Tuesday, August 11, 2026
Homeसाताराकास्ट्राईब शिक्षक संघटना माण तालुका कार्यकारिणी जाहीर; शिक्षकांच्या हक्कांसाठी संघटना अधिक बळकट

कास्ट्राईब शिक्षक संघटना माण तालुका कार्यकारिणी जाहीर; शिक्षकांच्या हक्कांसाठी संघटना अधिक बळकट

कास्ट्राईब शिक्षक संघटना माण तालुका कार्यकारिणी जाहीर; शिक्षकांच्या हक्कांसाठी संघटना अधिक बळकट

माण | प्रतिनिधी : कास्ट्राईब शिक्षक संघटना, माण तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटनात्मक पातळीवर लढा अधिक मजबूत करण्याचा निर्धार नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नवीन कार्यकारिणीत शैलेश बोराटे यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. स्वाती सावंत यांची महिला आघाडी प्रमुख, राजेंद्र निकाळजे यांची कार्याध्यक्ष, तर दत्तकुमार सदाशिव खाडे यांची संघटक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

संघटक म्हणून सचिन भोंडवे, स्वाती साळवे, प्रा. बोरसे, अविनाश जगताप, भिमराव बनसोडे, लक्ष्मण महानवर, वैभव शिंदे, शिल्पा निंबाळकर आणि अजित खाडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संतोष पवार यांच्याकडे खजिनदारपदाची, तर वैभव झेंडे यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत असून, संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक उपक्रम राबविणे आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कास्ट्राईब शिक्षक संघटना ही शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत असलेली संघटना असून, नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून माण तालुक्यात संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments