Tuesday, August 4, 2026
Home Blog Page 588

बेहिशेबी संपत्ती असलेला वाल्मिक सरकारला द्यायचा एवढा टॅक्स! आकडा ऐकून बसेल धक्का

0
बेहिशेबी संपत्ती असलेला वाल्मिक सरकारला द्यायचा एवढा टॅक्स! आकडा ऐकून बसेल धक्का


Walmik Karad Property Income Tax: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीकचे अनेक प्रकरण उघडकीस येऊ लागले आहेत. त्याची पुण्यात बेहिशेबी संपत्ती असल्याचं उघड झालं आहे. त्याच्या दोन्ही बायकांच्या नावे ही संपत्ती आहे. दरम्यान, वाल्मीक सरकारला किती रुपयांचा टॅक्स द्यायचा याची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी पाहून तुम्हाला धक्का बसेल.



Source link

Walmik Karad: वाल्मिक कराड अडकत चालला! न्यायालयानं पुन्हा ठोठावली १४ दिवसांची कोठडी

0
Walmik Karad: वाल्मिक कराड अडकत चालला! न्यायालयानं पुन्हा ठोठावली १४ दिवसांची कोठडी


Walmik Karad News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. वाल्मीक कराडला आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. खंडणी व मकोका प्रकरणी ही कोठडी वाल्मीकला देण्यात आली आहे.



Source link

जखमी बिबट्याचा हल्ला: सातारा वनक्षेत्रपालांसह पथकातील अनेक कर्मचारी जखमी

0
जखमी बिबट्याचा हल्ला: सातारा वनक्षेत्रपालांसह पथकातील अनेक कर्मचारी जखमी

सातारा: उंटाच्या डोंगर परिसरात जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या मोहिमेदरम्यान बिबट्याने पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात साताऱ्याचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांच्यासह अन्य चार कर्मचारी जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वनविभागाला जखमी बिबट्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेत अडथळे आले. वनविभागाने जाळी टाकल्यानंतरही बिबट्या जाळ्यात अडकला नाही. चवताळलेल्या बिबट्याने डॉ. चव्हाण यांच्यावर हल्ला करत गंभीर जखमा केल्या. या झटापटीत सुहास काकडे, महेश अडागळे, सचिन कांबळे आणि मयूर अडागळे हे वनरक्षकही जखमी झाले आहेत.

हल्ल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी, रेस्क्यू टीम आणि स्थानिक युवकांनी प्रयत्न केले. ओमकार ढाले, मयूर तिखे, ओंकार अडागळे, हर्षल मदने, अनिकेत जंगम, आणि शुभम औंधकर यांनी एकत्रित प्रयत्न करून बिबट्याला पकडले. त्यानंतर जखमी बिबट्याला अधिक उपचारासाठी पुण्यात पाठवण्यात आले.

भारताचे ७६ वे प्रजासत्ताक दिनाचे शासकीय कार्यक्रम: प्रमुख ठिकाणी ध्वजारोहणासाठी मंत्री व राज्यमंत्री उपस्थित

0
भारताचे ७६ वे प्रजासत्ताक दिनाचे शासकीय कार्यक्रम: प्रमुख ठिकाणी ध्वजारोहणासाठी मंत्री व राज्यमंत्री उपस्थित

मुंबई, दि. १९: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी राज्यभरातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात आले आहेत. या दिवशी सकाळी ८.३० ते १० या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ होऊ नये, असे निर्देश राजशिष्टाचार विभागाने दिले आहेत.

मुंबईतील मुख्य शासकीय समारंभ शिवाजी पार्क, दादर येथे होणार असून, या वेळी राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण आणि संचलन समारंभ पार पडेल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील.

प्रजासत्ताक दिनी विविध जिल्ह्यांतील ध्वजारोहणासाठी मंत्री व राज्यमंत्र्यांची नेमणूक

  • ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
  • पुणे: उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार
  • नागपूर: चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
  • अहिल्यानगर: राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील
  • वाशिम: हसन सकीना मियालाल मुश्रीफ
  • सांगली: चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
  • नाशिक: गिरीश गीता दत्तात्रय महाजन
  • पालघर: गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
  • जळगाव: गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
  • यवतमाळ: संजय प्रमिला दुलीचंद राठोड
  • मुंबई शहर: मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा
  • मुंबई उपनगर: अॅड. आशिष मीनल बाबाजी शेलार
  • रत्नागिरी: उदय स्वरूपा रवींद्र सामंत
  • धुळे: जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
  • जालना: श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
  • नांदेड: अतुल लीलावती मोरेश्वर सावे
  • चंद्रपूर: अशोक जनाबाई रामाजी उईके
  • सातारा: शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई
  • बीड: दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
  • रायगड: आदिती वरदा सुनील तटकरे
  • लातूर: शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
  • नंदुरबार: अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे
  • सोलापूर: जयकुमार कमल भगवानराव गोरे
  • हिंगोली: नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
  • भंडारा: संजय सुशीला वामन सावकारे
  • छत्रपती संभाजीनगर: संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
  • धाराशिव: प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
  • बुलढाणा: मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
  • सिंधुदुर्ग: नितेश नीलम नारायण राणे
  • अकोला: आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
  • गोंदिया: बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील
  • कोल्हापूर: प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर
  • गडचिरोली: अॅड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
  • वर्धा: पंकज कांचन राजेश भोयर
  • परभणी: श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर
  • अमरावती: इंद्रनील अनिता मनोहर नाईक

अनुपस्थितीमध्ये कार्यपद्धती

ध्वजारोहणासाठी नियुक्त मंत्री किंवा राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणास्तव अनुपस्थित राहिल्यास, विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त किंवा जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. याशिवाय, तालुका स्तरावर प्रांत अधिकारी किंवा तहसीलदार हे अध्यक्षस्थान भूषवतील.

Mahakumbh 2025 मधील सुंदर डोळ्यांमुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाचा ग्लॅमरस मेकओव्हर, नव्या लूकने नेटकरीही अवाक्

0
Mahakumbh 2025 मधील सुंदर डोळ्यांमुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाचा ग्लॅमरस मेकओव्हर, नव्या लूकने नेटकरीही अवाक्



Mahakumbh 2025 Monalisa Makeover Video :  मोनालिसाचा मेकअप केलेला लूक पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया… 



Source link

फडणवीस परदेशात अन् राज्यात महायुतीत असंतोष उफाळला, साताऱ्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिवेंद्रराजे

0


पुणे: राज्यात महायुतीतील नेत्यांना देण्यात आलेल्या पालकमंत्रिपदावरुन (Guardian minister) चांगलीच नाराजी समोर येताना दिसत आहे. रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रीपदावरुन (Guardian minister) महायुतीत मतभेद दिसून येत आहेत. या दोन्ही ठिकाणी वाद होत असतानाच आता आणखी एका जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या (Guardian minister) निवडीवरून असंतोष उफाळून आल्याचं दिसून येत आहे. सातारा जिल्ह्याच पालकमंत्रीपद (Guardian minister) हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार, मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या या पालकमंत्रीपदाबाबत (Guardian minister) जिल्हा मध्यवर्ती बँक संचालिका कांचन साळुंखे यांनी नाराजी व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पालकमंत्री (Guardian minister) पद द्या, अन्यथा आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे.

शंभूराज देसाईंना पद मिळाल्यानंतर भोसले समर्थकांनी नाराजी

सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शंभूराज देसाई यांना मिळाल्यानंतर भोसले समर्थकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी शंभूराज देसाई यांना मिळालेल्या पालकमंत्री पदाबाबत नाराजी व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना साताऱ्याचे पालकमंत्रीपद मिळावे अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला जर स्थगिती मिळू शकते तर साताऱ्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती का मिळू शकत नाही. असा सवाल देखील उपस्थित केला आहे. 

यावेळी बोलताना कांचन साळुंखे म्हणाल्या, सरकारने सातारा जिल्ह्यासाठी जाहीर केलेलं पालकमंत्री पद हे सातारा जिल्ह्यातील नागरिकांना मान्य नाही. सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार हे भाजपाचे आहेत, तो निकष जर लावण्यात आलेला आहे, तर त्या निकषांच्या आणि संख्येच्या आधारे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना पालकमंत्री पद दिले गेले पाहिजे, अशी सर्व जनतेची मागणी आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आणि तशा पद्धतीने इथे साताऱ्याच्या देखील पालकमंत्री पदाला स्थगिती द्यावी आणि शिवेंद्रराजे भोसले यांना इथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद सन्मानाने द्यावं आणि साताऱ्याच्या राजधानीचा सन्मान सरकारने राखावा अशी आमची रास्त भूमिका आहे, ही मांडण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 

नाशिक अन् रायगडबाबत महायुतीतील पक्ष का आग्रही?

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर भाजपचं नाशिककडे विशेष लक्ष आहे, गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक महापालिकेची विशेष जबाबदारी आहे. नाशिक पश्चिम, मध्य आणि पूर्व मतदारसंघात भाजपचेच आमदार आहेत. सिंहस्थ कुंभमेळाच्या नियोजनाची गिरीश महाजनांकडे विशेष जबाबदारी आहे. फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या महाजन यांच्याकडे याआधी पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती, त्यामुळे भाजपकडून देखील नाशिक सोडायला तयार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. 

संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांचं पालकमंत्री पद सध्या संकटात आहे. तर दुसरीकडे रायगडचे गोल्डमॅन असलेले भरत गोगावले देखील मंत्री झाल्यानंतरही पालकमंत्री इन वेटिंग आहे. अद्यापही दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आर्थिक परिषदेवरुन आल्यानंतर यावर काय तोडगा काढतात, की पालकमंत्र्यासह सहपालकमंत्री देत सर्वांना समाधानी केलं जातंय हे बघणं महत्त्वाचं असेल.

अधिक पाहा..



Source link

Gurucharan Singh : तो मरत होता, पण कुणी मदतीला आलं नाही! ‘तारक मेहता..’च्या ‘सोढी’च्या आयुष्यात काय घडतंय?

0
Gurucharan Singh : तो मरत होता, पण कुणी मदतीला आलं नाही! ‘तारक मेहता..’च्या ‘सोढी’च्या आयुष्यात काय घडतंय?


TMKOC Fame Gurucharan Singh : भक्तीने मीडिया बोलताना सांगितले की, आता गुरुचरण आपला उपवास सोडून अन्न खाण्यास तयार आहे, परंतु त्याची एक अट आहे.



Source link

मुंबईकरांचा टॅक्सी व रिक्षाचा प्रवास महागणार! कमीत कमी भाडे किती होणार? वाचा!

0
मुंबईकरांचा टॅक्सी व रिक्षाचा प्रवास महागणार! कमीत कमी भाडे किती होणार? वाचा!


Mumbai Taxi Fare Hike: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आता महगणार आहे. ऑटो रिक्षा व टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. इंधनाचे वाढते भाव व खटुआ समितीच्या शिफारशींचा दाखला समोर करत ही भाडेवाढ केली जाणार आहे. त्यानुसार टॅक्सीचे भाडे ४ रुपये प्रति किमी तर रिक्षाचे भाडे ३ रुपये प्रति किमीने वाढवण्यासाठी संघटना आग्रही असून असे झाल्यास रिक्षाचे किमान भाडे २३ वरून २६ रुपये तर टॅक्सीच्या भाडे २८ वरून ३२ रुपये प्रती किलोमीटर होण्याची शक्यता आहे.



Source link

इस्त्रायलच्या लष्करप्रमुखाचा राजीनामा; ‘हमासचा हल्ला पंतप्रधान नेतन्याहूंचं अपयश’

0
इस्त्रायलच्या लष्करप्रमुखाचा राजीनामा; ‘हमासचा हल्ला पंतप्रधान नेतन्याहूंचं अपयश’


७ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात शेकडो इस्त्रायली नागरिक ठार झाले होते. या हल्ल्यात २०० हून अधिक इस्त्रायली नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. सुरक्षेतील या चुकीसाठी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे चीफ ऑफ जनरल स्टाफ हर्झी हालेवी यांनी राजीमाना दिला आहे. गाझा पट्ट्यामध्ये शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर दोनच दिवसांनी इस्त्रायली लष्कराच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने राजीमाना दिल्याने इस्त्रायलमध्ये गाझा युद्धावरून इस्रायलमध्ये वरिष्ठ स्तरावर असलेला बेबनाव उघड झाला आहे. 



Source link

Ashwini Kalsekar : इच्छा असूनही आई होऊ शकल्या नाहीत अश्विनी काळसेकर! कारण ऐकून बसेल धक्का

0
Ashwini Kalsekar : इच्छा असूनही आई होऊ शकल्या नाहीत अश्विनी काळसेकर! कारण ऐकून बसेल धक्का


Happy Birthday Ashwini Kalsekar : अश्विनी काळसेकर यांचा अभिनयाच्या दुनियेत प्रवेश हा एक संघर्षपूर्ण अनुभव होता. त्यांनी आपल्या करिअरमध्ये काम करत असताना अनेक आव्हानांना तोंड दिलं.



Source link