Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रभारताचे ७६ वे प्रजासत्ताक दिनाचे शासकीय कार्यक्रम: प्रमुख ठिकाणी ध्वजारोहणासाठी मंत्री व...

भारताचे ७६ वे प्रजासत्ताक दिनाचे शासकीय कार्यक्रम: प्रमुख ठिकाणी ध्वजारोहणासाठी मंत्री व राज्यमंत्री उपस्थित

मुंबई, दि. १९: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी राज्यभरातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात आले आहेत. या दिवशी सकाळी ८.३० ते १० या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ होऊ नये, असे निर्देश राजशिष्टाचार विभागाने दिले आहेत.

मुंबईतील मुख्य शासकीय समारंभ शिवाजी पार्क, दादर येथे होणार असून, या वेळी राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण आणि संचलन समारंभ पार पडेल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील.

प्रजासत्ताक दिनी विविध जिल्ह्यांतील ध्वजारोहणासाठी मंत्री व राज्यमंत्र्यांची नेमणूक

  • ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
  • पुणे: उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार
  • नागपूर: चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
  • अहिल्यानगर: राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील
  • वाशिम: हसन सकीना मियालाल मुश्रीफ
  • सांगली: चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
  • नाशिक: गिरीश गीता दत्तात्रय महाजन
  • पालघर: गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
  • जळगाव: गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
  • यवतमाळ: संजय प्रमिला दुलीचंद राठोड
  • मुंबई शहर: मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा
  • मुंबई उपनगर: अॅड. आशिष मीनल बाबाजी शेलार
  • रत्नागिरी: उदय स्वरूपा रवींद्र सामंत
  • धुळे: जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
  • जालना: श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
  • नांदेड: अतुल लीलावती मोरेश्वर सावे
  • चंद्रपूर: अशोक जनाबाई रामाजी उईके
  • सातारा: शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई
  • बीड: दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
  • रायगड: आदिती वरदा सुनील तटकरे
  • लातूर: शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
  • नंदुरबार: अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे
  • सोलापूर: जयकुमार कमल भगवानराव गोरे
  • हिंगोली: नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
  • भंडारा: संजय सुशीला वामन सावकारे
  • छत्रपती संभाजीनगर: संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
  • धाराशिव: प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
  • बुलढाणा: मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
  • सिंधुदुर्ग: नितेश नीलम नारायण राणे
  • अकोला: आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
  • गोंदिया: बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील
  • कोल्हापूर: प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर
  • गडचिरोली: अॅड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
  • वर्धा: पंकज कांचन राजेश भोयर
  • परभणी: श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर
  • अमरावती: इंद्रनील अनिता मनोहर नाईक

अनुपस्थितीमध्ये कार्यपद्धती

ध्वजारोहणासाठी नियुक्त मंत्री किंवा राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणास्तव अनुपस्थित राहिल्यास, विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त किंवा जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. याशिवाय, तालुका स्तरावर प्रांत अधिकारी किंवा तहसीलदार हे अध्यक्षस्थान भूषवतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments