Monday, August 3, 2026
Home Blog Page 586

कुंभमेळ्यात पृथ्वीवरील सर्वात मोठं रहस्य! त्रिवेणीजवळ 3 नद्यांचा संगम होतो पण दिसतात फक्त दोनच नद्या? तिसऱ्या नदीचे गूढ काय?

0
कुंभमेळ्यात पृथ्वीवरील सर्वात मोठं रहस्य! त्रिवेणीजवळ 3 नद्यांचा संगम होतो पण दिसतात फक्त दोनच नद्या? तिसऱ्या नदीचे गूढ काय?



त्रिवेणीच्या संगमावर न दिसणारी नदी कोठेही अस्तित्वात नाही आणि ती केवळ एक पौराणिक संकल्पना  असल्याचा दावा केला जातो. मात्र, पौराणिकदृष्ट्या ही नदीला विशेष महत्व आहे. या नदीच्या काठावर ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र होते असे म्हणतात. 



Source link

Viral Video : चक्क काळ्या-पिवळ्या टॅक्सीमधून उतरला सलमान खान, चाहत्यांनी पाहिले अन्…

0
Viral Video : चक्क काळ्या-पिवळ्या टॅक्सीमधून उतरला सलमान खान, चाहत्यांनी पाहिले अन्…


बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान सूत्रसंचालन करत असलेला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १८’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या शोनंतर सलमान आपला सगळा वेळ सिकंदर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये घालवत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान निळ्या रंगाचा शर्ट घालून टॅक्सीतून उतरून एका वस्तीमध्ये जाताना दिसत आहे. त्याच्यासोबत काही लोक देखील दिसत आहेत. आता हा नेमका कुठला व्हिडीओ आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.



Source link

सैफ अली खान इतक्या लवकर ठणठणीत कसा झाला? संजय निरुपम यांनी शंका व्यक्त करताच राजकीय खडाजंगी

0
सैफ अली खान इतक्या लवकर ठणठणीत कसा झाला? संजय निरुपम यांनी शंका व्यक्त करताच राजकीय खडाजंगी


चोरट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान याला काही दिवसांतच डिस्चार्ज मिळाला आणि तो नेहमीच्या स्टाइलनं स्वत: चालत घरी पोहोचला. रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात पोहोचलेला सैफ इतक्या लवकर बरा कसा झाला, अशी शंका शिंदे गटाचे संजय निरुपम यांनी उपस्थित केली आहे. त्या रात्री नेमकं काय झालं होतं हे कोणी सांगेल का, अशी विचारणा निरुपम यांनी केली आहे.



Source link

‘मला कोणीतरी वाचवा…’, भररस्त्यात पाठलाग करुन चाकूने भोसकलं; मदत सोडून लोक व्हिडीओ काढत राहिले

0
‘मला कोणीतरी वाचवा…’, भररस्त्यात पाठलाग करुन चाकूने भोसकलं; मदत सोडून लोक व्हिडीओ काढत राहिले



रस्त्यात रिक्षाचालक एका व्यक्तीची हत्या करत असताना लोक मदत करायची सोडून व्हिडीओ काढत बसले होते. 
 



Source link

AskSRKमध्ये चाहत्याने मागितला शाहरुखकडे ओटीपी, मुंबई पोलिसांनी दिले मजेशीर उत्तर

0
AskSRKमध्ये चाहत्याने मागितला शाहरुखकडे ओटीपी, मुंबई पोलिसांनी दिले मजेशीर उत्तर


बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. अभिनेता अनेकदा आपल्या चाहत्यांशी संवाद साधतो, त्यांच्या प्रश्नांना मजेशीर उत्तरे देतो. अशातच आता अभिनेत्याचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे. खरं तर, ट्विटरच्या आस्क मी एनीथिंग या फिचरच्या माध्यमातून एका चाहत्याने अभिनेत्याला ओटीपी विचारला होता. त्यावर शाहरुखने तर उत्तर दिलेच. पण मुंबई पोलिसांनी देखील उत्तर देत चाहत्याची फिरकी घेतली आहे. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया…



Source link

Jalgaon Train Accident : आगीच्या अफवेने प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या.. समोरून येणाऱ्या एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं

0
Jalgaon Train Accident : आगीच्या अफवेने प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या.. समोरून येणाऱ्या एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं


Jalgaon train accident : जळगावमधील पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसच्या डब्यातून धूर निघाल्यानंतर आगीच्या भीतीनं अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या दिशेकडून येणाऱ्या एक्स्प्रेसनं प्रवाशांना उडवलं. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पुष्पक एक्सप्रेसने ब्रेक मारल्याने आगीच्या ठिणग्या निघाल्या.



Source link

Ladki Bahin Yojana : अपात्र महिलांना ९००० रुपये सरकारला परत करावे लागणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

0
Ladki Bahin Yojana : अपात्र महिलांना ९००० रुपये सरकारला परत करावे लागणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं


Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करून महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. लाडकी बहीण योजना निवडणुकीत गेमचेंजर ठरली व महिलांच्या मतांच्या जोरावर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले. निवडणुकीनंतर कसाबसा एक हल्ला महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू केली आहे. या छाननीत अनेक अर्ज बाद ठरण्याची शक्यता आहे. काही महिलांनी स्वत:हून आपले अर्ज मागे घ्यायला सुरूवात केली आहे. त्यातच अपात्र महिलांना आता योजनेचे १५०० रुपये बंद होणार असल्याची माहिती असून अशा महिलांना याआधी दिलेला ९००० हजार रुपयांचा लाभही परत घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे, यावर महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे.



