Saturday, September 12, 2026
Homeसाताराफलटण - कोरेगाव विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विरोधकांवर घणाघात, विकासाच्या...

फलटण – कोरेगाव विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विरोधकांवर घणाघात, विकासाच्या वचनांची मालिकाच!

फलटण, ढवळ – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ ढवळ येथे आयोजित सभेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. नाईक निंबाळकर म्हणाले, “गेल्या 30 वर्षात सहकारी संस्था, बँका, दूध संघ, साखर कारखाने चालवण्याचं कर्तव्य बाजूला ठेवून काही मंडळींनी सहकाराला बुडवण्याचं काम केलं. त्याउलट, मी खासदार असताना रेल्वे, रस्ते, पाणी हे सुविधा आणून मतदारसंघाचा विकास साधला.”

ते म्हणाले, “रागापोटी रामराजेंनी ढवळला पाणी येऊ दिलं नाही, मात्र माझ्या प्रयत्नांमुळे बारमाही पाण्याचा प्रश्न सुटला.” त्यांनी ढवळ गावात सर्व रस्त्यांचे 100% डांबरीकरण आणि पाण्याचे संपूर्ण व्यवस्थापन करण्याचे आश्वासन दिले.

रणजितसिंह यांनी शरद पवारांवर टीका करताना सांगितलं की, “इतक्या वर्षे सत्तेत असताना त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी काही केलं नाही. मात्र, अजित पवारांच्या मार्गदर्शनात महायुतीचा उमेदवार आहे, जो नेहमीच शेतकरी, महिला, वंचित घटकांच्या भल्यासाठी कार्यरत राहील.”

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह मोफत विजेची सुविधा, महिलांना तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याच्या घोषणा करून त्यांनी महायुतीचे सरकार हा एकमेव विकासात्मक पर्याय असल्याचं अधोरेखित केलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments