Tuesday, September 15, 2026
Homeसातारातरुणाच्या आत्महत्येने सोनवडी खुर्द गावात शोककळा; व्यसन, नोकरीतून ब्रेक की अन्य कारण?

तरुणाच्या आत्महत्येने सोनवडी खुर्द गावात शोककळा; व्यसन, नोकरीतून ब्रेक की अन्य कारण?

फलटण :- दि. २ जून २०२५ रोजी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने फलटण तालुक्यातील सोनवडी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. गावातील २७ वर्षीय युवक रविराज लक्ष्मण पोळ याने तुकाई मंदिरासमोर बसून डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच त्याने विषारी औषधही सेवन केल्याचे समोर आले आहे.

ही घटना सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. गावकऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी स्पंदन केअर हॉस्पिटल, फलटण येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास त्याला मृत घोषित केले.

रविराज पोळ याने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र तो काही काळापासून व्यसनाधीन होता आणि एका फायनान्स कंपनीत नोकरीला होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली. सदर कंपनीने त्याला नुकताच नोकरीतून ब्रेक दिला होता, असे देखील समजते.

याप्रकरणी मृताचे मामा नवनाथ विठ्ठल पवार (वय ३८, व्यवसाय: शेती व मजुरी, रा. सोनवडी खुर्द) यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलीस नाईक यादव अधिक तपास करत आहेत.

गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून, युवकांच्या मानसिक आरोग्याची व व्यसनमुक्तीची गरज अधोरेखित करणारा हा प्रसंग आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments