
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज झाले की आपल्या दरे गावी भेट देतात. आपली नाराजी अप्रत्यक्षपणे ते व्यक्त करतात, त्याची राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा होते. सध्या महायुती (Mahayuti) सरकारमध्ये असो किंवा यापूर्वीच्या युती सरकारमध्ये असो, एकनाथ शिंदेंची नाराजी सातत्याने दिसून आली आहे. सन 2005 ते 2025 या 20 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकनाथ शिंदे 9 वेळा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी, अनेकदा ते आपल्या दरे गावी गेल्याचंही दिसून आलं. सर्वप्रथम ते 2005 मध्ये नाराज झाले होते. एकनाथ शिंदे यांच्यावर 2005 साली शिवसेना (Shivsena) ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत महापौरपदाचा मान हा ठाणे शहर की वागळे इस्टेट पट्ट्याला दयायचा यावरून वाद झाला होता. तेव्हा सर्वात प्रथम एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती. तेव्हा महापौरपद नेमके कोणाला द्यायचे, यावर शिवसेनेत दोन गट पडले होते. अखेर मोठया वादानंतर तेव्हा महापौर पदाचा मान हा राजन विचारे यांना मिळाला होता.
सन 2006 साली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावर ठाणे जिल्हा संपर्क नेते ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी देसाई यांच्या या नियुक्तीने एकनाथ शिंदे हे नाराज झाले होते. शिंदे यांची नाराजगी जास्त वाढू नये म्हणून त्यावेळी तेव्हाचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी 2007 ला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर देसाई यांची नियुक्ती रद्द केली. पुढे 2009 ला ठाणे लोकसभा मतदारसंघातून विजय चौगुले यांचा पराभव झाला. त्यानंतर अखंड असलेल्या ठाणे जिल्ह्याची शिवसेनेत दोन भागात विभागणी करण्यात आली. यात ठाणे आणि कल्याण असे शिवसेनेत दोन स्वतंत्र जिल्हाप्रमुख नेमण्यात आले. तेव्हा ठाण्याच्या जिल्हाप्रमुख पदी एकनाथ शिंदे आणि कल्याणचे प्रभारी जिल्हाप्रमुख पदी गोपाल लांडगे यांची नियुक्ती शिवसेना नेतृत्वाने केली होती. त्यावेळी जिल्हाप्रमुखपदाच्या झालेल्या विभागणीवरना एकनाथ शिंदे हे नाराज होते. तेव्हाही शिंदे यांची नाराजगी दूर करण्यासाठी त्यांच्याकडे अखंड ठाणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून पक्षाने जबाबदारी दिली.
राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सातत्याने होत होती. त्यातच पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे यांना मंत्रिपदाची ऑफर दिल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात होत होती. मात्र, त्यावेळीही एकनाथ शिंदे यांची नाराजगी दूर करण्यात तत्कालीन शिवसेना नेतृत्वाला यश आले होते. पुढे 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा ही युती तुटली. त्यावेळी, विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले. मात्र, अवघ्या एका महिन्यातच शिवसेना ही भाजपा बरोबर राज्यातील सत्तेत सहभागी झाली. तेव्हा शिवसेनेच्या वाट्याला आलेले महत्वाचे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले. परंतु एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व वाढू नये म्हणून त्यावेळी शिवसेनेने जाणीवपूर्व उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नव्हते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात तेव्हा होत होती. तेव्हा उपमुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात होते. पण ही नाराजगी दूर करण्यात तत्कालीन पक्ष नेतृत्वाला तेव्हा यश आले होते.
पुढे 2019 ला घडलेल्या राजकीय उलथा पालथीमध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरवर जाऊन राज्यात सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये सुरुवातीला मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र, तेव्हा मुख्यमंत्री पदावर स्वतः खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यामुळे तेव्हा एकनाथ शिंदे हे नाराज होते. परिणामी तेव्हाही शिंदे यांची ही नाराजगी दूर करण्यासाठी शिवसेनेकडून त्यांना नगर विकास या महत्त्वाच्या खात्याची जवाबदारी सोपविण्यात आली. मात्र, त्यानंतरही सातत्याने एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षात नाराज असल्याची चर्चा होतच होती. त्यातच 2022 ला झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे यांना निवडणूक रणनीती पासून लांब ठेवण्यात आले. या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढतच गेली. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसानंतरच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या रात्री एकनाथ शिंदे यांचे ऐतिहासिक असे बंड झाले. या बंडा नंतर शिवसेना फुटून त्याची दोन पक्षात विभागणी झाली. या बंडा नंतर भाजपाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेला किती जागा मिळाव्या यावरून चर्चा सुरू असताना देखील एकनाथ शिंदे शेवटपर्यंत 15 जागांसाठी अडून होते. त्यासाठी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करून त्यांनी लोसभेला 15 जागा मिळवल्या. त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील जास्त जास्त जागा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे शेवटपर्यंत वाटाघाटी करतच होते. या दोन्ही निवडणुकांच्या जागा वाटपावरून शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. दरम्यान अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार एकनाथ शिंदे यांनी सांभाळला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका ही महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या. या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व असे यश मिळाले. त्यात सर्वाधिक जागा या भाजपाच्या निवडून आल्या. परिणामी भाजपने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला. तेव्हा भाजपाकडे मुख्यमंत्री पद जाणार असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. अनेक दिवस चर्चेत गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पद तरी एकनाथ शिंदे स्वीकारणार का? याबाबत अगदी शपथ विधीच्या काही तास आधी पर्यंत शिंदे नाराज असल्याने उपस्थित राहणार नाहीत अशी चर्चा होती. मात्र, शेवटी ते उपस्थित राहिले आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या काळात ते अनेकवेळेस अचानक गावी जाऊन बसले. त्यामुळे त्यांची नाराज उघड होत होती.
दरम्यान, आता पालकमंत्रीपदांच्या वाटपानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज झाल्यामुळे आपल्या दरे या मूळगावी गेल्याचं सांगण्यात आलं. तर, शिंदेंच्या नाराजीनंतर 2 जिल्ह्यातील पालकमंत्रीपदांच्या नावांना स्थगिती देण्यात आली आहे. एकूणच, गेल्या 19 वर्षांतील राजकीय कार्यकाळात एकनाथ शिंदे 9 वेळा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, दरवेळी शिंदेंची नाराजी दूर करुन त्यांना सक्रीय करण्यात आल्याचंही यावरुन दिसून येते.
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
अधिक पाहा..

फलटण : श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, २६ जानेवारी २०२५ रोजी अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण, जि. सातारा येथे भव्य राज्यस्तरीय जलदगती एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेची वैशिष्ट्ये:
या राज्यस्तरीय स्पर्धेत चार वयोगटांमध्ये सामने होणार आहेत:
स्पर्धेमध्ये बेस्ट फलटणकर, उत्कृष्ट कन्या (१४ वर्षाखालील), सर्वोत्कृष्ट अनुभवी (६० वर्षांवरील), सर्वोत्कृष्ट दिव्यांग, आणि उत्कृष्ट अकॅडमी या श्रेणींमध्ये विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत. एकूण रोख बक्षिसांची रक्कम रु. ३२०००/- असून, चिफ ऑर्बिटर म्हणून शार्दुल तपासे (IA) काम पाहतील.
मार्गदर्शन:
या स्पर्धेसाठी कोहिनूर चेस अकॅडमी, श्री. माने बुद्धिबळ प्रशिक्षण वर्ग, आणि डॉ. जयंत गावडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
सहभाग नोंदणी:
सर्व बुद्धिबळप्रेमींना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

फलटण :- महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांताधिकारी म्हणून फलटण येथे त्यांनी प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने प्रशासकीय जबाबदारी पार पाडली आहे.
सचिन ढोले हे त्यांच्या कामात नेहमीच ठाम आणि पारदर्शक राहिले. कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त वेळ ते फलटणच्या जनतेसाठी देत, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “प्रशासकीय अधिकारी जर आपल्या खुर्चीवर बसला तर लोकांचे प्रश्न सुटतात.” ही विचारधारा त्यांनी आपल्या कार्यप्रणालीत नेहमीच जोपासली.
प्रांताधिकारी म्हणून त्यांनी फलटण तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांची कामगिरी इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
त्यांच्या नव्या जबाबदारीच्या निमित्ताने फलटणच्या जनतेसह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे ओएसडी म्हणून सचिन ढोले यांची नियुक्ती फलटणकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर.’ या मालिकेतील अप्पी, अर्जुन आणि अमोल हे सर्वांची मने जिंकताना दिसत आहेत. आता मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात मोठे संकट आले आहे. अप्पीचा अपघात झाला आहे. त्यामुळे तिच्या अपघातानंतर अमोल आणि अर्जुन खचून जाणार की तिचा शोध घेण्यात यशस्वी होणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

Karnataka Accident : कर्नाटकमध्ये फळे व भाजीपाल्याची वाहतूक करणारा एक ट्रक ५० मीटर खोल दरीत कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मृत हे फळविक्रेते होते आणि सावनूर येथून येल्लापुरा जत्रेत फळे-भाज्या विकण्यासाठी जात होते. ही घटना बुधवारी सकाळी उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापुरा तालुक्यातील अरबैल घाटातील कागेरी पेट्रोलपंपाजवळ घडली. विशेष म्हणजे या ट्रकमध्ये तब्बल २५ पेक्षा जास्त व्यापारी व शेतकरी प्रवास करत होते. सावनूर-हुबळी रस्त्यावरील जंगली भागातून जात असताना हा अपघात झाला.

