Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटण तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशिल ; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशिल ; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकास योजनांद्वारे फलटण शहर आणि तालुक्याचा विकास सुरु आहे. संपूर्ण फलटण तालुक्याच्या सर्वागिण विकासासाठी आपण प्रयत्नशिल असून जनतेने साथ द्यावी असे आवाहन मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले. प्रभाग क्रमांक १० मधील कैकाङवाङा येथील दिलिप पवार घर ते नाथाच्या मंदिरापर्यंत सिमेंट रस्त्यांचा आणि गटार सिमेंट पाईप बसविणे कामांचा शुभारंभ तसेच पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन चे उदघाटन मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अजय माळवे, सुधीर अहिवळे, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, फिरोज आतार, झाकिरभाई मणेर, आण्णा घाङगे, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष संदिप चोरमले, अजिंक्य बेङके, अमीरभाई शेख, रियाजभाई इनामदार, राजाभाऊ देशमाने, राहुल शहा, आबा बेंद्रे, निलेश खानविलकर, विकास कर्वे, आणि भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक रहिवासी यांनी मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे आभार मानले. नगरसेवक अजय माळवे यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा यथोचित सत्कार केला. तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील विकास कामे व अडीअडचणी सोडवणेबाबत

विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर आणि नगरसेवक अजय माळवे यांचेही कायमस्वरूपी सहकार्य असते, अश्या भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या . कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments