Friday, June 26, 2026
Home Blog Page 23

फलटणमध्ये पालखी नियोजन बैठकीतील आसनव्यवस्थेवरून वाद; तहसीलदारांना दुय्यम वागणूक?

0
फलटणमध्ये पालखी नियोजन बैठकीतील आसनव्यवस्थेवरून वाद; तहसीलदारांना दुय्यम वागणूक?

फलटणमध्ये पालखी नियोजन बैठकीतील आसनव्यवस्थेवरून वाद; तहसीलदारांना दुय्यम वागणूक?

फलटण :-  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीतील आसनव्यवस्थेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तालुक्यात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेमुळे प्रशासनातील प्रोटोकॉल, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमधील समन्वय तसेच शासकीय बैठकीतील शिष्टाचार याबाबत चर्चा रंगली आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये बैठकीत माजी खासदार, नगराध्यक्ष, आमदार, प्रांत अधिकारी तसेच एका पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष हे पहिल्या रांगेत बसलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे, ज्या तहसीलदारांच्या दालनात ही बैठक पार पडली, ते तहसीलदार स्वतः दुसऱ्या रांगेत कोपऱ्यात बसलेले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. काही नागरिकांच्या मते, ही आसनव्यवस्था शासकीय प्रोटोकॉलच्या विरुद्ध असून अधिकाऱ्यांचा अवमान करणारी आहे. शासकीय कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची खुर्ची ही त्यांच्या अधिकाराचे आणि जबाबदारीचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत किंवा उपस्थितीत त्या खुर्चीचा सन्मान राखला जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दुसरीकडे, काहींनी हा प्रकार सामान्य मानत अनावश्यक वाद निर्माण करू नये, असे मत मांडले आहे. बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींना प्राधान्य देणे ही प्रचलित पद्धत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. मात्र, यामध्ये समतोल राखणे गरजेचे असल्याचेही ते मान्य करतात.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना उद्योजक संग्राम अहिवळे यांनी “माननीय तहसीलदार यांनाच बॅकबेंचर करण्यात आले,” अशी टीका केली आहे. तसेच “फलटण प्रशासनात नेत्यांना प्राधान्य, अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक दिली जाते,” अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत.
दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, पालखी सोहळ्यासारख्या महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीतून असा वाद निर्माण झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या घटनेमुळे भविष्यात अशा बैठकींमध्ये स्पष्ट प्रोटोकॉल, योग्य आसनव्यवस्था आणि परस्पर सन्मान राखण्याची गरज अधोरेखित झाली आहे. नागरिकांमध्येही याबाबत जागरूकता वाढत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीने वागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फलटण नगरपालिकेत ‘ऑपरेटरची सत्ता’? २३ वर्षे एकाच पदावर, हस्तक्षेपाचे गंभीर आरोप

0
फलटण नगरपालिकेत ‘ऑपरेटरची सत्ता’? २३ वर्षे एकाच पदावर, हस्तक्षेपाचे गंभीर आरोप

फलटण : फलटण नगरपालिकेत ‘ऑपरेटरची सत्ता’? २३ वर्षे एकाच पदावर, हस्तक्षेपाचे गंभीर आरोप
फलटण (प्रतिनिधी): फलटण नगरपालिकेत प्रशासन खरोखर नियमांनुसार चालते की एका कर्मचाऱ्याच्या प्रभावाखाली—असा थेट प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. कारण २००३ साली पंप ऑपरेटर म्हणून रुजू झालेला विनोद नावाचा कर्मचारी तब्बल २३ वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असून, त्याच्या कार्यपद्धतीबाबत अनेक गंभीर आरोप समोर येत आहेत.
पद ऑपरेटरचं, पण अधिकार ‘साहेबां’सारखे?
पाणीपुरवठा विभागात नियुक्ती असतानाही संबंधित कर्मचारी अनेकदा अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच वावरत असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे, तर आरोग्य विभागात स्वतंत्र अधिकारी आणि पाच SI असतानाही तो तेथील कामात हस्तक्षेप करत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. त्यामुळे “तो नेमक्या कोणत्या अधिकारात आदेश देतो?” असा सवाल उपस्थित होतो.
कामापेक्षा ‘सेटिंग’वर भर?
पालिकेचा कर्मचारी असूनही प्रत्यक्ष कामापेक्षा राजकीय नेत्यांच्या जवळीक साधण्यातच त्याचा अधिक वेळ जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे “तो पालिकेचा नोकर आहे की दलाल?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
नागरिक त्रस्त, प्रशासन मौन
नागरिकांच्या मते, कामासाठी कार्यालयात गेल्यावर अधिकारी ऐकून घेतात, मात्र हा कर्मचारी थेट आदेश देत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. “आम्ही नागरिक आहोत की त्याचे कर्मचारी?” असा रोष व्यक्त होत आहे.
२३ वर्षे एकाच जागी—योगायोग की वरदहस्त?
एखादा कर्मचारी इतक्या वर्षांपासून एकाच पदावर टिकून राहणे हे केवळ योगायोग आहे का, की यामागे राजकीय पाठबळ आहे? प्रशासनावर दबाव टाकून आणि नेत्यांशी जवळीक वापरून स्वतःची ‘सत्ता’ निर्माण केल्याची चर्चा रंगत आहे.
मुख्याधिकाऱ्यांची भूमिका काय?
सामान्य कर्मचाऱ्यांवर नियम काटेकोरपणे लागू केले जातात, मात्र प्रभावशाली व्यक्तींवर कारवाई का होत नाही? हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल का, की ही स्थिती अशीच कायम राहणार—याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ढवळ गावची सुपुत्री कु. सृष्टी करे हिची कुस्तीमध्ये सुवर्ण कमाई

0
ढवळ गावची सुपुत्री कु. सृष्टी करे हिची कुस्तीमध्ये सुवर्ण कमाई

छ.संभाजी नगर : मंगळवार दिनांक २८-०४-२०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या १७ वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ६५ कि ग्रॅ वजनी गटात सातारा जिल्ह्यातील कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढवळचे सुपुत्र, पुरोगामी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते श्री.शिवाजी करे यांची कन्या तथा ढवळ-वाखरी गावची सुपुत्र कु.सृष्टी शिवाजी करे हिने सुवर्णपदकाची कमाई केली.

व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधीत्व. तिच्या या यशाबद्दल तिचे चुलते नितीन करे सर यांच्यासह ढवळ गावचे ग्रामस्थ, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तीचे हार्दिक अभिनंदन केले.

तिच्या पुढील कुस्तीसाठी व कुस्ती क्षेत्रातील अतुलनीय करिअर साठी तिला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे सृष्टीच्या या यशामध्ये तिचे आई-वडील या दोघांची तिला खूप साथ असून तिला मार्गदर्शन करणाऱ्या विविध प्रशिक्षकांचे सुद्धा नाव तिने या कुस्तीतील सुवर्णपदकाच्या कमाई ने केले आहे.

कोळकी येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरास उत्साहात सुरुवात

0
कोळकी येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरास उत्साहात सुरुवात

कोळकी येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरास उत्साहात सुरुवात

फलटण : भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा सातारा जिल्हा पूर्व व महिला शाखा फलटण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने कोळकी येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सामाजिक सभागृहात धम्म उपासिका शिबिरास उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. शिबिराच्या प्रारंभी उपस्थितांनी आपल्या आदर्शांचं पूजन करून त्रिसरण व पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची मंगलमय वातावरणात उपासिका शिबिराची सुरुवात झाली.राज्याच्या संघटक, बारा जिल्हा च्या प्रभारी आयुनि रत्नप्रभा राजश्री दिपक सरवदे, सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सुजाता गायकवाड, केंद्रीय शिक्षिका सुवर्णा ओहाळे यांच्या हस्ते उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन झाले.

या शिबिरात भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आयुनि सुवर्णा ओव्हाळे यांनी बौद्ध धम्मातील वंदना पद्धती, त्रिसरण व पंचशील यांचे सखोल विश्लेषण केले. त्यांनी पाली भाषेतील अचूक उच्चारणासह मराठी अर्थ समजावून सांगत उपस्थितांना प्रत्यक्ष सहभागातून शिकण्याची संधी दिली. विशेषतः पंचांग प्रणामाची पद्धत प्रत्यक्षिकाद्वारे स्पष्ट करून त्यामागील आध्यात्मिक व व्यावहारिक महत्त्व त्यांनी उलगडले. यासोबतच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २२ प्रतिज्ञांचा उल्लेख करत, त्या आचरणात आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाला समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तथा पुणे व सातारा जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भारतीय बौद्ध महासभा ही आपली मातृसंस्था असून संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतभर विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये महिला उपासिका शिबिर हे खूप महत्त्वाचे आहे शिबीर मानले जाते. त्यामुळे पुढील दहा दिवस अतिशय विनम्रपणे व लक्षपूर्वक धम्मातील विषय समजून घ्या. आयुनि सुवर्णा ओव्हाळे या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सोप्या पद्धतीने धम्म शिकवत आहेत. पुढील दहा दिवस विविध विषयांवर मार्गदर्शन होणार असून सर्वांनी नियमित सहभाग घेऊन शिबिराचा पूर्ण लाभ घ्यावा.” भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आयुनि सुवर्णा ओव्हाळे ताई धम्मप्रचारासाठी समर्पित भावनेने काम करत आहेत. हे कार्यही त्यांनी अधोरेखित करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.सातारा जिल्ह्याच्या महिला आघाडीचे अध्यक्ष सुजाता गायकवाड म्हणाल्या, भारतीय बौद्ध महासभा ही आपली मातृसंस्था असून या संस्थेच्या माध्यमातून विविध शिबिरांचा आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षभरापासून उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. त्याला आता यश आले आहे. तेव्हा सर्व उपासिकांनी वेळेत येऊन धम्म समजून घ्यावा आणि तसे आचरण करावे. भारतीय बौद्ध महासभेने चांगले केंद्रीय प्रशिक्षक आपल्याला दिलेले आहेत त्यांच्याकडून विविध विषय आपण समजून घ्या.

माजी तालुका अध्यक्ष आयु. शिवाजी सावंत यांनी आपल्या अनुभवातून मार्गदर्शन करताना उपासक ते विपश्यना साधक असा स्वतःचा प्रवास मांडला. धम्मकार्यामध्ये सातत्य व शिस्त आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. योग्य मार्गदर्शन आणि निष्ठेने साधना केल्यास प्रत्येक व्यक्ती श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत या अवस्थांमधून जाऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना येणारी कोणतीही शंका मनात न ठेवता प्रश्न विचारण्याचे व विषय सखोल समजून घेण्याचे आवाहन केले. “धम्म समजून घेण्यासाठी नियमित उपस्थिती आणि सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा आयुनि रंजना रणवरे मॅडम यांनी उपस्थित आमचे स्वागत केले. त्यासोबत या शिबिराचे प्रास्ताविक करून संपूर्ण रुपरेषा बौद्ध उपासिकांना समजावून सांगितली.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा सातारा जिल्हा अध्यक्षा आयुनि सुजाता गायकवाड, फलटण तालुका अध्यक्षा आयुनि रंजना रणवरे, राज्याचे ऑडिटर आयु. अरुण गायकवाड, तालुका कोषाध्यक्ष आयु. राजकुमार रणवरे, माजी सरचिटणीस आयु. भिकू भोसले यांसह अनेक पदाधिकारी व धम्मबंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपासिका शिबिरासाठी रजनी सुहास माने, आरती विशाल पाटील, चित्रा विठ्ठल गायकवाड, श्रेया नितीन साळवे, हर्षदा गौतम काकडे, प्रफ्युलता भीमराव लोंढे, परिमिता सुनिल कांबळे, मनिषा जगताप,विद्या खंदारे, कुसुम गुलाबराव माने, प्राजक्ता सागर काकडे, मयुरी सुशिल काकडे, कांताताई शंकर काकडे, सुप्रिया बाळासाहेब माने या उपासिका शिबिरात बसल्या आहेत.

दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये धम्माचे विविध पैलू, आचार-विचार, साधना आणि बौद्ध जीवनपद्धती यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार असून, परिसरातील महिलांमध्ये याबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे.

फलटणमध्ये बुद्ध जयंती महोत्सवाचा उत्साह; भव्य मैत्री भावना बाईक रॅली आणि विविध कार्यक्रमांनी जल्लोष

0
फलटणमध्ये बुद्ध जयंती महोत्सवाचा उत्साह; भव्य मैत्री भावना बाईक रॅली आणि विविध कार्यक्रमांनी जल्लोष

फलटण : समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारी बुद्ध पौर्णिमा यंदा फलटण शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीच्या सहकार्याने साहस क्रीडा मंडळाच्या वतीने १ मे २०२६ रोजी भव्य बुद्ध जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने सकाळी ९.०० वाजता शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक येथून सुरू होणारी ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत पुन्हा त्याच ठिकाणी येऊन समाप्त होणार आहे. रॅलीचा मार्ग राम मंदिर, शिंपी गल्ली, रविवार पेठ, पंचशील चौक, मंगळवार पेठ, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, राजे उमाजी नाईक चौक आणि महात्मा गांधी चौक असा निश्चित करण्यात आला आहे.

यावेळी सकाळी १०.०० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पारंपरिक लेझीम प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार असून कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

जगभरातील सुमारे १८० देशांमध्ये साजरी होणारी बुद्ध पौर्णिमा ही अत्यंत मंगलमय मानली जाते. याच दिवशी भगवान बुद्धांचा जन्म, बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना घडल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

फलटणमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त मंगल मैत्री भावना;  भव्य बाईक रॅलीचे आयोजन

0
फलटणमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त मंगल मैत्री भावना;  भव्य बाईक रॅलीचे आयोजन

फलटणमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त मंगलमैत्री भावना भव्य बाईक रॅलीचे आयोजन

फलटण :- सविनय जय भीम! तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त व  साहस क्रीडा मंडळ, फलटण यांच्या वतीने मंगलमैत्री भावना जपण्याच्या उदात्त हेतूने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता फलटण शहरातून प्रारंभ होणार आहे.
रॅलीचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल:
क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक → राम मंदिर → शिंपी गल्ली → रविवार पेठ → पंचशील चौक → मंगळवार पेठ → बारामती चौक → छत्रपती शिवाजी महाराज चौक → भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक → महावीर स्तंभ → राजे उमाजी नाईक चौक → महात्मा गांधी चौक → पुन्हा क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक रॅली नंतर
सकाळी १०.०० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे लेझीम प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे.
या रॅलीद्वारे बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

खंडाळा येथे समता सैनिक दलाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

0
खंडाळा येथे समता सैनिक दलाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

खंडाळा येथे समता सैनिक दलाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

खंडाळा येथे समता सैनिक दलाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना
खंडाळा : भारतीय बौद्ध महासभा शाखा, खंडाळा तालुक्याच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभा शाखा खंडाळा तालुका पदाधिकारी व समता सैनिक दलाच्या वतीने महामानवांना वंदन करून, बुद्ध वंदना घेऊन तसेच प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.

जयंती महोत्सवानिमित्त कार्ले लेणी येथून भीम ज्योतीचे खंडाळा येथे आगमन झाले. या भीम ज्योतीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देत शिस्तबद्ध परेड करण्यात आली व भीम ज्योतीला मुख्यमंचाजवळ आणण्यात आले.

समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, राज्य संघटक तथा पुणे व सातारा जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मेजर संपत भोसले, केंद्रीय मेजर पिराजी सातपुते, समता फोर्सच्या कंपनी कमांडर आयु. अर्चना चव्हाण, प्लॅटून कमांडर महेंद्र सोनवणे, युनिट लीडर निलेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंचाजवळ महामानवांना वंदन करून बुद्ध धम्माच्या धम्मध्वजाला समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. उपस्थितांना भीम जयंतीच्या मंगलमय शुभेच्छाही देण्यात आल्या.

यावेळी अहिरे गावचे सुपुत्र तथा पुणे पश्चिम विभागाचे संरक्षण उपाध्यक्ष व सिनियर डिव्हिजन ऑफिसर आयु. राजेंद्र बडेकर यांनी समता सैनिक दलासाठी ढोल, ड्रम व मोठी पितळी झांज भेट स्वरूपात प्रदान केली.
या जयंती महोत्सवात विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये संगीत खुर्ची, गायन स्पर्धा व इतर उपक्रमांचा समावेश होता.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा शाखा खंडाळा तालुक्याचे अध्यक्ष आयु. संजय जाधव, सरचिटणीस डॉ. विलास खरात, कोषाध्यक्ष कांतीलाल खुंटे, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष युवराज खुंटे, सचिव राजेंद्र खुंटे तसेच सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी केले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका, महिला, युवक, बालक – बालिका उपस्थित राहून जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

आंदोरी येथे समता सैनिक दला चा पदोन्नती सोहळा संपन्न

0
आंदोरी येथे समता सैनिक दला चा पदोन्नती सोहळा संपन्न

आंदोरी येथे समता सैनिक दला चा पदोन्नती सोहळा संपन्न

खंडाळा : दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी SSD (समता सैनिक दल) च्या वतीने पदोन्नती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आयु. पिराजी सातपुते सर, जे समता सैनिक दलाचे डिव्हिजन अधिकारी म्हणून कार्यरत होते, त्यांना पुढील पदोन्नती देत मेजर पद बहाल करण्यात आले.

आंदोरी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे आयोजित सोहळ्यात आयु. दादासाहेब भोसले समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, महाराष्ट्र राज्य संघटक, पुणे तसेच सातारा जिल्हा प्रभारी यांच्या हस्ते आयु. पिराजी सातपुते सरांना मेजर पदाची मानाची पदवी प्रदान करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याच कार्यक्रमात यापूर्वी SSD चे डिव्हिजन अधिकारी आयु.संपत भोसले यांनाही ‘मेजर’ पद बहाल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात SSD चे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक आद. दादासाहेब भोसले, केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर, केंद्रीय सहाय्यक शिक्षक तथा मेजर आयु.संपत भोसले,केंद्रीय सहाय्यक शिक्षक तथा मेजर पिराजी सातपुते, समता फोर्स च्या कंपनी कमांडर अर्चना चव्हाण,आयु.महेंद्र सोनवणे प्लॅटून कमांडर, युनिट लीडर निलेश मोरे, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

मौजे तांदूळवाडी येथे बौद्धाचार्य व श्रामणेर शिबीरास उत्साहात सुरवात

0
मौजे तांदूळवाडी येथे बौद्धाचार्य व श्रामणेर शिबीरास उत्साहात सुरवात

मौजे तांदूळवाडी येथे बौद्धाचार्य व श्रामणेर शिबीरास उत्साहात सुरवात

तांदुळवाडी, ता. बारामती : भारतीय बौद्ध महासभा (पुणे जिल्हा पूर्व), बारामती तालुका व बारामती शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “बौद्धाचार्य व श्रामणेर शिबीर” मोठ्या उत्साहात व सुरु झाले. ।

धम्मज्योती बुद्धविहार, तांदुळवाडी येथे शुक्रवार दि. २५ एप्रिल २०२६ ते सोमवार दि. ४ मे २०२६ या कालावधीत पार पडणाऱ्या या शिबिरात एकूण 22 धम्मप्रेमी, युवक-युवती आणि बालकांनी सहभाग नोंदवून श्रामणेर दीक्षा घेतली.

या शिबिरात पुढील दहा दिवसांमध्ये बौद्धाचार्य व श्रामणेर प्रशिक्षणासोबत धम्म, शील, प्रज्ञा, करुणा यांचे महत्त्व समजावून सांगण्यात येणार आहे. सहभागी श्रामणेर यांना बुद्ध धम्माचे मूलभूत तत्त्व, पंचशील, ध्यान, प्रवचन तसेच आचार-विचार यांचे सखोल मार्गदर्शन देण्यात आहे.

अत्यंत धम्ममय वातावरणामध्ये प्रवज्या विधी पूज्य भंते डॉ. नागघोष महाथेरो यांचे हस्ते झाला. त्यांच्या समवेत यावेळी आय्येनी सुकेशनी उपस्थित होत्या.

यावेळी शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा शाखा पुणे जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आद. आयु. बी. जी. घाटे गुरुजी, आद. पुणे जिल्हा पूर्वचे संस्कार उपाध्यक्ष आयु. नामदेव शिंदे गुरुजी, पुणे जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव लक्ष्मण भोसले गुरुजी, पुणे जिल्हा पूर्वचे कोषाध्यक्ष रवींद्र कदम, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष महावीर भालेराव यावेळी उपस्थित होते.

प्रमुख उपस्थिती म्हणून पुणे जिल्हा पूर्वचे सरचिटणीस संतोष आरवडे गुरुजी, समता सैनिक दलाचे मेजर पुणे, दौंड, बारामती इंदापूर चे प्रभारी संरक्षण विभागाचे किरण दिनकर भोसले गुरुजी, बारामती शहराध्यक्ष भरत सोनवणे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा बारामती तालुका, भारतीय बौद्ध महासभा शाखा बारामती शहर व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

या उपक्रमामुळे समाजामध्ये धम्माबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होईल.युवकांमध्ये नैतिक मूल्ये आणि शिस्त रुजविण्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतील.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व भारतीय बौद्ध महासभा शाखा बारामती तालुका, भारतीय बौद्ध महासभा ग्रामीण शाखा तांदुळवाडी चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक परिश्रम घेतील. पुढील दहा दिवस या श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून संपूर्ण तालुका भर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यात येईल.

मा. मुख्य अधिकारी, मा. प्रथम नागरिक याकडे कधी लक्ष देणार …!!

0
मा. मुख्य अधिकारी, मा. प्रथम नागरिक याकडे कधी लक्ष देणार …!!

मा. मुख्य अधिकारी, मा. प्रथम नागरिक याकडे कधी लक्ष देणार …!!

फलटण : फलटण नगरपरिषदेच्या हद्दीतील हाॅटेल आर्यमान जवळपास डिएड चौकाकडे जाणारा मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून चढ उतार असलेला एक साधारण ७ फूट लांबीचा ( Black spot) तयार झाला आहे.
यामुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत, दुचाकीस्वार जखमी झाले आहेत, चारचाकी वाहने जर त्या वरुन गेली तर आतील व्यक्तीला मणक्याच्या समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.
हा भाग hospital hub म्हणून ओळखला जातो गरोदर महिला किंवा एखादेवेळी दुचाकीवरून जाणारे लहान मुल धक्क्याने पडले आणि काय विपरीत घडलं तर याला जबाबदार कोण?
हि अत्यंत गंभीर बाब आहे, हे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासकीय ढिसाळपणाचे , राजकीय नेते आणि संबंधित ठेकेदार यांच्या निष्काळजीपणाचे लक्षण आहे.
त्वरित निर्णयप्रक्रिया होऊन दुरूस्ती, योग्य साईन बोर्ड लावून तत्काळ दुरुस्ती करावी.
तातडीने संबंधित नगरसेवक, मा. नगराध्यक्ष, मा. मुख्य अधिकारी , मा. सार्वजनिक बांधकाम विभाग व शहर पोलीस प्रशासन व वाहतूक विभाग यांनी त्वरित निर्णय घेऊन लोकांचा मृत्यू वाचवण्यासाठी दुरुस्ती देखभाल करावी आपण एक या शहाराचे व देशाचे जबाबदार नागरिक आहात , हे देखील विसरता कामा नये.
अनेक जण या रस्त्यावरून ये जा करत असतात तरी सुद्धा आंधळेपणाणे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे आहे.
एखादा सन्माननीय मंत्री या रस्त्यावरून येणार असेल तर लगेच डागडुजी केली जाते .
याबाबत सर्व सन्माननीय पत्रकार, डिजिटल चॅनेल व जबाबदार नागरिक यांनी अधिकृत लक्ष देण्यासाठी जबाबदार नागरिकांची भूमिका पार पाडावी.
याबाबत मा. तहसीलदार साहेब यांनी लक्ष केंद्रित करावे असे आपणास आवहान करीत आहे .

माझं सुंदर फलटण… हरित फलटण…मी फलटण कर