Tuesday, August 11, 2026
Homeदेश-विदेशदिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला शरद पवार व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या...

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला शरद पवार व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला शरद पवार व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा

साहस Times|  दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध शैक्षणिक व विद्यार्थी हिताच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांच्या समवेत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा जाहीर केला.

यावेळी आंदोलनाचे प्रतिनिधी अभिजीत दिपके तसेच आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांशी शरद पवार आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सविस्तर संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपल्या विविध शैक्षणिक, प्रवेश प्रक्रिया व परीक्षा व्यवस्थेशी संबंधित अडचणी मांडत न्याय्य मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.

विद्यार्थ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेताना शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेण्याची गरज अधोरेखित केली. विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन त्यांच्या न्याय्य मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि लवकरात लवकर योग्य तोडगा काढून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित अबाधित राहणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने संवादाचा मार्ग स्वीकारून तातडीने निर्णय घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांबाबत निवेदन सादर केले. शरद पवार आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments