Monday, August 17, 2026
Homeफलटणफलटणमध्ये मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची भर उन्हात पाहणी

फलटणमध्ये मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची भर उन्हात पाहणी

फलटण :- फलटणमध्ये मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची भर उन्हात पाहणी
फलटण शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांना वेग आला असून, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः भर उन्हात विविध भागांची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. शहरातील मारवाड पेठ आणि दगडी पूल परिसरात सुरू असलेल्या नाला स्वच्छता मोहिमेची त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर फलटणकर नागरिक आता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांमध्ये साचलेल्या घाणीमुळे दुर्गंधी आणि सांडपाण्याच्या समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेकडून पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे स्वतः रस्त्यावर उतरून कामांची पाहणी करत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी माजी नगरसेवक अनुप शहा यांनी नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. “पूर्वीचे सत्ताधारी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत होते. मात्र विद्यमान नगराध्यक्षांना जनतेच्या अडचणींची जाणीव असून ते स्वतः उन्हाची पर्वा न करता कामांची बारकाईने पाहणी करत आहेत,” असे अनुप शहा यांनी सांगितले.
नगराध्यक्षांनी प्रभाग क्रमांक ८ आणि १२ मधील नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. शनिवार-रविवारची सुट्टी असतानाही त्यांनी दुपारच्या वेळेत प्रत्यक्ष भेट देत स्वच्छता मोहिमेवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments