Monday, September 14, 2026
Homeफलटणफलटण बंदची हाक; कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र

फलटण बंदची हाक; कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र

आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस; प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनाची लवकर पूर्तता करण्याची मागणी

फलटण | प्रतिनिधी | दि. १४ सप्टेंबर २०२६ :फलटण नगर परिषदेच्या हद्दीतील कुरेशीनगर येथील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीवर प्रशासनाने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्या आश्वासनाची तातडीने पूर्तता करून ठोस निर्णय जाहीर करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी गोरक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी कायम आहे.

दरम्यान, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळवण्यासाठी समस्त हिंदू समाज, गोरक्षक आणि सामाजिक संस्थांच्या वतीने बुधवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी फलटण बंदची हाक देण्यात आली आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी ठीक ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, फलटण येथे सर्व संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. व्यापारीवर्ग तसेच फलटण शहरातील नागरिकांनी या बंदला प्रतिसाद देऊन आंदोलनाला सहकार्य करावे, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.

“आपला एक दिवस कत्तलमुक्त फलटणसाठी… कत्तलमुक्त फलटण झालंच पाहिजे!” असा निर्धार व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्तता करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments