Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रअकलूजकरांना दिलासा! जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याकडून मोफत...

अकलूजकरांना दिलासा! जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याकडून मोफत पाणीपुरवठा सुरू

खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासनाची तातडीची उपाययोजना

अकलूज प्रतिनिधी :- अकलूज शहरात यंदा अपुऱ्या पावसामुळे आणि पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणांतील पाणीसाठा घटणे आणि स्थानिक जलस्त्रोत आटल्याने नागरिकांसमोर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. या पार्श्वभूमीवर नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेत महत्त्वपूर्ण उपाययोजना राबविल्या आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगर परिषदेच्या लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्षा सौ. रेश्माताई अडगळे, गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका तसेच सयाजीराजे मित्र परिवार  यांचा सहकार्याने नागरिकांसाठी मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड, शंकरनगर (अकलूज) यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून, शहरातील विविध भागांमध्ये टँकरद्वारे मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नगर परिषद प्रशासनानेही परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक नियोजन केले असून, नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. या सामाजिक उपक्रमाबद्दल नागरिकांनी लोकप्रतिनिधी, नगर परिषद प्रशासन आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे आभार व्यक्त केले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments