कालकथित चेतन महेंद्र मोहिते यांचा द्वितीय स्मृतिदिन मूकबधिर शाळेत साजरा

0
5
कालकथित चेतन महेंद्र मोहिते यांचा द्वितीय स्मृतिदिन मूकबधिर शाळेत साजरा

कालकथित चेतन महेंद्र मोहिते यांचा द्वितीय स्मृतिदिन मूकबधिर शाळेत साजरा


फलटण : कालकथित चेतन महेंद्र मोहिते यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना केळी, वडापाव, बिस्कीट, चिक्की आदी खाद्यपदार्थांचे वाटप करून स्मृतिदिन साधेपणाने व सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.
चेतन मोहिते यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या जिवलग मित्रांनी विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवून हा उपक्रम राबविला. यावेळी आयु. राकेश माने, आयु. शेखर काकडे, आयु. दयानंद काकडे, आयु. निलेश अहिवळे, आयु. सचिन पवार व आयु. प्रमित डांगे उपस्थित होते.

तसेच आयुनि. सुप्रिया राजपाल ओव्हाळ (पुणे) यांचीही उपस्थिती होती. मोहिते परिवाराच्या वतीने आयुनि. रेश्मा मोहिते, आयु. रोनित मोहिते व आयु. चंद्रकांत मोहिते उपस्थित होते.

चेतन महेंद्र मोहिते यांच्या स्मृतिदिनी गरजू विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. एखाद्या व्यक्तीच्या स्मृती जपण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ समाजोपयोगी कार्य करणे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.