
फलटणमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त मंगलमैत्री भावना भव्य बाईक रॅलीचे आयोजन
फलटण :- सविनय जय भीम! तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त व साहस क्रीडा मंडळ, फलटण यांच्या वतीने मंगलमैत्री भावना जपण्याच्या उदात्त हेतूने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता फलटण शहरातून प्रारंभ होणार आहे.
रॅलीचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल:
क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक → राम मंदिर → शिंपी गल्ली → रविवार पेठ → पंचशील चौक → मंगळवार पेठ → बारामती चौक → छत्रपती शिवाजी महाराज चौक → भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक → महावीर स्तंभ → राजे उमाजी नाईक चौक → महात्मा गांधी चौक → पुन्हा क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक रॅली नंतर
सकाळी १०.०० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे लेझीम प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे.
या रॅलीद्वारे बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






