Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्रविश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; बालचमूंकडून आजी-आजोबांचे पद्यपूजन

विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; बालचमूंकडून आजी-आजोबांचे पद्यपूजन

विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; बालचमूंकडून आजी-आजोबांचे पद्यपूजन

इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे … इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूल कळंब ता. इंदापूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील गुरुंचे महत्त्व अधोरेखित करणारा प्रेरणादायी कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमात शाळेच्या बालचमूंकडून उपस्थित आजी-आजोबांचे विधिवत पद्यपूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गुरु, पालक आणि ज्येष्ठांचा सन्मान करण्याचा संदेश देणारी गीते, प्रार्थना व सांस्कृतिक सादरीकरणे केली. या अनोख्या उपक्रमामुळे उपस्थितांचे मन भारावून गेले.

यावेळी विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग गुरुपौर्णिमेचे धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. “गुरु हा ज्ञानाचा दीप असून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. तसेच आई-वडील व आजी-आजोबा हेही आपल्या जीवनातील पहिले गुरु आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा आदर करून संस्कारमय जीवन जगणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे , शिक्षिका अश्विनी घुगरी,सुजाता निंबाळकर,प्राजक्ता अर्जुन व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व आजी-आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments