Saturday, September 12, 2026
Homeसाताराप्रभाग ९ मध्ये श्रीमंत अनिकेतराजे आणि श्रीमंत सत्यजितराजे यांचा प्रभावी प्रचार दौरा;...

प्रभाग ९ मध्ये श्रीमंत अनिकेतराजे आणि श्रीमंत सत्यजितराजे यांचा प्रभावी प्रचार दौरा; नागरिकांमध्ये उत्स्फूर्त स्वागत

फलटण  – फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ प्रभाग ९ मध्ये श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत सत्यजितराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी होम टू होम प्रचार दौऱ्याला प्रारंभ केला आहे. या दौऱ्यादरम्यान, प्रभाग ९ मधील स्वामी समर्थ मंदिरात श्रीफळ अर्पण करून त्यांनी जनतेशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या दौऱ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रचार दौऱ्यात माजी नगरसेविका सौ. वैशाली चोरमले, खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, माजी नगरसेवक भरत शेठ बेडके, अजिंक्य बेडके, मुधोजी हायस्कूलचे माजी उपप्राचार्य प्रा. दत्ता चोरमले, तसेच बाथ्री तेली समाजाचे अध्यक्ष विशाल तेली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, स्थानिक समाजबांधव आणि पदाधिकारी देखील या प्रचार मोहिमेत सहभागी झाले आहेत.

प्रभाग ९ मध्ये विविध ठिकाणी अनिकेतराजे आणि सत्यजितराजे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले असून, हा होम टू होम प्रचार दौरा मतदारांमध्ये प्रभाव निर्माण करत असल्याचे दिसत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments