इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावांमध्ये गुरुपौर्णिमा अति उत्साहात साजरी

0
2
इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावांमध्ये गुरुपौर्णिमा अति उत्साहात साजरी

इंदापूर तालुका प्रतिनिधी गणेश धनवडे.निमसाखर गावांमध्ये श्री स्वामी समर्थांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली .या पौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरामधून स्वामींच्या पादुकांची ग्राम प्रदक्षिणा गावातून काढण्यात आली. श्री स्वामींच्या पालखी मार्गावर स्वामीभक्त महिलांनी रांगोळी काढून उत्साहात स्वागत केले पालखी मंदिरामध्ये आल्यानंतर ह.भ.प.श्री माऊली महाराज जाधव शेळगाव यांचे स्वामी समर्थ प्रवचन झाले. नंतर श्रींचा जप व आरती घेण्यात आली. नंतर सर्व स्वामी भक्तांना श्री किसन बापूराव शेळके यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला. नंतर मंदिरामध्ये सुंदर अशा रांगोळीचे नियोजन सौ शितल सुनील टकले यांनी केले तसेच पालखीची सजावट श्री राजेंद्र मारुती घोडे यांनी केली. या कार्यक्रमास गावातील सर्व स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.