळे तसेच श्रीमती आरती भोसले अहिवळे यांचे मनःपूर्वक आभार मानले. हा सन्मान समाजहितासाठी अधिक प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments