Tuesday, August 11, 2026
Homeफलटणकास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून स्वाती साळवे यांच्यावर विश्वास; माण तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती

कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून स्वाती साळवे यांच्यावर विश्वास; माण तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती

कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून स्वाती साळवे यांच्यावर विश्वास; माण तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती

माण | प्रतिनिधी :-  कास्ट्राईब शिक्षक संघटना, माण तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद शाळा परतवडी शाळेच्या मुख्याधापिका स्वाती साळवे मॅडम यांची तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि शिक्षक हिताच्या उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

साळवे मॅडम यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत जनजागृती, संघटनेचे उपक्रम प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविणे तसेच संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करत कास्ट्राईब शिक्षक संघटनेने त्यांना प्रसिद्धी प्रमुखपदाची संधी दिली आहे.

या नियुक्तीमुळे संघटनेच्या विचारांचा अधिक प्रभावी प्रचार-प्रसार होईल, शिक्षकांच्या समस्या आणि संघटनेच्या उपक्रमांची माहिती व्यापक स्तरावर पोहोचेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

साळवे मॅडम यांच्या नियुक्तीबद्दल शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments