Tuesday, August 11, 2026
Homeसाताराकास्ट्राईब शिक्षक संघटना, माण तालुका कार्यकारिणी जाहीर; शैलेश बोराटे अध्यक्षपदी, शिक्षकांच्या हक्कांसाठी...

कास्ट्राईब शिक्षक संघटना, माण तालुका कार्यकारिणी जाहीर; शैलेश बोराटे अध्यक्षपदी, शिक्षकांच्या हक्कांसाठी संघटना अधिक सक्षम

दहिवडी | प्रतिनिधी :- कास्ट्राईब शिक्षक संघटना, माण तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून शिक्षकांच्या विविध शैक्षणिक, प्रशासकीय व सेवा विषयक प्रश्न सोडविण्यासाठी संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नवीन कार्यकारिणीमध्ये शैलेश बोराटे यांची अध्यक्षपदी, राजेंद्र निकाळजे यांची कार्याध्यक्षपदी, तर दत्तकुमार सदाशिव खाडे यांची संघटक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

तसेच संघटक म्हणून सचिन भोंडवे, स्वाती साळवे, प्रा. बोरसे, अविनाश जगताप, भिमराव बनसोडे, लक्ष्मण महानवर आणि वैभव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. संतोष पवार यांच्यावर खजिनदार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. संघटनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशिक्षण, सेवा विषयक अडचणी आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रभावी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी संघटना अधिक बळकट करण्यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षकांना संघटनेशी जोडण्याचे आवाहनही करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments