Tuesday, August 11, 2026
Homeफलटणधनगर समाजाला एसटी आरक्षण व मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना...

धनगर समाजाला एसटी आरक्षण व मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन

१२ वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची सरकारला करून दिली आठवण; चाऱ्याचा प्रश्न, वनक्षेत्रात चरण्याची परवानगी व मेंढपाळांवरील हल्ले रोखण्यासाठी कायद्याची मागणी

फलटण | प्रतिनिधी. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, मेंढपाळ बांधवांवर वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतूद करावी, तसेच चाऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवून वनक्षेत्रात चरण्यासाठी आवश्यक परवानगी द्यावी, या विविध मागण्यांसाठी सकल धनगर समाज, फलटण तालुका आणि मेंढपाळ आर्मी संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जुलै २०१४ रोजी बारामती येथील आंदोलनादरम्यान धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा प्रश्न सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तब्बल १२ वर्षे उलटूनही हा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने धनगर समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर २९ जुलै २०२६ रोजी त्या आश्वासनाची आठवण करून देत सरकारने धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यामार्फत राज्य शासनापर्यंत समाजाच्या भावना व मागण्या पोहोचविण्याची विनंती करण्यात आली.

यावेळी मेंढपाळ बांधवांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर संरक्षण मिळावे, मेंढपाळांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, चाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा आणि वनक्षेत्रात जनावरे चरण्यासाठी आवश्यक परवानग्या देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

याप्रसंगी युवा नेते निवृत्ती खताळ (सर), तानाजी जगताप, युवा नेते नितीन सुळ, ज्येष्ठ मार्गदर्शक कालिदास चोरमले, नानासो गोवेकर (माजी सरपंच), आप्पा तात्या लोखंडे, प्रेम मोरे (बहुजन पक्ष, फलटण तालुका अध्यक्ष), ह.भ.प. हरी महाराज गोपनर (मेंढपाळ आर्मी प्रवक्ते), शंकर शिंगाडे, रमेशभाऊ तांबे (मेंढपाळ आर्मी जिल्हाध्यक्ष), किसनराव सोनवलकर (आबा), रत्नाकर क्षीरसागर, प्रमोद शिंदे (राष्ट्रीय मानव अधिकार व बाल संरक्षण परिषद, पुणे जिल्हाध्यक्ष), गणेश कुंभार, सुरेश झेंडे, सामाजिक कार्यकर्ते शंभूराजे शेंडगे, महादेव शेळके (आबा) (मेंढपाळ आर्मी खंडाळा तालुकाध्यक्ष), सुनील शिंदे (शाखाध्यक्ष, हिंगणगाव), रोहिदास ठोंबरे (संपर्क प्रमुख), सचिन ठोंबरे, संतोष येळे, पोपट सुळ, बाबू तांबे, मुगटराव येळे, संतोष सुळ यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments