
‘जिथं तुम्ही अतिशय दर्जेदार रस्ता बनवला आहे, तिथं वापरकर्ता शुल्क आकारलं पाहिजे. पण खड्ड्यांनी भरलेल्या आणि मातीच्या रस्त्यांवर टोल आकारत असाल तर जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागणारच. राष्ट्रीय महामार्ग एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी टोलनाक्यांवर ताटकळाव्या लागणाऱ्या लोकांच्या वेदनांकडं लक्ष दिलं पाहिजे. तक्रार नोंदवण्यासाठी आणि त्याचं निराकरण करण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल, अशा यंत्रणेची गरजही त्यांनी व्यक्त केली.









