Sunday, August 23, 2026
Homeसाताराशिक्षकांचा एल्गार! विविध मागण्यांसाठी ९ जुलैला साताऱ्यात राज्यव्यापी 'शाळा बंद' आंदोलन

शिक्षकांचा एल्गार! विविध मागण्यांसाठी ९ जुलैला साताऱ्यात राज्यव्यापी ‘शाळा बंद’ आंदोलन

TET परीक्षा, पदोन्नती धोरण, संच मान्यता, ऑनलाइन कामांचा वाढता बोजा आणि शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

सातारा | प्रतिनिधी : शिक्षक व शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी सातारा येथे राज्यव्यापी ‘शाळा बंद’ आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना, खाजगी शिक्षक संघटना तसेच पालक संघटनांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आंदोलनकर्त्यांनी अन्यायकारक TET परीक्षा, पदोन्नतीतील अटी व सेवाज्येष्ठतेचा प्रश्न, संच मान्यतेचे धोरण, वाढता ऑनलाइन कामांचा बोजा, बीएलओ (BLO) कामाची सक्ती तसेच १५ पटाच्या आतील शाळा बंद करण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

या सर्व समस्यांमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करत शिक्षकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “शिक्षक आणि शिक्षण वाचविण्यासाठी गट-तट विसरून एकत्र या,” असे आवाहन आंदोलनाच्या आयोजकांनी केले आहे.

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना, शिक्षक संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठ, महाराष्ट्र मुख्याध्यापक संघ, खाजगी शिक्षक संघटना, पालक संघ तसेच जुनी पेन्शन हक्क संघटना सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments