माझ्या हिश्श्याचे किस्से: ऐश्वर्यापासून सनीपर्यंत… राहुल रवैल यांनी ज्याला लाँच केले, तो स्टार बनला!

0
18
माझ्या हिश्श्याचे किस्से:  ऐश्वर्यापासून सनीपर्यंत… राहुल रवैल यांनी ज्याला लाँच केले, तो स्टार बनला!


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special From Aishwarya To Sunny… Launched By Rahul Rawail, He Became A Star! | Rumi Jafri’s Article

रूमी जाफरी | बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

राहुल रवैल यांनी अनेक अभिनेत्यांना लाँच केले. यात; सनी देओल, ऐश्वर्या रॉय, परेश रावल यांचाही समावेश होता.

(‘और प्यार हो गया’मध्ये नुसरत फ़तेह अली ख़ान यांच्याकडून पहिल्यांदाच करवून घेतले संगीत दिग्दर्शन)
गेल्या आठवड्यात माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी ‘बेताब’ या सिनेमाबद्दल सांगितले होते की, हा अमृता सिंगचा पहिला चित्रपट होता. पण, लिहिल्यानंतर मी विचार करत बसलो, तेव्हा मला आणखी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, जास्तीत जास्त स्टार अभिनेते असलेला पहिला चित्रपट दिग्दर्शक राहुल रवैल यांचा होता. किंवा आपण असेही म्हणू शकतो की राहुल रवैल यांनी अनेक स्टारना इंट्रोड्यूस केले आहे. उदाहरणच द्यायचे तर, ‘लव्ह स्टोरी’मध्ये कुमार गौरव-विजयता पंडित, ‘बेताब’मध्ये सनी देओल – अमृता सिंग, ‘बेखुदी’मध्ये काजोल – कमल सदाना, ‘और प्यार हो गया’मध्ये ऐश्वर्या रॉय, जॉन अब्राहम आणि प्रेमनाथ यांची नात व प्रेम किशन यांची मुलगी आकांक्षा यांना त्यांनी लाँच केले.

लंडनमध्ये चाळीस दिवस या सिनेमाचे चित्रीकरण झाले आणि काही कारणांमुळे ते थांबले. आकांक्षाने लग्न केले. पण, जॉन अब्राहम स्टार झाला. राहुलजींविषयी इंडस्ट्रीमध्ये विश्वास होता की, ते ज्याला घेतील तो स्टार बनणारच. माझ्यासमोरची गोष्ट म्हणजे, ऐश्वर्या रॉय ‘मिस वर्ल्ड’ झाली तेव्हा तिची क्रेझ किती होती याची कल्पनाही करता येणार नाही. हिरोइन होण्याआधीही लोक तिच्यासाठी वेडे होते, एखाद्या हिरोपेक्षा तिची क्रेझ जास्त होती. तिच्या घरासमोर भारतातील सगळ्या बड्या चित्रपट निर्मात्यांची रांग लागली होती. पण, तिला राहुलजींच्या दिग्दर्शनाखाली पहिला सिनेमा करणं योग्य वाटलं. याशिवाय, अन्नू कपूर, परेश रावल, यशपाल शर्मा यांसारख्या अनेक अभिनेत्यांची मोठी यादी आहे. अगदी सलमान खानचा मित्र आणि गायक कमाल खान यांनाही राहुलजींनी खलनायकाच्या भूमिकेत घेतले होते.

अन्नू कपूर यांच्याबद्दल राहुलजींनी सांगितले की, ‘आम्ही अमृताच्या वडिलांसाठी एका अभिनेत्याच्या शोधात होतो. तेव्हा जावेद साहेब म्हणाले की, मी पृथ्वी थिएटरमध्ये एक नाटक पाहिलं आहे. राहुलजी, तुम्हीही या आणि बघा. नाटकाचं नाव आहे ‘एक रुका हुआ फैसला’. त्यात दोन अतिशय चांगले कलाकार आहेत. एक अन्नू कपूर, दुसरा के. के. रैना.’ राहुलजी म्हणाले, ‘मी नाटक बघायला गेलो होतो, पण मला सगळ्यात जास्त आवडला तो अन्नू कपूरचा अभिनय. त्यामुळे मी ‘बेताब’मधील त्या भूमिकेसाठी अन्नूची निवड केली.’

राहुलजी सांगत होते.. करीम मुरानी यांना मी एकदा सांगितले की, आम्ही ‘अर्जुन’मधील सनीच्या मित्राच्या भूमिकेसाठी अभिनेता शोधत आहोत. त्यावर करीम म्हणाले, ‘गुजराती रंगभूमीवरचा एक खूप चांगला अभिनेता आहे, तुम्ही त्याला एकदा भेटा.’ मी म्हणालो, ‘ठीक आहे, त्याला उद्या शूटिंगच्या वेळी बोलवा.’ शूटिंग सकाळी ९ वाजता होते आणि त्याच वेळी परेश रावल तिथं आले. मी परेशसोबत चर्चा केली. थोडा वेळ बोलल्यावर काय झालं ते मला कळलंच नाही. मी त्यांच्या बोलण्याने इतका प्रभावित झालो की, हा खूप चांगला अभिनेता आहे, असं माझं मन मला सांगू लागलं. वास्तविक मी त्यांचं कोणतंही नाटक, अभिनय किंवा काहीही पाहिलं नव्हतं. पण, मला वाटलं की सनीच्या मित्राच्या भूमिकेत नव्हे, पण एका अन्य सिनेमात महत्त्वाची नकारात्मक भूमिका आहे, त्यात हा अभिनेता खूप चांगलं काम करु शकेल आणि तसा वाटेलही. मी त्याच क्षणी परेशना त्या भूमिकेसाठी निवडले. सकाळी साडेनऊला ते मला भेटायला आले आणि त्याच दिवशी दुपारी दीडला माझ्या सिनेमाचे शूटिंग करत होते.

राहुलजींनी मला सांगितले की, मी एकदा रस्त्याने जात असताना फूटपाथवरून चालत निघालेल्या एका मुलाला पाहिले. त्या मुलाचा चेहरा, त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याचं चालणे पाहून मला वाटलं, यार, हा तर खूपच जबरदस्त आहे. मी पुढे जाऊन गाडी थांबवली आणि त्या मुलाला म्हणालो, ‘अरे ऐक, तू अॅक्टिंग करशील का?’ तो माझ्याकडं बघत म्हणाला, ‘अरे, राहुलजी मी तुम्हालाच भेटायला तुमच्या आॅफिसमध्ये निघालोय. मी यशपाल शर्मा, एनएसडीतील अभिनेता आहे.’ मी म्हणालो, ‘चल, गाडीत बस..’ आणि त्याला घेऊन ऑफिसमध्ये आलो. त्यानंतर त्याला अर्जुन पंडितसाठी घेतले. राहुलजींची नजर अतिशय पारखी होती. यावरुन मला साहिर लुधियानवी साहेबांचा एक शेर आठवतोय…

ले दे के अपने पास फ़क़त इक नज़र तो है, क्यूँ देखें ज़िंदगी को किसी की नज़र से हम।

आणि हो.. शेवटी मी तुम्हाला सांगायला हवं की, सैफ अली खान हाही राहुलजींचाच शोध आहे. सैफला ‘बेखुदी’मध्ये लाँच करण्यात आले होते. ६ दिवस शूटिंगही चालले आणि त्यानंतर काही कारणांनी त्याच्या जागी कमल सदानाला घेण्यात आले. इतकेच नव्हे, तर ‘और प्यार हो गया’ या आपल्या सिनेमात राहुलजींना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कव्वाली गायक नुसरत फतेह अली खान यांच्याकडून संगीत दिग्दर्शन करुन घेतले होते. ‘और प्यार हो गया’ हा नुसरत फतेह अली खान यांनी संगीत दिलेला पहिला भारतीय चित्रपट होता. आज राहुलजींच्या अविस्मरणीय सिनेमांमधील आणि त्यांनी लाँच केलेल्या अभिनेत्यापैकी कोणाचेही तुम्हाला आवडणारे गाणे आपल्या मर्जीने ऐका. मी ‘और प्यार हो गया’मधील माझ्या

आवडीचं गाणं सांगतोय… जागी हुई फ़िज़ाएं हैं तेरे लिए… स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.



Source link