Monday, August 3, 2026
Home Blog Page 577

माहेरी पाठवण्यास नकार, पोलीस कॉन्स्टेबल पत्नीने पाचव्या मजल्यावरून मारली उडी; नातेवाईकांचा हत्येचा आरोप

0
माहेरी पाठवण्यास नकार, पोलीस कॉन्स्टेबल पत्नीने पाचव्या मजल्यावरून मारली उडी; नातेवाईकांचा हत्येचा आरोप


Police Constable wife Suicide :  मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. पतीचे म्हणणे आहे की,  तिला तिच्या माहेरच्या घरी नेण्यास नकार दिला, ज्यामुळे तिने रागाच्या भरात पाचव्या मजल्यावरून उडी मारली.  तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव आरती आहे. आरतीने छतावरून उडी मारल्याचे मृत महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले. माहेरच्या घरी जाण्यास नकार दिल्याने ती संतापली होती. मात्र, महिलेच्या कुटुंबीयांचा दावा वेगळाच आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.



Source link

प्रजासत्ताक दिनी जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाचे सैन्य करणार परेड; होऊ शकतात अनेक द्वीपक्षीय करार

0
प्रजासत्ताक दिनी जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाचे सैन्य करणार परेड; होऊ शकतात अनेक द्वीपक्षीय करार


जगातील सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाचे राष्ट्रपती ७६ व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात उपस्थित राहणार आहेत. भारताच्या प्रस्तावामुळे सुबियांतो यांनी आपला पाकिस्तान दौरा रद्द केला होता. पहिल्यांदाच इंडोनेशियन लष्कराची तुकडीही कार्तव्य पथावर परेड करणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्णो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आतापर्यंत तीन राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. त्याचबरोबर सुबियांतो यांच्या दौऱ्यात ऊर्जा सुरक्षा, आरोग्य सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रासह अनेक मुद्द्यांवर करार होण्याची शक्यता असल्याने त्यांचा भारत दौराही खास आहे.



Source link

Amit Shah : मार्केटिंग करून नेता बनणे पुरेसं नाही, जमिनीवर राहून काम करा, अमित शहांचा शरद पवारांवर निशाणा

0
Amit Shah : मार्केटिंग करून नेता बनणे पुरेसं नाही, जमिनीवर राहून काम करा, अमित शहांचा शरद पवारांवर निशाणा


केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी शुक्रवार राकांपा (एसपी) प्रमुख शरद पवार यांच्या टीका करताना केंद्रीय कृषी मंत्री पदावर असताना सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदानाबाबत सवाल उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, मोदी सरकारने या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.



Source link

महाकुंभमेळ्यात आता ‘तिसरा डोळा’ वाल्या बाबाचा चमत्कार पाहून लोकांनी बोटे घातली तोंडात, बागेश्वर बाबालाही आव्हान

0
महाकुंभमेळ्यात आता ‘तिसरा डोळा’ वाल्या बाबाचा चमत्कार पाहून लोकांनी बोटे घातली तोंडात, बागेश्वर बाबालाही आव्हान


Mahakumbh 2025 Prayagraj : प्रयागराजमध्ये जमलेल्या श्रद्धेच्या महाकुंभात रोज नवनवीन बाबांचे दर्शन होत आहे. आयआयटीयन बाबापासून क्लॉक बाबापर्यंत आणि अनेक नावांनी प्रसिद्ध असलेल्या बाबांनी आपल्या चमत्कारांनी किंवा कथांनी लोकांना आश्चर्यचकीत केले आहे, तिथे आता कुंभनगरीत एका बाबाची झपाट्याने चर्चा होत आहे, जो आपल्या दैवी शक्तीने समोर जे लिहिले आहे ते डोळ्यावर पट्टी बांधून वाचतो. त्यामुळे त्यांना तिसऱ्या डोळ्याचा बाबा म्हटले जात आहे.



Source link

भाजप सरकारला महाराष्ट्रात दारूचा प्रचार करायचा आहे का? काँग्रेसचा दावोस करारांवरून फडणवीसांना सवाल

0
भाजप सरकारला महाराष्ट्रात दारूचा प्रचार करायचा आहे का?  काँग्रेसचा दावोस करारांवरून फडणवीसांना सवाल


Davos summit 2025 : दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्य करारांमुळे झालेल्या गुंतवणुकीबाबत आणि रोजगाराबाबत देवेंद्र फडणवीस सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केली. पत्रकार परिषदेत पटोले म्हणाले की, फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार ६१ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून यामुळे १५.७० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल आणि १५.९५ लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.



Source link

Pune Accident : हिंजवडीत रेडिमीक्स डंपर पलटी; दोन आयटी इंजिनिअर तरुणींचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरारक Video समोर

0
Pune Accident : हिंजवडीत रेडिमीक्स डंपर पलटी; दोन आयटी इंजिनिअर तरुणींचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरारक Video समोर


पुण्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. हिंजवडी – माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे शुक्रवारी (२४ जानेवारी) दुपारी पावणे चारच्या सुमारास रेडिमीक्सने भरलेला डंपर रस्त्यातच पलटी झाला. त्याखाली चिरडून दुचाकीवर स्वार दोन इंजिनिअर तरुणी जागीच ठार झाल्या. पिंपरी-चिंचवडमधल्या हिंजवडी भागात मान रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.



Source link

Viral News: नवऱ्याचं सिगारेटचं व्यसन सुटेना, मग बायकोनं लढवली अनोखी शक्कल, वेधलं जगाचं लक्ष

0
Viral News: नवऱ्याचं सिगारेटचं व्यसन सुटेना, मग बायकोनं लढवली अनोखी शक्कल, वेधलं जगाचं लक्ष


No Smoking: धूम्रपानाच्या व्यसनातून सुटका करणे सोपे नाही. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि त्यागाची गरज असते. जगभरातील बरेच लोक धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु क्वचितच यशस्वी होतात. अशीच एक रंजक कहाणी आहे तुर्कस्तानच्या इब्राहिम युसेलची. २०१३ मध्ये इब्राहिम युसेलने धूम्रपान सोडण्याचा अनोखा मार्ग शोधून काढला. त्याने डोक्यावर हेल्मेटसारखा धातूचा जाळीचा पिंजरा घातला होता, ज्यामुळे त्याला सिगारेट ओढता येत नव्हती. या पिंजऱ्याची चावी फक्त त्याच्या पत्नीकडे होती. जेवणाच्या वेळी त्याची पत्नी हा पिंजरा उघडायची.



Source link

Cm Relief Fund : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’

0
Cm Relief Fund : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’


CM Assistance Fund Cell : राज्यातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. या माध्यमातून सादर केलेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. नागरिकांना या सेवा त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध  करून देण्यासाठी  राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरु करण्यात येणार आहे.



Source link

Republic Day: घरात फक्त सौर ऊर्जा वापरणाऱ्या मुंबईकरला दिल्लीतील ‘रिपब्लिक डे परेड’चं आमंत्रण!

0
Republic Day: घरात फक्त सौर ऊर्जा वापरणाऱ्या मुंबईकरला दिल्लीतील ‘रिपब्लिक डे परेड’चं आमंत्रण!


सध्या विजेचं अव्वाच्या सव्वा बिल परवडत नसल्याने अनेक नागरिक सौर ऊर्जेचा पर्याय निवडत आहेत. त्यात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीएम-सूर्य घर वीज योजनेमुळे अनेकांना प्रोत्साहन मिळत आहे. मुंबईत बोरिवलीमध्ये राहणारे विकास पंडित यांनी पीएम-सूर्य घर वीज योजनेंतर्गत जून २०२४मध्ये त्यांच्या घरावर ३ किलोवॅट क्षमतेची रुफटॉप सोलर सिस्टिम बसवली होती. यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे वीज बील येत नाही. ग्रीन एनर्जीचा पर्याय स्विकारल्याबद्दल आता पंडित यांचा केंद्र सरकारने सन्मान केला आहे. येत्या २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या रिपब्लिक डे परेडमध्ये विशेष पाहुणे म्हणून सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारकडून पंडित यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पीएम-सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत घरावर रुफटॉप सोलर सिस्टिम बसवणाऱ्या देशभरातील निवडक ८०० नागरिकांचा सन्मान करण्यासाठी दिल्लीच्या रिपब्लिक डे परेडचे निमंत्रण देण्यात आले आहे.



Source link

प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं घेतला संन्यास, किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली, नावही बदललं!

0
प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं घेतला संन्यास, किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली, नावही बदललं!


Mamta Kulkarni News: केनियातून २५ वर्षांनंतर मायदेशी परतलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने प्रयागराज येथील महाकुंभात सन्यास घेतला असून अभिनेत्रीला किन्नर आखाड्याचा महामंडलेश्वर बनवले जात आहे. ममता कुलकर्णी यांचा किन्नर आखाड्याने पट्टाभिषेक केला. तसेच त्यांना महामंडलेश्वर ही उपाधी दिली. ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याच्या साध्वी म्हणून ओळखल्या जातील. यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ जारी करत याबाबत माहिती दिली. साध्वी बनल्यानंतर त्या संगम, काशी आणि अयोध्येची यात्रा करतील.



Source link