Sunday, September 6, 2026
Homeसाताराजिल्हा परिषद शाळा परतवडी येथे कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव उत्साहात

जिल्हा परिषद शाळा परतवडी येथे कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव उत्साहात

विद्यार्थ्यांचा शिस्तबद्ध सहभाग; ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भक्तिमय वातावरण

परतवडी प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा, परतवडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पारंपरिक दहीहंडी उत्सवाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या सहभागातून भक्तिमय दिंडी सोहळाही उत्साहात पार पडला.

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे तसेच भारतीय संस्कृती आणि परंपरांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत दिंडी आणि दहीहंडी उत्सवाची रंगत वाढविली.

हा उपक्रम गटशिक्षणाधिकारी आदरणीय लक्ष्मण पिसे साहेब, मलवडी बीटचे विस्ताराधिकारी मा. गंबरे साहेब तसेच तोंडले केंद्राच्या केंद्रप्रमुख मा. झणझणे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यापिका स्वाती साळवे, रुपाली पवार मॅडम आणि विषय शिक्षक सूर्यकांत सुस्तरफोड यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने केले.

दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांचा शिस्तबद्ध सहभाग आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना धार्मिक परंपरा, सांस्कृतिक मूल्ये आणि सामूहिक सहभागाचे महत्त्व अनुभवता आले. उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेला हा कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments