Tuesday, August 11, 2026
Homeदेश-विदेशसोनम वांगचुक यांच्या उपोषणाला ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा जाहीर पाठिंबा; सरकारला...

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा जाहीर पाठिंबा; सरकारला मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा जाहीर पाठिंबा; सरकारला मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन

साहस Times :- लडाखचे सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पाठिंबा मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारला वांगचुक यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

सयाजी शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “तुम्हाला मंत्रीपद सोडायचं नसेल तर नका सोडू. पण किमान सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर तरी लक्ष द्या. सिनेमातील ‘रॅंचो’वर आपण एवढं प्रेम केलं, मग खऱ्या आयुष्यातील सोनम वांगचुक यांच्यासाठी आवाज का उठवत नाही? देशासाठी अशा व्यक्ती अत्यंत महत्त्वाच्या आहेत.”

त्यांनी पुढे सांगितले की, सोनम वांगचुक गेल्या १८ दिवसांपासून उपोषणावर असून, डॉक्टरांनी पुढील दोन दिवस त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर धोका असल्याचा इशारा दिला आहे. तरीही सरकारकडून त्यांच्या आंदोलनाची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सयाजी शिंदे यांनी देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाला आवाहन करत म्हटले, “मी प्रत्येक सुजाण नागरिकाला आवाहन करतो की, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहावे आणि सरकारनेही त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी.”

त्यांनी शांततापूर्ण आंदोलनाचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले की, “शांततेच्या मार्गानेही क्रांती घडवता येते. उपोषण ही कमकुवतपणाची नव्हे, तर आपल्या भूमिकेवरील दृढ विश्वासाची भाषा आहे. जे स्वतःसाठी नाही, तर निसर्गासाठी, हिमालयासाठी आणि भावी पिढ्यांसाठी उपोषण करतात, त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला माझा मनापासून पाठिंबा.”

दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा पाठिंबा मिळत असून, त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments