Friday, September 25, 2026
Homeसाताराफलटण तालुक्यातील तावडी येथील रणजीत निंबाळकर यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे.

फलटण तालुक्यातील तावडी येथील रणजीत निंबाळकर यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे.

फलटणःबारामती तालुक्यातील निंबुत येथे शर्यतीच्या बैलावरून झालेल्या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेले फलटण तालुक्यातील तावडी येथील रणजीत निंबाळकर यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

२ दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील निंबुत येथे एक गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये फलटण तालुक्यातील तावडी येथील रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांचे नुकतेच उपचारादरम्यान निधन झाले आहे.

या बाबत वडगाव पोलिस स्टेशन मधून मिळालेली माहिती अशी, रणजित निंबाळकर यांनी यातील गौतम काकडे यांना सुंदर नावाचा बैल विक्री केला होता 37 लाख रुपये ला विकला होता. त्यापैकी 5 लाख हे विसार म्हणून दिले होते तरी उर्वरीत रक्कम दिनांक 27 रोजी नेण्यासाठी बोलाविल्याने रात्री 11 वा. चे सुमारास मी, माझे पती रणजित, मुलगी अंकुरण वय 10 महीने हे निंबुत येथे गौतम काकडे त्यांचे घरी गेलो होतो. यावेळी फिर्यादित सौ. निंबाळकर यांनी म्हटले आहे की, गौतम काकडे हे रणजित निंबाळकर यांना म्हणाले की,तुम्ही संतोष तोडकर यांना ‘मी तुम्हाला पैसे दिले नाहीत असे का सागिंतले? तुम्ही असे बोलायला नको होते’ मी तुम्हाला सकाळी पैसे देतो. तुम्ही आता स्टॅम्प पेपरवर सही करा असे बोलले.त्यावेळी माझे पती म्हणाले, तुम्ही माझे राहीलेले पैसे दया मी लगेच सही करतो आणि जर तुम्हाला व्यवहार पुर्ण करायचा नसेल तर तुमचे 5 लाख रुपये मी तुम्हाला परत देतो,माझा बैल मला परत द्या. त्यानंतर आम्ही आमचे गाडीकडे निघालो. त्यावेळी गौतम काकडे माझे

माझा बैल मला परत द्या. त्यानंतर आम्ही आमचे गाडीकडे निघालो. त्यावेळी गौतम काकडे माझे पतीस ‘तु बैल कसा घेवुन जातो तेच मी बघतो’ असे म्हणुन त्यांनी फोन लावुन पोरांनो तुम्ही वर या असे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांचा भाउ गौरव यास देखील फोन करून बोलावुन घेतले. गौरव व अनोळखी 3 मुले तिथे आल्यावर गौतम काकडे हे आमच्याकडे पळत आले. व त्यांनी गौरव व त्या अनोळखी 03 मुलांना ” हया सराला मारा लय बोलतोय हा ” असे म्हणाला. त्यावेळी गौरवच्या हातात काठी होती, ती काठी गौतम काकडे यांनी घेवुन तो मारण्यासाठी माझे पतीचे अंगावर धावुन जावून शिवीगाळ केली, त्यावेळी वैभव कदम हे गौतम काकडे यांना ” तुम्ही वाद घालु नका आपण उदया व्यवहारावर चर्चा करू” असे म्हणुन त्यांना आडवत होते. अनोळखी 03 पोरांनी आम्हाला शिवीगाळ करीत असतांना गौरवने ” तु बैल कसा नेतो तुला जिवंत ठेवतच नाय असे म्हणुन त्याचेकडे असणारे पिस्तुलमधुन माझे पतीच्या डोक्यात 1 गोळी झाडली. गोळी लागताच माझे पती खाली पडले. म्हणून माझी वरील इसमांच्या विरुध्द कायदेशिर फिर्याद असल्याचे सौ निंबाळकर यांनी फिर्यादित म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments