मौजे तांदूळवाडी येथे बौद्धाचार्य व श्रामणेर शिबीरास उत्साहात सुरवात

0
8
मौजे तांदूळवाडी येथे बौद्धाचार्य व श्रामणेर शिबीरास उत्साहात सुरवात

मौजे तांदूळवाडी येथे बौद्धाचार्य व श्रामणेर शिबीरास उत्साहात सुरवात

तांदुळवाडी, ता. बारामती : भारतीय बौद्ध महासभा (पुणे जिल्हा पूर्व), बारामती तालुका व बारामती शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “बौद्धाचार्य व श्रामणेर शिबीर” मोठ्या उत्साहात व सुरु झाले. ।

धम्मज्योती बुद्धविहार, तांदुळवाडी येथे शुक्रवार दि. २५ एप्रिल २०२६ ते सोमवार दि. ४ मे २०२६ या कालावधीत पार पडणाऱ्या या शिबिरात एकूण 22 धम्मप्रेमी, युवक-युवती आणि बालकांनी सहभाग नोंदवून श्रामणेर दीक्षा घेतली.

या शिबिरात पुढील दहा दिवसांमध्ये बौद्धाचार्य व श्रामणेर प्रशिक्षणासोबत धम्म, शील, प्रज्ञा, करुणा यांचे महत्त्व समजावून सांगण्यात येणार आहे. सहभागी श्रामणेर यांना बुद्ध धम्माचे मूलभूत तत्त्व, पंचशील, ध्यान, प्रवचन तसेच आचार-विचार यांचे सखोल मार्गदर्शन देण्यात आहे.

अत्यंत धम्ममय वातावरणामध्ये प्रवज्या विधी पूज्य भंते डॉ. नागघोष महाथेरो यांचे हस्ते झाला. त्यांच्या समवेत यावेळी आय्येनी सुकेशनी उपस्थित होत्या.

यावेळी शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा शाखा पुणे जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आद. आयु. बी. जी. घाटे गुरुजी, आद. पुणे जिल्हा पूर्वचे संस्कार उपाध्यक्ष आयु. नामदेव शिंदे गुरुजी, पुणे जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव लक्ष्मण भोसले गुरुजी, पुणे जिल्हा पूर्वचे कोषाध्यक्ष रवींद्र कदम, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष महावीर भालेराव यावेळी उपस्थित होते.

प्रमुख उपस्थिती म्हणून पुणे जिल्हा पूर्वचे सरचिटणीस संतोष आरवडे गुरुजी, समता सैनिक दलाचे मेजर पुणे, दौंड, बारामती इंदापूर चे प्रभारी संरक्षण विभागाचे किरण दिनकर भोसले गुरुजी, बारामती शहराध्यक्ष भरत सोनवणे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा बारामती तालुका, भारतीय बौद्ध महासभा शाखा बारामती शहर व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

या उपक्रमामुळे समाजामध्ये धम्माबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होईल.युवकांमध्ये नैतिक मूल्ये आणि शिस्त रुजविण्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतील.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व भारतीय बौद्ध महासभा शाखा बारामती तालुका, भारतीय बौद्ध महासभा ग्रामीण शाखा तांदुळवाडी चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक परिश्रम घेतील. पुढील दहा दिवस या श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून संपूर्ण तालुका भर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यात येईल.