Friday, September 11, 2026
Homeसाताराआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सूर्यकांत सुस्तरफोड सर यांची निवड

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सूर्यकांत सुस्तरफोड सर यांची निवड

जि. प. प्राथमिक शाळा परतवडीच्या विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षकाचा सन्मान; मुख्याध्यापिका स्वाती साळवे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीकडून अभिनंदन

माण : सातारा जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या माण तालुका आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतवडी, ता. माण, जि. सातारा येथील विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील व कर्तव्यनिष्ठ शिक्षक श्री. सूर्यकांत सुस्तरफोड सर यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि भवितव्याला आकार देणारा खरा शिल्पकार असतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे, अध्यापनामध्ये विविध उपक्रमांचा प्रभावी वापर करणारे तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेले सूर्यकांत सुस्तरफोड सर यांच्या कार्याची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि सामाजिक जाणिवांना प्रोत्साहन देण्यासाठी सुस्तरफोड सर सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या अध्यापनातील नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा यामुळे ते विद्यार्थी व पालकांमध्येही प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतवडीच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती साळवे मॅडम, उपशिक्षिका सौ. रुपाली पवार, शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी सूर्यकांत सुस्तरफोड सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाची, मेहनतीची आणि उत्कृष्ट अध्यापन कार्याची योग्य पावती असून, त्यांच्या कार्यामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि लौकिकाला निश्चितच बळकटी मिळाली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सूर्यकांत सुस्तरफोड सर यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments