Tuesday, September 15, 2026
Homeसाताराडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ भीमसैनिकांचा आटपाडी ते मंत्रालय लॉग...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ भीमसैनिकांचा आटपाडी ते मंत्रालय लॉग मार्च; फलटणमध्ये उत्स्फूर्त स्वागत

फलटण :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आटपाडी येथे असलेला पुतळा जाणीवपूर्वक हटवण्यात आल्याच्या निषेधार्थ शेकडो भीमसैनिकांनी आटपाडी ते मुंबई मंत्रालय असा लॉगमार्च काढला आहे. या असंवेदनशील व अकार्यक्षम प्रशासनाचा निषेध करण्यासाठी सुरू झालेला हा मार्च फलटण नगरीत पोहोचताच मंगळवार पेठ येथे स्थानिक भीमसैनिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

या भीमसैनिकांच्या विश्रांतीसाठी कोळकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आज दिनांक 4 जून 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मंगळवार पेठ येथून हा लॉग मार्च पुढे मार्गस्थ झाला.

या वेळी सामाजिक बांधिलकी जपत जयश्री अर्बन पतसंस्थेचे चेअरमन दयानंद पडकर यांनी सर्व भीमसैनिकांना पावसाळी रेनकोट, औषधे, इलेक्ट्रोल पावडर व प्रत्येकी 3000 रुपये रोख स्वरूपात मदत दिली.

तसेच मॅग फिन्सर्व्ह कंपनी लि., फलटणचे एरिया मॅनेजर विशाल पाटील यांच्या वतीने कोरडा खाऊ वाटप करण्यात आला. बुद्ध जयंती 2025 या संस्थेने सुद्धा आर्थिक मदत रोख स्वरूपात केली.

या वेळी विजय येवले (RPI आठवले गट), दयानंद पडकर, विकास काकडे सर, कपिल काकडे, विशाल पाटील, चंद्रकांत मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments