
प्रफुल्ल पटेल यांनी दावा केला होता की, शरद पवार पहिल्यांदा २००४ मध्ये भाजप सोबत जाणर होते. प्रमोद महाजन आणि आम्ही एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली. दिल्लीत माझ्या घरी ही बैठक झाली. यावरच बोलताना पवार म्हणाले की, २००४ मध्ये भाजप बरोबर जाण्याची भुमिका प्रफुल्ल पटेल यांची होती. त्यांनी मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, तुम्हाला जायचे आहे तर जा. २००४ च्या निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव झाला. भाजपचे सरकार ही आले नाही. तरीही पराभव झालेल्या पटेलांना केंद्रात मंत्री पद दिले.