Source link

देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार? ‘आई तुळजाभवानी’मध्ये वेगळे वळण

0
देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार? ‘आई तुळजाभवानी’मध्ये वेगळे वळण


कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका अतिशय लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता या मालिकेत वेगवेगळ्या अनेक घटना घडत आहेत. आता देवीने शाकंभरी देवीच्या रुपात दर्शन दिले आणि सृष्टीचे महत्त्व सांगितले. तर दुसरीकडे, देवीच्या हाकेला ऐकून काळभैरव भूतलावर प्रकटले आहेत. देवी आपलं अढळ स्थान शोधण्याची जबाबदारी भैरवाला देते. या आठवड्याच्या उत्तरार्थात तुळजाभवानी आणि भवानीशंकर यांच्या नात्यातील रुसवे – फुगवे, नात्यातील गोड क्षण बघायला मिळणार आहेत. त्यांच्यातला समज – गैरसमजाचा गुंता अधिक वाढत जात असून भवानीशंकर रूपात पृथ्वीवर निवास करणाऱ्या महादेवांना देवी ओळखणार का ? हा रंजक कथाभाग उलगडत आहे.



Source link

NDA ला मोठा झटका! नितीश कुमार यांनी सोडली भाजपाची साथ, मणिपूरमध्ये बिघडलं राजकीय गणित

0
NDA ला मोठा झटका! नितीश कुमार यांनी सोडली भाजपाची साथ, मणिपूरमध्ये बिघडलं राजकीय गणित


मणिपूरमध्ये भाजपाला फार मोठा धक्का बसला आहे. याचं कारण एनडीएमध्ये सामील असणाऱ्या नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने मणिपूरमध्ये एन बीरने सिंह यांच्या नेतृत्वातील सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे. आपले एकमेव आमदार मोहम्मद अब्दुल नासिर आता विरोधी पक्षात बसतील असं जेडीयूने स्पष्ट केलं आहे. जेडीयूने राज्यपालांना पत्र लिहून पाठिंबा मागे घेत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. 

जेडीयूने घेतलेल्या या निर्णयाचा मणिपूरमधील भाजपाच्या नेतृत्वातील सरकारवर कोणताही प्रभाव होणार असून, सरकार स्थिरच आहे. पण या निर्णयामागे अनेक राजकीय गणितं असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचं कारण जेडीयू केंद्र सरकार आणि बिहारमध्ये भाजपाच्या प्रमुख मित्र पक्षांपैकी एक आहे. 

भाजपाचा पाठिंबा मागे घेण्याची घोषणा जेडीयूच्या मणिपूर युनिटचे प्रमुख क्षेत्रीमायुम बिरेन सिंह यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना पत्र लिहून केली आहे. 

जेडीयूने पत्रात म्हटलं आहे की, 2022 च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत पक्षाने सुरुवातीला सहा जागा जिंकल्या होत्या. तथापि, नंतर पाच आमदार भाजपमध्ये सामील झाले. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ अधिक मजबूत झाले. या पाच आमदारांचा खटला भारतीय संविधानाच्या १० व्या अनुसूचीअंतर्गत सभापतींच्या न्यायाधिकरणासमोर प्रलंबित आहे.

जेडीयूच्या इंडिया ब्लॉकसोबतच्या पूर्वीच्या युतीचा हवाला देत पत्रात पाठिंबा काढून घेतल्याची पुष्टी करण्यात आली आहे. पत्रात असंही म्हटलं आहे की मणिपूरमधील जेडीयूचे एकमेव आमदार मोहम्मद अब्दुल नासिर हे विधानसभेच्या अलिकडच्या अधिवेशनात विरोधी पक्षांसोबत बसले होते.

गेल्या वर्षी मेघालयात अशाच प्रकारच्या घडामोडींनंतर जेडीयूने कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. दरम्यान, जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गेल्या वर्षी इंडिया ब्लॉकसोबत युती केल्यानंतर एनडीएमध्ये परतले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, ते केंद्रात आणि राज्यात एनडीएमध्ये परतले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, केंद्र आणि राज्यात एनडीएसाठी जेडीयूची भूमिका महत्त्वाची बनली आहे.

 





Source link

आता मनुष्य नव्हे तर रोबो लढणार युद्ध! काय आहे ‘रोबो सैनिक’, इराण घेणार नव्या तंत्रज्ञानाची चाचणी

0
आता मनुष्य नव्हे तर रोबो लढणार युद्ध! काय आहे ‘रोबो सैनिक’, इराण घेणार नव्या तंत्रज्ञानाची चाचणी


अमेरिकेतील ट्रम्प सरकारची सुरुवात आणि इस्रायलबरोबरचा संघर्ष या दरम्यान इराणच्या लष्कराने युद्धाच्या आघाडीवर रोबो सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणच्या एका उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लष्कर लढाऊ रोबोटची चाचणी घेत आहे आणि अनेक नवीन मॉडेल्स विकसित करत आहे. तेहरान टाईम्स या इराणी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या लष्कराने दोन महिन्यांपूर्वीच आपल्या युद्ध सरावांमध्ये रोबोट योद्ध्यांचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे.



Source link