JDU Withdraws BJP Govt Support : भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) घटक असलेल्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं (JDU) भाजपला मोठा धक्का दिला आहे. जेडीयूनं मणिपूरमधील भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे. नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Maha Kumbh Mela ISRO: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं असून, भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महाकुंभमेळ्याचे भारताची अंतराळ संस्था इस्रोने सॅटेलाईटच्या माध्यमातून फोटो टिपले आहेत. या फोटोंमध्ये प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याचं दिसत आहे. महाकुंभमेळ्यात 45 दिवसांत तब्बल 40 कोटी लोक महाकुंभ मेळ्यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
भारताच्या अत्याधुनिक ऑप्टिकल उपग्रहांचा आणि दिवसा आणि रात्री पाहण्यास सक्षम रडारसॅटचा वापर करून, हैदराबादमधील राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरने महाकुंभमेळ्यातील भव्य पायाभूत सुविधांच्या उभारणीचे अनेक फोटो कैद करण्यात आले आहेत. फोटोमध्ये उभारण्यात आलेलं तंबू शहर आणि नद्यांवर उभारण्यात आलेले पूल दिसत आहेत. एनआरएससीचे संचालक डॉ. प्रकाश चौहान म्हणाले की, त्यांनी रडारसॅटचा वापर केला कारण तो प्रयागराजला वेढलेल्या ढगांच्या पट्ट्यातून प्रदेशाचे चित्रण करू शकतो.
उत्तर प्रदेशातील प्रशासन या फोटोंच्या आधारे मेळ्यातील दुर्घटना आणि चेंगराचेंगरी कमी करण्यासाठी वापर करत आहे. 6 एप्रिल 2024 रोजी महाकुंभ सुरू होण्यापूर्वी काढलेल्या या टाइम सीरिजच्या फोटोंमध्ये प्रयागराज परेड मैदान दिसत आहे. त्यानंतर 22 डिसेंबर 2024 रोजी तिथे हालचाली होताना दिसत आहेत. यानंतर मैदानात मोठी गर्दी जमू लागल्याचं 10 जानेवारी 2025 रोजी काढलेल्या फोटोत दिसत आहे.
नव्याने उभारण्यात आलेलं शिवालय पार्क स्पेसमधून दिसत आहे. 6 एप्रिलच्या फोटोत मोकळं मैदान दिसत आहे. यानंतर 22 एप्रिलला शिवालय पार्क उभं राहतं. यानंतर 10 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या फोटोत भव्यता दिसत आहेत.
या धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशात महाकुंभ नगर हा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला आहे, जो त्रिवेणी संगम येथे साजरा केला जातो, जिथे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्या एकत्र येतात. यावर्षी, महाकुंभमेळ्यात पर्यटकांसाठी सुमारे 1 लाख 50 हजार तंबू आहेत. तसंच 3000 स्वयंपाकघरे, 1 लाख 45 हजार शौचालये आणि 99 पार्किंग लॉट आहेत.
या वर्षी, प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करत आहे. महाकुंभमेळ्यासाठी सुमारे 26 हेक्टर जमीन पुनर्प्राप्त करण्यात आली आहे आणि सुमारे 12 किलोमीटर अतिरिक्त स्नानघाट तयार करण्यात आले आहेत. आतापर्यंत आठ कोटींहून अधिक लोकांनी संगमावर स्नान केले आहे.

Saif Ali Khan Met Auto Driver : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची प्रकृती आता ठीक आहे. मंगळवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. हॉस्पिटलमधून घरी येताना सैफ अली खानने पापाराझींना खास फोटो पोज दिली आणि हॅलो देखील म्हटलं. आता सैफला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटोचालकासोबतचे त्याचे फोटो समोर आले आहेत. सैफने स्वतः त्याची भेट घेतली आहे.

Chhaava Aurangzeb Look : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. आता प्रेक्षकांची उत्कंठा द्विगुणित करण्यासाठी निर्मात्यांनी काल या चित्रपटातील मुख्य कलाकार रश्मिका मंदाना हिचा ‘महाराणी येसूबाई’ आणि अभिनेता विकी कौशल याचा ‘छत्रपती संभाजी महाराजां’चा लूक रिलीज केला आहे. आता चित्रपटातील आणखी एका पात्राचे पोस्टर समोर आले आहे, ज्याचे वर्णन भय आणि दहशतीचा नवा चेहरा म्हणून केले जात आहे. हा लूक चित्रपटातील औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अक्षय खन्नाचा आहे, जो नुकत्याच रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये खूपच धोकादायक दिसत आहे.