Sunday, October 4, 2026
Homeक्रीडामुधोजी हायस्कूलच्या Hindustan FC Under-13 संघाचे फुटबॉलमध्ये शानदार यश; सातारा जिल्हास्तरीय स्पर्धेत...

मुधोजी हायस्कूलच्या Hindustan FC Under-13 संघाचे फुटबॉलमध्ये शानदार यश; सातारा जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक

सातारा : Satara District Football Association तर्फे सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या Sub-Junior Boys Football Tournament 2026-27 स्पर्धेत Hindustan FC Under-13 संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या शानदार कामगिरीबद्दल विजेत्या संघातील खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

या स्पर्धेत Hindustan FC Under-13 संघाने सुरुवातीपासूनच दमदार खेळ करत प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व राखले. संघातील खेळाडूंनी सांघिक भावना, उत्कृष्ट पासिंग, आक्रमक खेळ तसेच बचावफळीतील भक्कम कामगिरीच्या जोरावर विजेतेपदावर आपले नाव कोरले.

मुधोजी हायस्कूलच्या या अभूतपूर्व क्रीडा कामगिरीबद्दल आणि विभागस्तरीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

यावेळी फ.ए.सो. क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, सुधीर अहिवळे, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय पाटील, सौ. पूजा पाटील, क्रीडा मार्गदर्शक तसेच क्रीडाप्रेमींनी विजेत्या संघाचे विशेष अभिनंदन करून पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Hindustan FC Under-13 संघाचे हे यश फलटणच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असून, विभागस्तरीय स्पर्धेतही संघाने अशीच दमदार कामगिरी करावी, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments