Tuesday, August 11, 2026
Homeफलटणधुळदेव सोसायटीच्या ठरावात गणेशराव धायगुडे यांना बहुमत; जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना...

धुळदेव सोसायटीच्या ठरावात गणेशराव धायगुडे यांना बहुमत; जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना वेग

धुळदेव सोसायटीच्या ठरावात गणेशराव धायगुडे यांना बहुमत; जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना वेग

फलटण प्रतिनिधी :- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार प्रतिनिधी निश्चित करण्यासाठी विविध सहकारी संस्थांमध्ये ठराव प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील मौजे धुळदेव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या प्रतिनिधी निवडीचा ठराव नुकताच पार पडला.

या ठरावामध्ये सोसायटीचे विद्यमान चेअरमन गणेशराव धायगुडे यांच्या नावाला ८ विरुद्ध ५ अशा बहुमताने मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी धुळदेव सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या निवडीदरम्यान दुसऱ्या बाजूने युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांच्या नावाचाही प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, मतदानात गणेशराव धायगुडे यांच्या बाजूने बहुमत मिळाल्याने त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला.

ठरावाच्या प्रक्रियेदरम्यान भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्व कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली.

गणेशराव धायगुडे यांच्या निवडीबद्दल माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर तसेच फलटण-कोरेगावचे आमदार सचिनदादा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच सोसायटीचे संचालक मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांना शुभेच्छा देत आगामी जिल्हा बँक निवडणुकीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

धुळदेव सोसायटीतील या निर्णयामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी फलटण तालुक्यातील सहकार व राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments