Tuesday, August 11, 2026
Homeफलटणआषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावासाचा उत्साहात प्रारंभआषाढ पौर्णिमेचे महत्त्व विशद करत वर्षावास आरंभी वाढदिवस...

आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावासाचा उत्साहात प्रारंभआषाढ पौर्णिमेचे महत्त्व विशद करत वर्षावास आरंभी वाढदिवस साजरा

आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावासाचा उत्साहात प्रारंभ
आषाढ पौर्णिमेचे महत्त्व विशद करत वर्षावास आरंभी वाढदिवस साजरा

फलटण : प्रारंभाचा कार्यक्रम जाधववाडी(बिरदेवनगर) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आयुनि रंजनी सुभाष काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन आयु. सुभाष मारुती काकडे यांच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमात चंद्रकांत मोहिते सर, केंद्रीय शिक्षक व बौद्धाचार्य यांनी विधीचे संचालन करून मार्गदर्शन केले. यावेळी सोमीनाथ घोरपडे सर, संस्कार सचिव, भारतीय बौद्ध महासभा, शाखा सातारा जिल्हा पूर्व यांनी आषाढ पौर्णिमेचे ऐतिहासिक व धम्माच्या दृष्टीने असलेले महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.

यावेळी घोरपडे सर यांनी भगवान बुद्धांच्या जीवनातील आषाढ पौर्णिमेचे महत्त्व, वर्षावासाची परंपरा, बुद्धांचा धम्मप्रसार आणि धम्माचरणातून समाजात निर्माण होणारी प्रबोधनाची भावना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. वर्षावासाच्या काळात धम्माचा अभ्यास, चिंतन, आचरण आणि समाजप्रबोधनाला विशेष महत्त्व देण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास सुनंदा किशोर काकडे, आशा राजेंद्र काकडे, आशा दिवाकर काकडे, कुमुदिनी गौतम रणदिवे, शारदा जयसिंग घाडगे, जिजाबाई विजय कंकाळ, नंदा युवराज गायकवाड, अनिता अमर गायकवाड, सुभाष मारुती काकडे, गौतम रणदिवे यांच्यासह उपासक-उपासिका उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून धम्मविचारांचा प्रसार आणि वर्षावासाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा संकल्प करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments