Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटण तालुक्यातील दलित चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटीचे निमंत्रण : शरद पवार

फलटण तालुक्यातील दलित चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटीचे निमंत्रण : शरद पवार

फलटणः माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राज्यसभा खासदार शरद पवार यांनी बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी फलटण तालुक्यामध्ये विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जे काही दलित कार्यकर्ते कामकाज करीत आहेत अश्या सर्व कार्यकर्त्यांना भेटीचे निमंत्रण दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे समर्थक नंदकुमार मोरे यांनी दिली आहे

एकच निर्धार ! बौद्ध आमदार !

मा. खा. शरदचंद्र पवारसाहेब यांची पुणे येथील मोदीबाग या ठिकाणी संविधान समर्थन समिती च्या माध्यमातून आज निवेदन व निमंत्रण देण्यात आले. 255-फलटण कोरेगांव विधान सभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर फलटण येथे दि. 25 ऑगस्ट रोजी एकच निर्धार… बौद्ध आमदार या अनुषंगाने फलटण मध्ये होत असलेल्या बौद्ध समाजाचा मेळावा संदर्भात निमंत्रण देण्यात आले त्या वेळेस मा. पवारसाहेब यांनी शुभेच्छा व्यक्त करत फलटण तालुक्यातील दलित चळवळीतील कार्यकर्ते यांना बारामती येथे भेट देण्याबाबत सकारात्मक दर्शवत आनंद व्यक्त करत शिष्टमंडळास बारामतीतील गोविंद बाग या ठिकाणी भेटीचे निमंत्रण दिले आहे, व 25 ऑगस्ट ला मोबाईल फोन द्वारे शुभेच्छा व्यक्त करणार आहेत.

तसेच या वेळेस आ.श्री. रोहित दादा पवार यांनी देखील आनंद व्यक्त केला व सदर मेळाव्यास मनपूर्वक शुभेच्छा दिल्या….!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments