
[ad_1]
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका अतिशय लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता या मालिकेत वेगवेगळ्या अनेक घटना घडत आहेत. आता देवीने शाकंभरी देवीच्या रुपात दर्शन दिले आणि सृष्टीचे महत्त्व सांगितले. तर दुसरीकडे, देवीच्या हाकेला ऐकून काळभैरव भूतलावर प्रकटले आहेत. देवी आपलं अढळ स्थान शोधण्याची जबाबदारी भैरवाला देते. या आठवड्याच्या उत्तरार्थात तुळजाभवानी आणि भवानीशंकर यांच्या नात्यातील रुसवे – फुगवे, नात्यातील गोड क्षण बघायला मिळणार आहेत. त्यांच्यातला समज – गैरसमजाचा गुंता अधिक वाढत जात असून भवानीशंकर रूपात पृथ्वीवर निवास करणाऱ्या महादेवांना देवी ओळखणार का ? हा रंजक कथाभाग उलगडत आहे.
[ad_2]
Source link
