Sunday, August 23, 2026
Homeफलटणफलटण बार असोसिएशनच्या बिनविरोध निवडलेल्या पदाधिकाऱ्यांचा उत्साहात सत्कार; नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला...

फलटण बार असोसिएशनच्या बिनविरोध निवडलेल्या पदाधिकाऱ्यांचा उत्साहात सत्कार; नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला विकासाचा निर्धार

फलटण | प्रतिनिधी :-फलटण बार असोसिएशनच्या सन २०२६–२७ या कार्यकाळासाठी बिनविरोध निवड झालेल्या नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यंदाच्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी ॲड. मेघा अहिवळे, सहसचिवपदी ॲड. शारदा दीक्षित, खजिनदारपदी ॲड. शाम अहिवळे तसेच कार्यकारिणी सदस्यपदी ॲड. रोहिणी भंडलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

समारंभात फलटण बार असोसिएशनच्या सन्माननीय सदस्य ॲड. वर्षाराणी पिसे-राऊत यांच्या हस्ते उपाध्यक्ष ॲड. मेघा अहिवळे यांचा गौरव करण्यात आला. ॲड. वंदना सुळ यांच्या हस्ते सहसचिव ॲड. शारदा दीक्षित आणि कार्यकारिणी सदस्य ॲड. रोहिणी भंडलकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ॲड. पी. बी. देवकाते यांच्या हस्ते खजिनदार ॲड. शाम अहिवळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला ॲड. राहुल मदने, ॲड. प्रशांत गावडे, ॲड. शंभू भोसले, ॲड. अक्षय सोनवलकर, ॲड. अर्जुन कोळेकर, ॲड. प्रबुद्ध मिसाळ, ॲड. शिंदे यांच्यासह फलटण बार असोसिएशनचे अनेक सदस्य, ज्येष्ठ विधिज्ञ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी बार असोसिएशनची गौरवशाली परंपरा कायम राखत वकिलांच्या हिताशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्याचा, संघटनेची एकजूट अधिक मजबूत करण्याचा आणि सर्व सदस्यांच्या सहकार्याने बार असोसिएशनच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

फलटण बार असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments