Sunday, September 13, 2026
Homeसाताराप्रा. रमेश आढाव – जनतेचा स्वाभिमान आणि विकासाचे नेतृत्व

प्रा. रमेश आढाव – जनतेचा स्वाभिमान आणि विकासाचे नेतृत्व

फलटण :- २५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला प्रा. रमेश आढाव यांच्या रूपाने एक प्रगल्भ, मुत्सद्दी आणि सक्षम नेतृत्व मिळाले आहे. विपरीत परिस्थितीतून स्वतःची ओळख निर्माण करत प्रा. आढाव यांनी राजकीय क्षेत्रात एक दृढ भूमिका घेतली आहे. जातीयवादी व्यवस्थेने त्यांना मुख्य प्रवाहातील राजकारणातून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला, तरीही बौद्ध, ओबीसी, भटक्या विमुक्त, आणि मराठा समाजाच्या पाठिंब्याने त्यांनी संविधान समर्थन समितीच्या आणि अन्य समर्थक पक्षांच्या तिकिटावर निवडणुकीसाठी उभे राहण्याचा निर्धार केला आहे.

प्रा. आढाव यांचे कार्यक्षेत्र केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही. त्यांनी रेल्वे आणि दूरसंचार विभागातही मोठे योगदान दिले आहे, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली फलटण-बारामती रेल्वे मार्गाला मंजुरी मिळवण्यात मोलाचा वाटा आहे. त्यांच्या दूरदृष्टीने मतदारसंघात शिक्षण, क्रीडा, कृषी आणि पर्यावरण यांसारख्या क्षेत्रांतही विकासाच्या योजना साकारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

यंदाच्या निवडणुकीत प्रा. रमेश आढाव यांना गावागावातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः महिलांनी आणि ग्रामीण जनतेने त्यांना आत्मीयतेने पाठिंबा दिला आहे. मतदारांना ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे असे वाटत असून, जनतेचा विश्वास आणि प्रा. आढाव यांचा स्वाभिमानी नेतृत्वाच्या माध्यमातून विधानसभेत जनतेचा हक्क प्रस्थापित होईल अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments