Tuesday, September 15, 2026
Homeसातारामाजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची...

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची आरती केली


फलटण : राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील “सागर” निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाची आरती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाली. गणेशोत्सवाच्या या पवित्र निमित्ताने अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा वाघ, आमदार प्रवीण दरेकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार गोपीचंद पडळकर आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ओबीसी नेते माणिकराव सोनवलकर यांचा समावेश होता.

सागर निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणेशोत्सवाचे आकर्षण हे दरवर्षी वाढत चालले आहे. गणपतीच्या आरतीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध भागातील लोकांची भेट फडणवीस यांच्या निवासस्थानी होत असते, ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक चर्चाही रंगते.

यावेळी आरतीनंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि पुढील वर्षी पुन्हा येण्याचे आशिर्वाद घेतले. गणेशोत्सवाच्या या पवित्र प्रसंगी गणेश भक्तांनीही मोठ्या श्रद्धेने भाग घेतला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments